तिळाचे आहार आणि तब्येतीच्या दृष्टीने होतात हे १५ फायदे

‘तिळा तिळा दार उघड’, ‘एक तिळ सात जणात वाटून खावा’, ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ तर इतका हा तिळ सगळ्यांच्या जिवाभावाचा.

अर्थात त्याचे तसे गुणधर्म आहेत.

तेलबियांपैकी एक प्रकार म्हणजे तिळ.

त्यातली स्निग्धता, मृदुपणा यामुळे तिळ औषधी घटक आहे.

तिळामुळे अन्नाची चव तर वाढतेच तसेच पौष्टिकताही वाढते.

भारतीय आयुर्वेदाने तर केव्हाच तिळाचं महत्त्व जाणलं आहे.

विशेषतः थंडीत तिळाच्या सेवनाने उष्णता वाढते.

तिळाच्या तेलाने अभ्यंग केल्यास त्वचा मृदु राहते.

तिळाचे प्रकारही आहेत तसे त्याचे गुणधर्म आहेत.

चला तर आजच्या लेखात पाहुया तिळाविषयी आणखी माहिती,.

आपण रोज वापरतो ते तिळ म्हणजे काय तर सेसम इंडिकम नावाच्या वनस्पतींच्या शेंगेतलं बी.

या बियांना टरफलाचं टणक आवरण असतं.

हे टरफलसुद्धा खाण्यायोग्य असतं. टरफलासह असताना तिळाचा रंग काळपट तपकिरी असतो.

टरफल काढल्यावर आत पांढरे तीळ असतात.

तिळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या औषधांमधे तिळाच्या अंशाचा वापर होतोच.

विशेषतः संधिवात, मधुमेह, ह्रदयरोग यासाठी तिळाचं महत्त्व खूप आहे.

अशा दुर्धर आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी दररोज ठराविक प्रमाणात तिळाचे सेवन उपयुक्त आहे.

म्हणूनच या लेखात आपण तिळाचे १५ उपयोग काय आहेत ते पाहुया.

१. तीळ हा एक उत्तम तंतुमय पदार्थ आहे :

टरफलासह असलेले साधारण तीन चमचे तीळ (३०ग्रॅम) साधारण ३.५ ग्रॅम फायबर देतात.

त्यामुळे योग्य प्रमाणात रोज तिळाचे सेवन केल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण वाढवता येते.

शरिरात फायबरच प्रमाण जितकं चांगलं तितकी पचनशक्ती उत्तम राहते.

खरतर उत्तम पचनशक्ती हा उत्तम आरोग्याचा पाया आहे.

त्यामुळे मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, स्थुलता यावर तीळ हा उत्तम उपाय आहे.

२. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते :

चांगल्या पचनाबरोबरच तीळ शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.

त्याचा परिणाम म्हणजे ह्रदयरोग दूर ठेवता येतो.

शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयरोगाचे कारण ठरू शकते.

तिळात सॅच्युरेटेड फॅट्स १५%, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स ४१%, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स ३९% असतात.

संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पॉलिअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हे सॅच्युरेटेड फॅट्स पेक्षा कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

याशिवाय तिळात लिग्नान्स आणि फायटोस्टेरॉल्स हे वनस्पती घटक असतात.

तेसुद्धा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायला मदत करतात.

एका प्रयोगात असं दिसून आलं आहे की उच्च रक्तदाब असलेल्या काही लोकांनी पाच चमचे (४० ग्रॅम) सोललेले तीळ सलग दोन महिने खाल्ले.

त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या शरीरातील १०% LDL कोलेस्ट्रॉल, ८% ट्रायग्लिसराईड्स कमी झाले. जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

३. वनस्पतीजन्य प्रथिनांचा उत्तम स्रोत :

तीन चमचे तीळ (३० ग्रॅम) खाल्ले तर ५ ग्रॅम प्रथिनं शरीराला मिळतात.

पांढरे तीळ भाजल्यावर आणखी प्रथिनं शरीराला मिळतात.

कारण तीळ भाजल्यावर त्यातील ऑक्झेलेट्स आणि फायटेट्स कमी होतात.

त्यामुळे जास्त प्रथिनं शरीराला मिळतात

आणि पचनशक्ती सुधारायला मदत होते.

स्नायूंची बळकटी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी प्रथिनं आवश्यक असतात.

त्यासाठी आहारात तिळाचा वापर आवश्यक आहे.

तिळामधे लायसिन कमी प्रमाणात असतं जे उत्तम अमिनो ऍसिड आहे.

याची गरज मांसाहारातून भागवली जाते. शाकाहारी लोकांनी त्यासाठी इतर कडधान्यांचा जरुर वापर करावा.

पण तिळामधे मिथिओनाईन आणि सिस्टिनचं प्रमाण मुबलक आहे .

थोडक्यात असं सांगता येईल की शरीराच्या मजबूत बांध्यासाठी प्रथिनांची गरज पांढरे तीळ वापरून भागवली जाऊ शकते.

४. रक्तदाब नियंत्रणासाठी :

उच्च रक्तदाब केव्हाही घातकच ठरतो.

म्हणून तिळात असलेलं मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात महत्त्वाचे आहे.

याशिवाय तिळात असलेलं लिग्नन्स, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडन्ट रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

एका प्रयोगात उच्च रक्तदाब असलेल्या काही लोकांना काळ्या तिळाची २.५ ग्रॅम पावडर कॅप्सूलमधून दिली.

एक महिन्याने असं लक्षात आलं की त्यांच सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ६% कमी झालं.

थोडक्यात तिळात असलेलं मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडन्ट रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.

५. हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त :

तिळ हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचे ठरतात. त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनिज, झिंक यासाठी उपयुक्त आहेत. विशेषतः काळ्या तिळात हे प्रमाण जास्त आहे. तिळात आॅक्सिलेट्स आणि फायटेट्स असल्याने ते भाजून वापरणं चांगल असत. त्यामुळे तिळातील खनिजं सहजपणे शरिरात शोषली जातात.

६. शरीरातील मंद ऊर्जा नियंत्रण करण्यासाठी :

शरिरात अन्नाच पचन होण्यासाठी एक ऊर्जा सतत कार्यरत असते. तिचं काम सुरळीत ठेवण्यासाठी तीळ महत्वाचे असतात. ही ऊर्जा कमी झाली तर स्थुलता, हृदयरोग, कर्करोग, यकृताचे आजार होऊ शकतात.
ज्यांना यकृताचा आजार आहे त्यांनी १८ ग्रॅम जवस, ६ ग्रॅम प्रत्येकी तीळ आणि भोपळ्याच्या बिया एकत्र करून खाव्या. तीन महिने रोज हे केल्याने ५०% – ८०% ऊर्जा सुधारते.

७. बी व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत :

तिळामधे बी व्हिटॅमिनचे काही घटक मुबलक आहेत. विशेषतः टरफलात ते जास्त असतात. त्यामुळे टरफलासहीत तीळ वापरणं उत्तम. शरीराच मेटॅबोलिझम सुधारण्यासाठी आणि पेशींच काम सुरळीत ठेवण्यासाठी बी व्हिटॅमिन महत्त्वाचे आहे. ही गरज तिळाच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते.
तीळ थियामाईन, निआसिन, व्हिटॅमिन बी६ चे उत्तम स्रोत आहे .

८. शरिरात पेशींच्या वाढीसाठी उपयुक्त :

तीळ भाजून किंवा भिजवून खाल्ले तर त्यातील खनिजं सहजपणे शरिरात शोषली जातात. ती म्हणजे लोह, तांबे, व्हिटॅमिन बी ६. ही खनिजं शरीरात रक्तपेशी वाढवण्यासाठी आणि त्यांचे काम सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

९. रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त :

तिळात कर्बोदकांपेक्षा प्रथिनं जास्त असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत होते. तसेच तिळातील घटक पचनशक्ती सुधारतात. त्यामुळे मधुमेहाची शक्यता कमी होते. ब्रेड, पास्ता असे पदार्थ सहज पचण्यासाठी तीळ उपयुक्त आहेत.

१०. मुबलक अँटिऑक्सिडन्ट :

शरीराला अॅंटिआॉक्सिडंट्सचा पुरवठा होण्यासाठी तीळ महत्वाचे ठरतात. तिळात असलेलं ई व्हिटॅमिन ज्याला गामा टोकोफेरॉल असही म्हणतात ते हृदयरोग रोखण्यासाठी उपयुक्त आहे.

११. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त :

तीळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी आणि ई यांनी परिपूर्ण आहेत. त्यामुळे पेशींच काम सुरळीत होऊन, प्रतिकारशक्ती वाढते.

१२. संधिवात आणि गुडघेदुखी कमी करण्यासाठी :

तिळात अॅंटिआॅक्सिडंट मुबलक असल्याने शरिरात ऊर्जा कायम राखायला मदत होते. ही ऊर्जा संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
दोन महिन्यांच्या अभ्यासात असं दिसून आलं की , गुडघेदुखी असलेल्या काही लोकांनी ५ चमचे(४०ग्रॅम) तिळाची पावडर रोज औषध म्हणून घेतली त्यांचा गुडघेदुखी त्रास ६३% कमी झाला. तर नेहमीची औषधं घेणारांचा त्रास केवळ २२% कमी झाला.

१३. थायराॅईड नियंत्रणासाठी उपयुक्त :

थायरॉईड ग्रंथीच्या नियंत्रणासाठी तिळातील सेलेनियम घटक उपयुक्त ठरतो. तसेच त्यातील लोह, तांबे, कॅल्शियम, झिंक, बी व्हिटॅमिन यामुळे थायराॉईड ग्रंथी नियंत्रणात राहतात.

१४. मेनोपॉज काळात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त :

तिळातील फायटोस्टोजन घटक स्त्रियांच्या मेनोपॉज काळात एस्टरोजनच संतुलन राखण्यासाठी मदत करतो. त्यामुळे या काळात स्त्रियांना कर्करोग किंवा इतर आजार होण्याची शक्यता कमी होते.

१५. तीळ सहजपणे आहारात समाविष्ट करता येतात :

तिळामुळे आहाराची चव आणि पौष्टिकता नक्कीच वाढते. भाजलेले किंवा भिजवलेले तीळ आहारात नक्कीच घ्यावे.
वेगवेगळ्या भाज्या, धान्य, कडधान्य, सलाड, ब्रेड यामध्ये तीळ जरूर वापरावे.

बघा बरं, एवढासा हा तिळ पण किती त्याच्या करामती. आहार पौष्टिक आणि चविष्ट करतो. रोगराई दूर ठेवतो आणि आपल्याला समृद्ध करतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय