खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या भारतीय जेवणात मसाल्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खसखस.

इंग्लिशमध्ये याला ‘पॉपी सीड्स’ म्हणतात. खसखस म्हणजे या पॉपीच्या झाडांच्या बिया.  

या खसखशीचे तीन प्रकार आहेत.

१. पांढरी खसखस – जी सहसा आपल्या भारतीय स्वयंपाकात वापरली जाते. 

२. ब्लू खसखस – ही खसखस युरोपीअन पॉपी सीड्स या नावाने सुद्धा ओळखली जाते.

ही सहसा बेकिंगमध्ये वापरली जाते. 

३. ओरिएन्टल पॉपी सीड्स – यातून ऑपीअमचे (एकप्रकारचे ड्रग) उत्पादन केले जाते.

वर म्हटल्या प्रमाणे आपल्या स्वयंपाकात आपण पांढऱ्या खसखशीचा वापर करतो.

खसखशीमुळे ग्रेव्हीच्या भाज्यांना एक विशिष्ट चव आणि सुगंध येतो.

गोडाच्या पदार्थांमध्ये सुद्धा खसखस वापरली जाते. कबाबवर खसखस भुरभूरवली जाते ज्यामुळे कबाब कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात. 

खरेतर अत्यंत कमी प्रमाणात वापरली जात असून सुद्धा खसखस आपल्या जेवणातील एक महत्वाचा घटक आहे.

पण त्याव्यतिरिक्त सुद्धा  तिचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.

प्राचीन काळापासून खसखस दुखण्यावर उपाय म्हणून वापरली जाते.

पूर्वी रडणाऱ्या बाळांना थोडी खसखस मधातून देण्याची पद्धत होती.

ज्यामुळे ती शांत होत असत. आता खसखस अशाप्रकारे वापरली जात नसली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

मनाचेTalks वर वैविध्यपूर्ण माहिती नेहमीच दिली जाते.

या खसखशीचे आपल्याला होणारे फायदे.

१. निद्रानाशावर हमखास उपाय 

खसखस ही आपल्या मनाला शांत करून आपल्या मनावर असलेला ताण (स्ट्रेस) कमी करते.

खसखशीत मॅग्नेशिअम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.

या खनिजामुळे शरीरातील काॅरटीसाॅल, जे एक स्ट्रेस हार्मोन आहे ते कमी होते.

यामुळे मन शांत होऊन, झोप लागण्यासाठी मदत होते.

ज्यांना रात्री लवकर झोप लागत नाही अशांनी थोडी खसखस भाजून त्यात किंचित दुध घालून ती मिक्सरला वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी.

ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधाबरोबर घेतली तर गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते. 

२. हाडांच्या आरोग्यासाठी लाभदायक 

खसखशीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते.

आपल्या हाडांमधील मुख्य घटक कॅल्शियम असल्याने हाडे आरोग्यपूर्ण आणि बळकट होण्यासाठी कॅल्शियम गरजेचे असते.

कॅल्शियम बरोबरच झिंक आणि कॉपर ही खनिजे सुद्धा खसखशीत जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे हाडांचे मास, ज्याला ‘बोन मिनरल डेन्सिटी’ म्हणतात ते वाढते.

खसखशीमध्ये मँगनीज सुद्धा जास्त प्रमाणात असतात.

यामुळे आपल्या शरीरात कोलॅजन या प्रथिनाची निर्मिती होते. या कोलॅजनमुळे हाडे मजबूत होतात. 

२. बद्धतकोष्टतेवर फायदेशीर 

खसखशीत फायबर जास्त प्रमाणात असतात. फायबरमुळे आपली पचनशक्ती सुधारते.

अन्न पचण्यासाठी आहारात फायबर जास्त प्रमाणात घेणे अत्यंत गरजेचे आहे.

फायबरमुळे अपचनाच्या तक्रारी जसे की बद्धकोष्ठता यासारखे त्रास होत नाहीत. 

३. रक्तदाब नियंत्रित ठेवते 

‘ओलेईक ऍसिड’ हे खसखशीत असणारे घटक आपल्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा किंवा ‘लो ब्लड प्रेशरचा’ त्रास आहे त्यांनी आहारात खसखशीचा योग्य प्रमाणात समावेश केला तर वाढलेला रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते.

तसेच जर रक्तदाब खूप कमी असेल तर तो नियंत्रणात आणण्यास मदत होते. 

४. दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

खसखसमध्ये मॉरफिन, कॉडीन ही द्रवे आढळतात.

याला ऑपीयम कंपाऊंड म्हणतात. यामुळे दुखणे कमी होऊन, आराम मिळतो.

पेनकिलर्समध्ये या द्रव्यांचा वापर केला जातो. खसखस पूर्वापार दुखणे कमी करण्यासाठी, विशेषतः बाळंतपणात वापरली जाते.

हल्ली, याचा गैरवापर होऊ नये म्हणून बाजारात जी खसखस विकत मिळते ती सहसा स्वच्छ केलेली असते आणि त्यामध्ये ही ऑपीयम कंपाऊंड आढळत नाहीत.

पण जर स्वच्छ न केलेली खसखस मिळाली तर त्याचा उपयोग पेन किलर म्हणून केला जाऊ शकतो.

पण अशी खसखस खाण्याचे धोके सुद्धा आहेत. सहसा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे उपाय करू नयेत. 

५. बायकांची प्रजोत्पादन क्षमता वाढते 

खसखशीच्या बियांमधून काढलेले तेल, हे ज्या बायकांना गर्भधारणा करायला काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर असते.

अशांनी जर रोज थोड्या प्रमाणात खसखस खाल्ली तर त्यांची प्रजोत्पादन क्षमता वाढते.

बायकांचे अंडाशय आणि गर्भपिशवी याला जोडणारी जी ट्यूब (फॅलोपीअन ट्यूब) असते त्यामध्ये कधी कधी काही पेशी अडकून बसतात ज्यामुळे अंडाशयातून स्त्रीबीज गर्भपिशवीत येऊ शकत नाही.

खसखशीमुळे या ट्यूबमध्ये अडकलेल्या अतिरिक्त पेशी विरघळून जातत् ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. 

६. ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर 

खसखशीत ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात जे आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.

यामुळे आपल्या शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढते व बॅड कोलेस्टेरॉल कमी होते ज्यामुळे ह्र्दयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. 

७. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते 

आपल्या रक्तातील तांबड्या पेशी या हिमोग्लोबिनच्या सहाय्याने शरीरातील इतर पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात.

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ऍनेमिया हा आजार होतो.

आपल्या आहारातून आयर्न हे खनिज जास्त प्रमाणात आपल्या शरीरात गेले तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

खसखशीत आयर्न भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे ऍनेमियावर हा एक घरगुती उपाय आहे. 

८. रोग प्रतिकारशक्ती वाढवते 

खसखशीत झिंक हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.

आपली रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी झिंक अतिशय उपयुक्त असते.

सर्दी, खोकला, ताप यासारखे विकार दूर ठेवण्यात झिंकचा विशेष उपयोग होतो.

म्हणून ज्यांना वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास होतो त्यांना खसखस अतिशय उपयुक्त ठरते. 

९. मूतखड्यावर घरगुती उपाय 

मूतखडे विरघळून, लघवीवाटे बाहेर पडावेत यासाठी खसखस वापरली जाते.

खसखशीत जास्त प्रमाणात आढळणाऱ्या पॉटाशीयममुळे मूतखडे विरघळतात व पुन्हा तयार होत नाहीत. 

खसखस खाण्याचे अनेक फायदे आपण बघितले. आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या या पदार्थाचे इतके गुण माहीत झाल्यावर त्याचा वापर आपल्या आहारात करणे क्रमपात्रच आहे.

पण या व्यतिरिक्त सुद्धा खसखशीचे इतर ही काही फायदे आहेत.

खसखस ही आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

तेलकट त्वचा, पिंपल्स यासारख्या त्रासांवर खसखस एक हमखास उपाय आहे.

खसखस दुधाबरोबर वाटून, त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने लगेच फरक दिसून येतो.

त्याचबरोबर केसातील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी सुद्धा खसखस वापरली जाऊ शकते.

रात्रभर पाण्यात भिजत घातलेली खसखस सकाळी वाटून, त्यात दही घालून पेस्ट तयार करून घ्यायची. हि पेस्ट केसांना, डोक्याला लाऊन साधारण २० मिनिटे ते अर्धा तास ठेवायची आणि नंतर केस व्यवस्थित धुवून घ्यायचे.

हे नियमितपणे केले तर कोंडा आणि केसांच्या इतर समस्या दूर होऊन केसांची वाढ चांगली होते. 

मित्रमैत्रिणींनो, या बहुगुणी खसखशीचा वापर, ग्रेव्ही मध्ये, खिरींमध्ये केला जाऊ शकतो. तसेच पाश्चात्य पदार्थ करताना ब्रेड किंवा केक याच्या गार्निशिंगसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. 

फक्त खसखस वापरताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे खसखस अत्यंत कमी प्रमाणात वापरावी. 

खसखशीत आढळणाऱ्या ऑपीयममुळे त्याचा अनेक वेळा ड्रग म्हणून गैरवापर केला जातो.

सहसा खसखस विकण्यापूर्वी त्यातील ऑपीयम धुवून टाकले जाते.

पण जर स्वच्छ करून त्यातील ऑपीअम काढून घेतलेली खसखस मिळाली नाही तर त्याच्या सेवनामुळे अति झोप येणे यासारखे परिणाम होऊन आपल्याला त्याची सवय लागण्याची शक्यता असते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!