जाणून घ्या प्रगतीपथावर पोहोचण्याचे ६ सोपे मार्ग..!

प्रगती पथावर पोहोचण्याचे ६ सोपे मार्ग मराठी प्रेरणादायी

माणसाला आयुष्यात ठरवलेले उद्दीष्ट साध्य करायचे असेल तर आणि आर्थिक स्थेर्य प्राप्त करून सुख, संपत्ती, सुबत्ता या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्याची प्रगतीपथावर योग्य दिशेने वाटचाल होणे आवश्यक आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगतीचे वेगवेगळे मूल्यमापन असते.

https://www.manachetalks.com/12154/goal-setting-marathi-motivation-article/

प्रत्येकाची ध्येयं, स्वप्ने ही वेगवेगळी असतात.

काहींनी शाळेत असतानाच विशिष्ट ध्येय गाठण्याचे मनाशी ठरवले असते तर काही परिस्थिती पाहून आपली ध्येय ठरवतात आणि पूर्ण करण्यासाठी प्राणाची बाजी लावतात.

या लेखात आपण हेच पाहणार आहोत, की प्रगतीपथावर पोहोचण्यासाठी कोणते ६ मार्ग वापरता येतील.

आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी अडीअडचणींचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो.

काहीवेळा या अडचणींचे स्वरूप सौम्य असते तर काहीवेळेस कठीण.

तुम्ही पण तुमच्या आयुष्यात अजूनही स्ट्रगल करत आहात?

योग्य ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वाट सापडत नाही? मग हा लेख जरूर वाचा.

माणूस जन्मल्यानंतर त्याला जशी समज येऊ लागते तसतसा तो स्वप्ने बघायला लागतो.

आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याच्या मागे ही लागतो. पण प्रत्येकाचीच सगळी स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही..!

प्रयत्न करणाऱ्या माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहावे मार्ग नक्कीच सापडतो!

फक्त स्वप्नांचा पाठपुरावा करणे सोडले तरच स्वप्न पूर्ण होण्याची राहून जातात.

एकदा का माणसाने ध्येय पूर्ण करण्याचे डोक्यात घेतले की तडीस नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे. यश नक्कीच मिळते.

अगदी असच काहीसं.

अपेक्षित ध्येयप्राप्तीचे स्वप्न जर डोक्यात आणि मनात फिट्ट बसवले तर सतत डोक्यात ते कसं पूर्ण होईल असाच विचार मनात येत राहतो आणि त्या दृष्टीने नवनवीन कल्पना सुचत जातात.

१. निश्चित ध्येय समजून घ्या

सतत बदलणारे ध्येय मनात ठेवल्यास एक ही पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी क्रमाक्रमाने एक एक पायरी ओलांडत पुढे गेल्यास नक्कीच फायदा होतो.

त्यातील हे काही प्रकार

  • शिक्षण
  • करिअर
  • लग्न
  • आरोग्य
  • आर्थिक स्थिती
  • नातेसंबंध
  • वैयक्तिक गोष्टी

यातील प्रत्येक गोष्टीचा पुढच्या गोष्टीशी संबंध आहे.

शिक्षण मग त्यांनतर व्यवसाय नाहीतर नोकरी करण्यात येते.

कालांतराने लग्न होतं. आर्थिक स्थिती सुरळीत असेल तर आरोग्य ही उत्तम राहते.

घरात, नातेसंबंधात तणाव राहत नाही. कसलेही कर्ज डोक्यावर नसल्याने माणूस निर्धोक पणे आपलं आयुष्य आनंदात जगू शकतो.

या सगळ्या गोष्टी प्रगतीच्या दृष्टीने खुपच म्हत्वाच्या आहेत. या टप्प्या टप्प्यात पार पडल्या की आपली अर्धी प्रगती झाली असे समजावे.

२. चढत्या क्रमाने ध्येयाची आखणी करा.

यशप्राप्ती साठी उद्दीष्टांची आखणी करताना छोटी ध्येय, मग मध्यम ध्येय आणि मग मोठे ध्येय अशा प्रकारे आखणी केल्यास हळूहळू सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्णत्वा कडे नेणे सोपे जाते.

प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असताना माणसाकडून ज्या काही चुका होतात, त्यातुन शिकवण मिळत जाते,

वेगवेगळे कडू-गोड अनुभव येतात आणि माणूस शिकत जातो.

आणि पुढे जाऊन झालेल्या चुका टाळत माणूस आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतो.

ध्येय प्राप्ती करण्यासाठी तुमच्यात स्मार्टनेस असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

उदा. तुम्ही जर विक्री क्षेत्रात काम करत असाल तर, तुमचे राहणीमान, बोलणे, तुम्हाला असलेली नवनवीन माहिती याच्या जोरावर तुम्ही यशस्वी होऊ शकता.

३. तुमची ध्येय लिखित स्वरूपात मांडा

ध्येयाच्या प्राप्तीसाठी, त्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सतत त्याचा विचार डोक्यात आणि मनात येणे गरजेचे आहे.

आणि असे होण्यासाठी ते ध्येय लिखित स्वरूपात कागदावर सतत डोळ्यासमोर असणे मस्ट आहे….

जेणेकरून येताजाता ते तुमच्या नजरेसमोर राहून वाचले
जाईल.

ठरवलेलं ध्येय कागदावर लिहून कपाटावर अथवा भिंतीवर ठसठशीत अक्षरात लावल्याने मनाची विचारक्षमता त्या दृष्टीने मनन करू लागते.

जसजशी प्रगती होत जाईल तसतशी त्यात बदल करत जा. नवीन उद्दिष्टे ऍड करत रहा.!

४. ध्येयाच्या प्राप्तीसाठी सगळ्या गोष्टी एकदम होऊन ध्येयप्राप्ती होणे शक्य नसते.

हळूहळू माणसाचा विकास होत राहतो. यासाठी त्याच्या डोक्यात सकारात्मक विचार येणे ही गरजेचे आहे.

एकदा का त्याने असा विचार करायची चांगली सवय लावून घेतली तर नक्कीच त्याची प्रगती होईल.

उदाहरणार्थ. जर तुमच्या आयुष्यात जर, एखादा बदल होणार असेल, आणि तो होणे अपरिहार्य असेल.

तर त्यासाठी घाबरून जाऊन चालेल का?

अशा वेळी हा बदल आपल्या आयुष्यातला एक पॉझिटिव्ह माईल् स्टोन अशी दुर्दम्य इच्छाशक्ती जर तुमच्यात असेल, तुमची सगळी ध्येयं तुमच्या पायाशी लोटांगण घालत येतील….

विचारांनी माणूस घडत जातो हे ही तितकेच खरे.

सकारात्मक विचार कायम ठेवल्याने अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्यासाठी मनाला उभारी मिळते आणि हेच महत्वाचे आहे.

काही वेळेस एखाद्या कार्यात अपयश आले की माणूस प्रयत्न करून द्यायचं सोडून देतो, त्याच्या मनात नकारात्मक भावना मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात.

परंतु असे न होऊ देण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करायचा आहे. शेवटी वाईटातुन ही काहीतरी चांगले होतेच की!!!

५. आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक दिशेने कसा ठेवाल?

असं म्हणतात दृष्टी तशी सृष्टी.

जसा माणूस विचार करतो तसं त्याला समोर घडतंय अस वाटत राहतं.

म्हणून कोणत्याही परिस्थितीत घडणाऱ्या गोष्टीकडे मग ती चांगली असो वा वाईट त्याकडे सकारात्मक हेतूने पहा.

रोज सकाळी उठल्यानंतर आज मला माझा हेतू साध्य करण्यासाठी काय करावे लागेल हे स्वतःच्या मनाला सकारात्मकतेने सांगा.

म्हणजे मनात आलेल्या सृजनशील सकारात्मक विकासाचा धागा पकडून मेंदू तसेच कार्याची रूपरेषा ठरवेल.

सकारात्मक विचार कायम राहण्यासाठी नेहमी जे लोक तुम्हाला तुमच्या कार्यात पाठिंबा देतील, नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देतील अशा सकारात्मक लोकांसोबत नेहमी रहा.

त्यांना तुमच्या मनातील पुढील कार्याचे विचार सांगा त्यातून ही बोलून ते तुम्हाला त्यातील त्रुटी अथवा काही उणीव असेल तर निदर्शनास आणून देतील.

६. मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करा.

प्रगती म्हंटली की त्यात माणूस नेहमी पुढे ही जातो अथवा आहे तिथेच थांबतो.

जेव्हा तुम्हाला ठरवलेल्या एखाद्या ध्येयाची प्राप्ती होते, तेव्हा समजा की तुम्ही प्रगत होण्याकडे एक पाऊल यशस्वीरीतीने पुढे टाकले आहे.

छानशी पार्टी ठेवा. त्यात तुमच्या आवडीची गाणी, जेवण आणि सोबतीला तुमच्या यशाच्या आनंदात सहभागी असणारी माणसे.!

या सगळ्यामुळे तुमचा आत्मविश्वास अजून मजबूत होईल आणि पुढचे टप्पे पार पाडण्यासाठी तुमचे मनोबल नक्कीच वाढेल.

ध्येय आणि उद्दिष्टे हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग असतात.

तुम्ही जिद्दीने तुमची स्वप्ने पूर्ण करता तेव्हा आयुष्याला एक आकार येतो.

यासाठी आपले योगदान दिल्याने समाजात आपली प्रतिमा ही उंचावते आणि विकास ही प्रभावीपणे होतो.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!