मधाचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का?

मधाचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का?

मधाचा वापर अगदी प्राचीन काळापासून औषध म्हणून केला जातो.

आपल्या अनेक छोट्या-मोठ्या आजारांमध्ये घरगुती उपाय म्हणून मधाचा वापर आपणही करतो.

खरेतर आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधी दडलेल्या असतात.

काही आपल्याला अगदी तोंडपाठ असतात तर काही आपण काळाच्या ओघात विसरून गेलेलो असतो.

मधाचा वापर जसा औषध म्हणून केला जातो तसाच काहीजण जसे की मधुमेही किंवा ज्यांना वजन घटवायचे आहे असे, पदार्थात गोड चव येण्यासाठी साखरेऐवजी मधाचा वापर करतात.

माणसाने आज विज्ञान क्षेत्रात इतकी प्रगती केली आहे तरी देखील मध तयार करण्याची युक्ती त्याला साधली नाही.

मध हा एक असा पदार्थ आहे जो मिळवण्यासाठी आपल्याला केवळ मधमाश्यांवरच अवलंबून राहावे लागते.

मधमाशा वेगवेगळ्या फुलांमधला नेक्टर गोळा करतात आणि तो त्यांच्या पोटात तात्पुरता साठवतात.

हा साठवलेला नेक्टर मग त्या दुसऱ्या मधमाशीच्या तोंडात देतात.

तो फुलांमधील नेक्टर अर्धवट पचेपर्यंत ही क्रिया सुरु राहते आणि त्यानंतर हा मध मधमाश्यांच्या पोळ्यात जमा करून ठेवला जातो.

मध हा एक अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे ज्याचा फायदा वजन कमी करण्यापासून ते आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो.

आज या लेखात आम्ही तुम्हाला मधाचे असेच काही महत्वाचे फायदे आणि उपयोग सांगणार आहोत.

जेणेकरून मधाचा जास्तीतजास्त वापर तुम्ही योग्यप्रकारे करू शकाल.

१. एनर्जीचा चांगला स्त्रोत

एनर्जी ड्रिंक्समधून आपल्या शरीरावर फक्त साखरेचा मारा होत असतो.

पण मधात फक्त सुक्रोज नसते तर नैसर्गिक साखर असतात.

यामुळे साखरेला पर्याय म्हणून मधाचा वापर केला जाऊ शकतो.

दुधात साखरेऐवजी मध घालता येतो किंवा सरबतात सुद्धा साखरेऐवजी मधाचा वापर केला जाऊ शकतो.

मधामध्ये असलेल्या फ्रकटोज या साखरेमुळे व्यायाम करताना आलेला थकवा पटकन दूर होतो.

म्हणूनच मधाचा वापर वेगवेळ्या स्पोर्ट्समध्ये केला जातो तसेच ट्रेकिंग करताना अचानक थकवा वाटल्यास पटकन मध खायचा सल्ला दिला जातो, कारण त्यातून आपल्याला इन्स्टट एनर्जी मिळते.

मधात असलेल्या ग्लुकोजमुळे आपल्याला ही इन्स्टट एनर्जी मिळते तर त्यातील फ्रकटोजमुळे ती दीर्घकाळ टिकून राहते.

साखरेच्या तुलनेत मधामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहते.

२. खोकल्यावर खात्रीशीर औषध

मधात अनेक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे खोकला झालेला असताना मध घेतला तर त्यामुळे खोकून सतत दुखणाऱ्या घशाला आराम तर मिळतोच,

पण त्याचबरोबर खोकला निर्माण करणाऱ्या जीवाणूंना सुद्धा मारण्याचे काम मध करते.

खूप खोकला असल्यास नुसते दोन चमचे मध सकाळ संध्याकाळ घेतला तरी फायदा होतो.

पण मधात हळद, दालचिनी पूड असे इतर औषधी पदार्थ घातले तर त्याचा उपयोग जास्त पटकन होतो.

अनेक आयुर्वेदिक औषधे सुद्धा मधातूनच घेण्याचा सल्ला दिला जातो.

३. शांत झोपेसाठी फायदेशीर

रात्री लवकर झोप लागत नसेल तर मध हा त्यावरचा अगदी खात्रीशीर उपाय आहे.

कपभर दुधात एक चमचा मध घालून रात्री झोपायच्या आधी प्यायल्यास एकदम शांत आणि गाढ झोप लागते.

मधामुळे आपल्या शरीरात सिरोटोनिन या द्रव्याचे उत्पादन होते.

यामुळे आपला मूड सुधारतो त्यामुळे जर एखाद्या चिंतेमुळे किंवा काळजीमुळे आपल्याला झोप लागत नसेल तर ती तात्पुरते तरी ते विचार बंद होऊन आपले मन हलके होते ज्यामुळे झोप लागायला मदत होते.

४. भाजलेल्या जखमांवर औषध

मधामध्ये जास्त प्रमाणात असलेल्या साखर, म्हणजेच ग्लुकोज आणि फ्रकटोज पाणी शोषून घेण्यास मदत करतात.

यामुळे एखाद्या जखमेवर, कापलेल्यावर किंवा भाजलेल्या जखमेवर मध लावला तर जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होते.

वर आपण बघितलेच की मधात अनेक antibacterial गुणधर्म असतात त्यामुळे जखमेवर मध लावला तर त्यात होणारी इन्फेक्शन्स टळू शकतात.

जखमेमुळे आलेली सूज सुद्धा मध लावल्याने कमी होते तसेच लागलेल्या ठिकाणचे दुखणे कमी करण्यात सुद्धा मध उपयुक्त आहे.

५. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर

मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात.

यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याचबरोबर आपल्या शरीराच्या पेशींचे फ्री राडीक्ल्स पासून रक्षण करते.

हे फ्री राडीक्ल्स आपल्या शरीरातील पेशींसाठी धोकादायक असते.

रोज सकाळी अंशा पोटी अर्ध्या लिंबाचा रस, एक चमचा मध हे कोमट पाण्यात घालून घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त फायदा होतो.

निरोगी आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी नियमित मधाच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत.

६. हँगओव्हरवर उत्तम उपाय

मधामध्ये असलेल्या फ्रक्टोजमुळे आपल्या यकृतात (लिव्हरमध्ये) होणारे अल्कोहोलचे विघटन जलद होते.

म्हणूनच हँगओव्हरचा त्रास कमी करण्यासाठी मध हा एक चांगला आणि खात्रीशीर उपाय आहे.

हँगओव्हरमुळे जर डोकेदुखी, मळमळने, जास्त प्रमाणात तहान लागणे असे त्रास होत असतील तर दोन तीन चमचे मध नुसता घेतला तरी फायदा होतो.

मधामुळे आपले शरीर अल्कोहोल जास्त चांगल्या प्रकारे पचवू शकते, यामुळे मध घेतल्याने रक्तातील अल्कोहोलची पातळी सुद्धा फार पटकन खाली येते.

७. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले

मधामध्ये जास्त प्रमाणात आढळणारे पॉलीफोनिक अँटि-ऑक्सिडंट्स हे हृदयाच्या एकूण आरोग्यासाठी लाभदायक असतात.

यामुळे मधाच्या नियमित सेवनाने ह्र्दय निरोगी राहते व ह्रदयाच्या विकारांपासून आपले संरक्षण होते.

८. वजन घटवण्यासाठी उपयुक्त

रोज सकाळी काही खायच्या किंवा प्यायच्या आधी, म्हणजेच अंशा पोटी अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध जर कोमट पाण्यातून घेतला तर त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, खाल्लेले व्यवस्थित पचते आणि यामुळे आपल्या शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होते.

आपण खात असलेल्या गोड पदार्थांमध्ये सुद्धा साखरेऐवजी मधाचा वापर केल्याने हा फायदा होऊ शकतो.

९. निरोगी त्वचेसाठी फायदेशीर

कोरड्या त्वचेसाठी मध अत्यंत उपयुक्त आहे.

थंडीमुळे फुटलेल्या गुडघ्यांवर किंवा कोपराच्या मागच्या बाजूला मध लावल्याने तिथली त्वचा मऊ व्हायला मदत होते.

फुटलेल्या ओठांसाठी पण मध हा एक सोपा घरगुती उपाय आहे.

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडत असली तर बोटावर थोडा मध घेऊ चेहऱ्याला सगळीकडे लाऊन तीस

मिनिटांनी धुवून टाकला तर त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो.

एक चमचा मधात एक चमचा साखर घालून घरगुती स्क्रब सुद्धा तयार केला जाऊ शकतो.

यामुळे त्वचेवरच्या डेड स्कीन सेल्स निघून जायला मदत होते.

१०. कोंड्याच्या त्रासापासून सुटका

कोंड्यामुळे डोक्याला सतत खाज येते. एक चमचा मधात जर थोडे कोमट पाणी घालून तयार केलेले मिश्रण डोक्याला सगळीकडे अंघोळीच्या आधी तीन तास लाऊन ठेवले तर कोंड्यामुळे डोक्याला येणाऱ्या खाजेपासून आराम मिळतो आणि डोक्यातले कोंड्याचे प्रमाण सुद्धा कमी होते.

११. केसांसाठी लाभदायक

थंडीमुळे किंवा धूळ, प्रदूषण यामुळे केस राठ होऊन निस्तेज दिसायला लागतात.

अशा केसांना डीप कंडीशनिंगची गरज असते.

यासाठी जर मध आणि ओलिव्ह ओईलचे मिश्रण केसांना वीस मिनिटे चोळून ठेवले आणि मग नेहमीच्या शाम्पूने केस धुतले तर केसांना चांगले कंडीशनिंग होते आणि निस्तेज केसांना सुद्धा चमक येते.

मधाचे हे इतके उपयोग आणि फायदे आपण बघितले.

आपण हे सुद्धा आज बघितले की मधुमेहींसाठी किंवा ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे अशांसाठी साखरेला मध हा एक चांगला पर्याय आहे.

परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की मधात कॅलरी जास्त असतात.

साखरेपेक्षा मध बरा हे जरी खरे असले तरी त्याचे प्रमाणाबाहेर सेवन चांगले नाही.

मध विकत घेताना एक लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे मध विकत घेताना खात्रीशीर ठिकाणहून घ्यावा कारण काही विकत मिळणाऱ्या मधामध्ये साखरेच्या पाकची भेसळ केलेली असू शकते.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!