मुतखड्याच्या त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय

मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास आजकाल खूप जणांना होतो.

या त्रासात वेदनांची तीव्रता खूप जास्त असते.

खूप मोठे मुतखडे असतील तर ऑपरेशनला पर्याय नसतो पण जर खड्याचा आकार लहान असेल तर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देत नाहीत.

ते सहसा भरपूर पाणी पिऊन लघवीवाटे खडा निघून जाण्याची वाट बघतात.

तसा तो निघून जाताना खूप प्रमाणात दुखणे मात्र सहन करायला लागते.

हा त्रास हल्ली अनेकांच्या मागे लागलेला आहे.

काही आजारांवर औषधांच्या जोडीला घरगुती उपायांची गरज असते, हा सुद्धा असाच आजार आहे.

म्हणूनच या लेखातून आपण मुतखड्याच्या त्रासावर काही घरगुती उपाय बघणार आहोत.

मुतखड्याचा त्रास होण्यामागे बरीच कारणे असतात.

त्यातील महत्वाची कारणे म्हणजे पाणी कमी पिणे आणि लघवी खूप वेळासाठी दाबून धरल्याने.

इतर अनेक आजारांप्रमाणे या आजाराला सुद्धा आपली बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारातले बदल हे कारणीभूत आहेत.

शरीरातील क्षार, खनिजे यांचे चयापचय नीट न झाल्याने हा त्रास होतो.

आहारात प्रथिनांचा गरजेपेक्षा जास्त समावेश, जास्त खारट पदार्थांचे सेवन, दीर्घ काळ काल्शियम आणि व्हिटामिन ‘डी’ च्या गोळ्या घेतल्याने रक्तातील कॅल्शियमची वाढ होऊन सुद्धा हा त्रास होऊ शकतो.

या दरम्यान लघवीचे प्रमाण कमी झाल्यास मुतखडा तयार होतो.

लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किडनीमध्ये साठून किडनीमध्ये मुतखडे तयार होतात ते प्रामुख्याने ‘कॅल्शियम ऑक्सालेटचे’ असतात, युरिक ऍसिडचे खडे क्वचित असू शकतात.

मुतखडा झाल्यावर, वर म्हटल्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात वेदना होतात.

पाठीत, पोटात दुखणे, वारंवार लघवीला जावे लागणे व लघवी करताना जळजळ होणे, मुतखड्यामुळे लघवी थांबून राहून, वेदना झाल्याने मळमळून उलट्या होणे यासारखे अनेक त्रास, मुतखडा झाल्यावर, तो लघवीवाटे बाहेर पडायची वाट बघत असताना सहन करावे लागतात.

हे त्रास कमी व्हावेत आणि खडा लवकर बाहेर पडावा यासाठी हे काही घरगुती उपाय आहेत ज्यांचा या दुखण्यात फायदा होतो.

१. भरपूर पाणी प्या

मुतखडा लघवीवाटे बाहेर पडावा यासाठी साहजिकच उत्तम उपाय म्हणजे भरपूर पाणी पिऊन लघवीचे प्रमाण वाढवणे.

दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

२. तुळशीची पाने

तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषध आहे. तुळस हे एक डाययुरेटीक आहे, म्हणजेच तुळशीमुळे लघवीचे प्रमाण वाढते.

तुळशीची पाने मिक्सरमधून वाटून त्याचा दोन चमचे रस रोज प्यायल्याने खडा लघवीवाटे लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होते.

तुळशीची पाने वाटून न घेता नुसती चावून खाल्ली तरी फायदेशीर असतात.

तुळशीचे बी रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यायल्याने सुद्धा फायदा होतो.

नुसते तुळशीचे बी पाण्यात भिजवून खायला कसेतरी होत असेल तर हे बी आपण सरबतात घालून सुद्धा घेऊ शकतो.

तुळशीमुळे दुखणे सुद्धा कमी होते आणि यामुळे आपले पाणी प्यायचे प्रमाण सुद्धा वाढते.

३. लिंबाचा रस

लिंबात आढळणारे सायट्रिक ऍसिड हे रसायन शरीरात कॅल्शियमचा साठा होऊ देत नाही.

लिंबाच्या रसाने शरीरात असलेले हे कॅल्शियमचे खडे विरघळायला मदत होतो.

या मुतखड्यांचा आकार लहान झाला की ते लघवीवाटे सहज निघून जाऊ शकतात.

म्हणूनच मुतखड्याचा त्रास होत असेल तर लिंबाचा रस हा एक उत्तम उपाय आहे.

तसेच लिंबाच्या रसाच्या नियमित सेवनाने नवीन खडे सुद्धा तयार होत नाहीत.

यासाठी आपण दिवसभरातून सारखे लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत घेत राहू शकतो.

आपल्या स्वयंपाकात सुद्धा लिंबाचा वापर जास्तीतजास्त केल्याने फायदा होतो.

४. डाळींबाचा रस

डाळींबाचा उपयोग किडनीच्या विकारांवर केला जातो. डाळिंबाच्या रसात आढळणाऱ्या antioxidants मुळे मुतखडे आपल्या शरीरातून बाहेर फेकले जातात.

यामुळे किडनीचे इतर विकारही दूर होतात.

डाळिंबाच्या रसाच्या नियमित सेवनाने मुतखडे जसे लवकर विरघळतात तसे ते तयार व्हायला सुद्धा आळा बसतो.

५. राजमा

राजमाचे किडनी आणि मूत्राशयाच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

मुतखड्याचा त्रास होत असेल तर राजमा भरपूर पाण्यात घालून शिजवायचा.

राजमा शिजल्यावर त्यातील राजमा काढून घेऊन ते शिजवलेले पाणी दिवसभर थोडे थोडे पीत राहावे.

असे केल्याने मुतखडा लवकर बाहेर पडण्यास मदत होते.

६. गव्हाचा पाला

गहू पेरल्यावर उगवून येणारा पहिला ताजा पाला, म्हणजेच व्हीटग्रास.

याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मुतखडा शरीराबाहेर फेकायला गव्हाचा पाला फायदेशीर असतो कारण याच्या सेवनाने आपले लघवीचे प्रमाण वाढते.

ताज्या गव्हाच्या पाल्याचा रस काढून रोज छोटे भांडे भरून प्यायल्याने फायदा होतो.

काहींना या रसामुळे उलटीसारखे वाटणे, मळमळने यासारखे त्रास होऊ शकतात म्हणून हा रस शक्यतो सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटीच घ्यावा.

७. कांद्याचा रस

कांद्यामुळे मुतखड्यांचा आकार लहान होऊन ते लघवीवाटे बाहेर लवकर फेकले जातात.

नुसता कांदा खाण्यापेक्षा त्याचा रस काढून घेतला तर जास्त प्रमाणात पोटात जातो.

म्हणून मुतखड्याचा त्रास असेल तर सकाळी उठल्यावर अंशापोटी थोडा कांद्याचा रस प्यावा.

८. जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा

मिठामध्ये अढळणाऱ्या सोडियममुळे लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण वाढते.

हा मुतखडा तयार होण्यासाठीचा एक सांभाव्य धोका आहे.

म्हणून ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी जास्त प्रमाणात लोणची, पापड याचे सेवन टाळावे.

९. नॉनव्हेजचे प्रमाण कमी ठेवा

नॉनव्हेजमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आढळतात.

प्रोटीनच्या गरजेपेक्षा जास्त सेवनाने लघवीवाटे बाहेर पडणारे कॅल्शियमचे प्रमाण वाढते.

यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते.

नॉनव्हेजमध्ये प्युरीन्स सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील युरीक असिडचे प्रमाण वाढते आणि युरिक असिडचे खडे होण्याचा धोका निर्माण होतो.

१०. आहारात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवा

मॅग्नेशियममुळे शरीरातील कॅल्शियम ऑक्सालेटचे प्रमाण कमी होते ज्यामुळे नवीन मुतखडे तयार होण्यास अटकाव होतो.

म्हणूनच ज्या पदार्थांमध्ये माग्नेशियम जास्त प्रमाणात असतात असे पदार्थ जास्त खावेत.

पालक, केळी, दही, बटाटा, ब्रोकोली, दुध, सफरचंद यामध्ये माग्नेशियम जास्त प्रमाणात अढळतात.

११. कोथींबीर

कोथींबीर बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात बारीक चिरलेली कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ ग्लास ठीक १५ दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक स्टोन निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्णपणे साफ होईल.

मुतखडा होण्याची शक्यता खालील कारणांने वाढते.

ज्यांना एकदा मुतखडा होतो, त्यांना तो परत होण्याची शक्यता जास्त असते.

घरगुती उपायांबरोबरच कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे देखील महत्वाचे असते.

म्हणूनच या लेखाच्या पुढच्या भागात आपण मुतखडा कशामुळे होतो हे बघणार आहोत जेणेकरून या गोष्टी आपल्याला शक्य तितक्या टाळता येतील.

  • पाणी कमी प्यायल्याने.
  • विहीर किंवा बोअरवेलचे क्षारयुक्त पाणी प्यायल्याने.
  • लघवी जास्त वेळ रोखून धरण्याच्या सवयीमुळे.
  • अनुवांशिक.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मुतखड्याच्या त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय”

  1. मुतखडा हा आजार हल्ली बऱ्याच प्रमाणात दिसून येतो आणि त्यासाठी आपण घरच्या घरी करता येतील अशा बऱ्याच वेगवेगळ्या उपायांची माहिती सादर केली आहे. त्याचा सर्वांनाच फायदा होईल.
    त्याबद्दल मनाचे talks टीम ला मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय