आरोग्यासाठी मसूर डाळीचे फायदे वाचा या लेखात

आरोग्यासाठी मसूर डाळीचे फायदे

मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक असते ते वाचा या लेखात.

आपल्या भारतीय जेवणातील एक अविभाज्य घटक म्हणजे डाळी.

आपल्या रोजच्या जेवणात या डाळींचा समावेश असतोच.

डाळीतून प्रथिने म्हणजेच प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात.

खास करून शाकाहारी लोकांना जास्त प्रमाणात प्रोटीन मिळण्यासाठी डाळी हा उत्तम पर्याय आहे.

आहारात समतोल राखण्यासाठी आपल्या आहारात सगळ्या डाळींचा समावेश असायला हवा.

पण यासाठी आपल्याला डाळींचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे माहीत पाहिजेत.

आज या लेखात अशाच एका महत्वाच्या डाळीचे फायदे आम्ही सांगणार आहोत.

यामुळे आपल्या आहारात किती प्रमाणात या डाळीचा समावेश करायचा हे आपल्या लक्षात येईल.

ही महत्वाची डाळ म्हणजे मसूर डाळ.

मसूर डाळीचे आपल्या आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत.

आणि आपण तिचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात जास्त प्रमाणात का केला पाहिजे हे आज आपण जाणून घेऊया.

मसूर डाळीचे आपल्या आरोग्यासाठी ९ फायदे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

१. प्रोटीन

मसूर डाळीत प्रोटीन जास्त प्रमाणात असतात.

समतोल आहारात प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट आणि फायबर सगळे योग्य प्रमाणात असले पाहिजेत.

आपल्याला जर आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर मसूर डाळ हा खूप चांगला पर्याय आहे.

कारण इतर डाळींसारखी मसूर डाळ शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि इतर डाळींच्या मानाने त्यात प्रोटीन जास्त असतात.

२. हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

कॅल्शिअम बरोबरच फॉस्फरस हे खनिज आपल्या शरीरातील हाडे बळकट ठेवण्यास मदत करते.

मसूर डाळीत हे फॉस्फरस जास्त प्रमाणात आढळतात.

म्हणूनच हाडांचे आरोग्य राखायचे असेल तर मसूर डाळीचे नियमित सेवन फायदेशीर ठरते.

३. वजन कमी करण्यास उपयुक्त

मसूर डाळीत फायबर जास्त प्रमाणात आढळतात.

फायबरमुळे आपले पोट लवकर भरते व ते जास्त काळ भरलेले राहते.

यामुळे वजन वाढण्यासाठी कारणीभूत असलेले दोन जेवणाच्या मधले खाणे बंद होते.

म्हणूनच वजन घटवायचे असेल तर एका वेळेच्या जेवणात तरी मसूर डाळ खाल्लीच पाहिजे.

४. ऍनेमियावर उपयुक्त

फॉलीक ऍसिड हे आपल्या शरीरात नवीन पेशी, खास करून तांबड्या रक्तपेशी वाढवण्यासाठी फायदेशीर असते.

तांबड्या रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील इतर पेशींना प्राणवायू पोहोचवायचे काम करत असतात.

शरीरातील तांबड्या रक्तपेशी कमी झाल्या की, हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा कमी होते.

यामुळे इतर पेशींना पुरेसा प्राणवायू मिळत नाही. याला वैद्यकीय भाषेत ऍनेमिया म्हणतात.

मसूर डाळीत फॉलीक ऍसिड जास्त प्रमाणात आढळते.

त्यामुळे आहारात मसूर डाळीचा समावेश केल्याने सतत नवीन रक्तपेशी तयार होत राहतात.

तसेच मसूर डाळीत आयर्न हे खनिज सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.

आयर्नमुळे सुद्धा रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

गर्भवती महिलांना या फॉलीक ऍसिडची आवश्यकता जास्त असते म्हणूनच महिलांनी गर्भधारणेच्या आधी

आणि नंतर सुद्धा आहारात जास्त प्रमाणात मसूर डाळीचा समावेश केला पाहिजे

५. बी व्हिटॅमिन्सचा चांगला स्रोत

मसूर डाळीत ‘बी’ व्हिटॅमिन्स हे जास्त प्रमाणात असतात.

वेगवेगळ्या बी व्हिटॅमिन्सचे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे असतात.

मसूर डाळीमध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या ‘बी’ व्हिटॅमिन्स पैकी थायमिन हे आपल्या स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित ठेवते.

‘रायबोफ्लेविन’ हे एक अँटिऑक्सिडन्ट आहे.

अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नावाच्या द्रव्यापासून आपल्या शरीरातील इतर पेशींचा बचाव करतात.

शरीरातील पेशी निरोगी राहण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स अत्यंत फायदेशीर असतात.

नियासिन हे आपल्या त्वचेसाठी लाभदायक असते आणि उन्हाच्या धोकादायक किरणांपासून त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून ते आपल्याला सुरक्षित ठेवते.

६. झिंकचा चांगला स्रोत

आपल्या एकूण आरोग्यासाठी आपल्या आहारातून आपल्याला वेगवेगळी खनिजे योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत.

मसूर डाळीत आयर्न जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो ते आपण वर बघितलेच,

पण त्याचबरोबर मसूर डाळीमध्ये ‘झिंक’ हे खनिज सुद्धा जास्त प्रमाणात असते.

झिंक आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते.

त्याचबरोबर शरीरात नवीन पेशी तयार करणे आणि जखमा भरून काढणे यासाठी सुद्धा झिंक फायदेशीर असते.

आपल्या शरीरातली वास आणि चव ही इंद्रिये सुद्धा झिंकमुळे सुधारतात.

७. मधुमेह नियंत्रणात ठेवते

मसूर डाळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात ज्यामुळे पोट लवकर भरते पण त्याचबरोबर मसूर डाळीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते.

कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे अन्नपदार्थ हे मधुमेहींसाठी चांगले असतात.

मसूर डाळीत असलेल्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट
मुळे त्याचे पचन संथ गतीने होते आणि कार्बोहायड्रेटचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन ते हळूहळू रक्तात मिसळते.

मधुमेहींमध्ये काही खाल्यावर रक्तातली साखर एकदम वेगाने वाढते पण मसूर डाळ खाल्ल्याने ती तशी वाढत नाही.

८. ह्रदविकार दूर ठेवते

मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम ही खनिजे आपले ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असतात.

मसूर डाळीमध्ये ही तिन्ही खनिजे जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपले ह्रदय निरोगी राहते आणि ह्रदयविकाराचा धोका दूर ठेवते.

ह्रदयाच्या आरोग्यसाठी सोडियम आणि पोटॅशिअमचा समतोल असणे अत्यंत गरजेचे आहे.

सोडियम हे ह्रदयासाठी हानिकारक असते त्यामुळे पोटॅशिअम जास्त प्रमाणात आढळणारे पदार्थ हे ह्रदयासाठी लाभदायक असतात.

९. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

व्हिटॅमिन ‘बी’ बरोबरच मसूर डाळीत व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’ आणि ‘ई’ सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.

ही व्हिटॅमिन्स आपल्या डोळ्यांसाठी लाभदायक असतात.

म्हणूनच मसूर डाळीच्या नियमित सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि कॅटरॅक्ट सारखे डोळ्यांचे विकार दूर ठेवते.

ही बहुगुणी मसूर डाळ आपल्या स्वयंपाकघरात कायम असलीच पाहिजे, ही अशी खात्री हा लेख वाचून झाल्यावर तुम्हाला पटली असेलच.

इतर डाळींच्या तुलनेत मसूर डाळ शिजायला सुद्धा जास्त वेळ घेत नाही.

यामुळे अगदी सहज आपण वेगवेगळ्या प्रकारे तिचा वापर आपल्या जेवणात करू शकतो.

वरण, आमटी, खिचडी यामध्ये या डाळीचा अगदी सहज समावेश होऊ शकतो.

समतोल आहार घेणे आपल्या आरोग्याचा दृष्टीने गरजेचे आहेच त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुद्धा टाळला पाहिजे.

म्हणूनच या डाळीचा समावेश हा इतर डाळींच्या बरोबरीने योग्य प्रमाणातच केला तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होतो.

मसूर डाळीचे हे फायदे तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेयर करायला विसरू नका..

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!