स्मार्टफोनच्या वापराचे दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी उपाय

मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम

मोबाईलच्या अति वापराने डोळे, मान यांना होणाऱ्या त्रासा बरोबरच, हात म्हणजे अगदी अंगठा, मनगट, कोपर यांचे दुखणे सुद्धा आता सामान्य होऊन गेलेले आहे. या दुखण्याला शास्त्रीय भाषेत Cubital or Carpal tunnel Syndrome असे म्हणतात. त्याबद्दल पूर्ण माहिती आणि त्यापासून बचावासाठी काय करावे ते वाचा या लेखात.

तंत्रज्ञानाने आपली पाळेमुळे इतकी घट्ट रोवलेली असताना आजच्या युगात मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर यांचा वापर करणं हे प्रार्थमिक गरजांसारखं झालेलं आहे.

याचं अगदी जिवंत उदाहरण म्हणजे या कोरोनाकाळात कामापासून, सामाजिक संबंध ठेवण्या बरोबरच अगदी लहान मुलांचे शिक्षण यासाठी सुद्धा याच मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर चा उपयोग करणं हाच एक पर्याय आपल्या समोर राहिला.

प्रत्येकाच्या हातात मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट दिसणं हे आता सामान्य झालं आहे.

त्यामुळे अगदी लहान मुलांना सुद्धा याच्या अति आणि गैरवापरापासून दूर करणं हे आता एक दिव्य झालेलं आहे.

याचंच एक गमतीदार पण विचार करायला लावणारं उदाहरण सांगते… परवा गौरी पूजनासाठी एका ठिकाणी गेले असता, त्यांच्या अडीच वर्षांच्या गोंडस बाळा बरोबर मी खेळत होते. खेळता खेळता अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो बेडरूम मध्ये जाऊन थोड्या वेळाने आला. “कुठे गेला होतास?” हे त्याला विचारलं तर त्याच्या अगदी बोबड्या अशा गोंडस आवाजात त्याने सांगितले, की तो मोबाईल चार्जिंगला लावायला गेला होता, म्हणजे थोड्या वेळाने त्याला गेम खेळता येईल…..

मोबाईलच्या अति वापराने डोळे, मान यांना होणाऱ्या त्रासा बरोबरच, हात म्हणजे अगदी अंगठा, मनगट, कोपर यांचे दुखणे सुद्धा आता सामान्य होऊन गेलेले आहे.

आता बघा सकाळ पासून आपण कमीतकमी कोणकोणत्या गोष्टींसाठी मोबाईल चा वापर करतो.

१) रोज सकाळचा अलार्म

२) मित्र परिवाराला मेसेज करण्यासाठी

३) इ-मेल चेक करण्यासाठी

४) बातम्या वाचण्यासाठी

५) क्रिकेटच्या दिवसांमध्ये स्कोअर बघण्यासाठी

६) सोशल मीडिया बरोबर कनेक्ट राहण्यासाठी

७) गाणी ऐकण्यासाठी

८) फोटो घेण्यासाठी

जर तुमची लिस्ट पण काहीशी अशीच असेल तर सकाळी उठल्या पासून रात्री झोप पर्यंत कित्येक तास मोबाईल तुमच्या हातात असतो.

मार्च मध्ये झालेल्या एका सर्व्हे नुसार भारतात दर दिवशी सरासरी ४.३ तास मोबाईल वर घालवला जातो.

एवढा वेळ तुमच्या कडून पण जर मोबाईल वापरण्यात घालवला जात असेल तर अंगठा, मनगट किंवा कोपर यांच्यावर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत असेल.

यात खूप कॉमन होणारा त्रास म्हणजे अंगठा दुखणं, किंवा अति ताण येऊन अंगठ्याला वात आल्या सारखे होणे. आणि अंगठ्या वरती येणाऱ्या स्ट्रेस मुळे मनगट दुखणे आणि बराच वेळ आपला एलबो एकाच पोझिशन मध्ये राहिल्याने तोही दुखणे.

याशिवाय तुम्हाला हा पण अनुभव आला असेल की स्मार्टफोन जितका मोठा तितके हे अंगठ्याचे दुखणे वाढते.

या दुखण्याला मेडिकल टर्म मध्ये म्हंटल जातं, “Cubital or Carpal tunnel Syndrome” किंवा अशास्त्रीय भाषेत “Text Claw” किंवा अगदी “Cell Phone Elbow” असंही म्हंटल जातं.

हे हाताचे, मनगटाचे आणि कोपराचे दुखणे कमी करण्यासाठी काय करावे?

१) स्मार्टफोनच्या वापरासाठी दोन्ही हात आळीपाळीने वापरत जा.

२) छोटा मेसेज टाइप करा. मोठा मेसेज टाइप करण्यासाठी ‘व्हॉइस टू टेक्स्ट’ या तंत्रज्ञानाचा वापर करा. सध्या गुगलने ‘व्हॉइस टू टेक्स्ट’ साठी मराठी चा वापर करता येईल असे फिचर आणले आहे. हो, म्हणजे तुम्ही जे मराठीत बोलाल ते, तसेच्या तसे अगदी नीट टाइप केले जाते. लवकरच एका लेखा मध्ये आम्ही त्याचा डेमो देऊ.

३) टाइप करताना स्वाईप फिचरचा वापर करायला शिकून घ्या. (तुम्हाला हे जमत नसेल तरी तुमच्या मुलांना मात्र हे चांगलेच जमत असेल)

४) रोज दिवसांतून काही तासांच्या नंतर मोबाईल ब्रेक ठरवून घ्या. (पण प्रत्येक मोबाईल ब्रेक नंतर सर्वात आधी आम्हाला म्हणजे मनाचेTalks ला भेट द्यायला विसरू नका🙋‍♀️)

५) तुमची बोटं, मनगट, आणि पूर्ण हात यांना या ब्रेकमध्ये हलकेसे व्यायाम द्या.

६) मोबाईल डिव्हाइस वापरण्याचे स्टँड सुद्धा बाजारात उपलब्ध असतात.

७) बोलण्यासाठी हेडसेट चा वापर करावा.

८) बर्फाचा शेक : दुखण्याचे प्रमाण खूप जास्त असेल तर ५ ते १० मिनिटे बर्फाचा शेक द्यावा

९) ऍक्युप्रेशर प्रेशर पॉईंट : मनगटापासून साधारण तीन बोट खाली आणि डोकेदुखी पासून आराम देणारा ऍक्युप्रेशर पॉईंट असल्याचे मानले जाते. यावर हलक्या हाताने दाबून मसाज दिल्याने आणि ही क्रिया नियमितपणे केल्याने या त्रासापासून सुटका मिळते.

Carpal Tunnel Syndrome

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!