आयुष्याच्या एका नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात करताना या गोष्टी लक्षात ठेवा

बाबा वोंगाने असं भाकीत करून ठेवलं आणि नौस्ट्राडेमस ने तसं भाकीत करून ठेवलं, असं काहीतरी वाचण्यापेक्षा तुमचं भाकीत तुम्हीच कसं रचायचं? हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.

आणि हो! जास्तीत जास्त शेअर करा. कारण पॉझिटिव्ह गोष्टी लिहिणं हे जसं आम्ही आमचं काम समजतो, तसंच ते पसरवणं हे तुमचं!! #अफवा_नाही_मनाचेTalks_पसरवा

मित्रमैत्रिणींनो, एका वर्षातून दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना जसे अनेक पण केले जातात, तसेच यंदा तुम्हीही केले असतील.

वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातच साधारण पुढच्या वर्षात काय करायचे याचे आराखडे केले जातात.

प्रत्येकाची ध्येय वेगवेगळी असतात काहींना वजन कमी करायचे असते, काहींना काम जास्त चांगल्या प्रकारे करायचे असते, काहींना लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची असते तर काहींना नीटनेटके राहण्याची सवय लावून घ्यायची असते.

वर्ष संपताना तुमच्या सुद्धा यादीत या पैकी किंवा या व्यतिरिक्त अनेक गोष्टी असतील.

नवीन वर्षाला सुरुवात झाली की सुरुवातीला उत्साहाच्या भरात या गोष्टी केल्या जातात सुद्धा, पण नंतर हळूहळू उत्साह कमी होतो, तुम्ही इतर कामात व्यग्र होता आणि यातल्या एकेक करून सगळ्या गोष्टी हळूहळू मागे पडतात.

हे असे होणे साहजिकच आहे.

याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट करायला, नवीन सवयी लावून घ्यायला चिकाटी लागते.

यासाठी न कंटाळता सातत्याने त्या गोष्टी कराव्या लागतात.

दुसरे कारण असे की, हे करण्यासाठी नियोजन फार महत्वाचे असते.

तुमचे संकल्प नेमके कोणत्या बाबतीत आहेत हे तुम्हाला ठाऊक पाहिजे.

संकल्प करताना या दोन गोष्टी लक्षात घेतल्या जातातच असे नाही आणि तिथेच गोंधळ उडतो.

या वर्षाचे स्वागत जोरदार झाले.

तुम्ही ठरवलेल्या गोष्टी, तुम्ही दोन दिवस नेटाने पाळल्या असतीलच.

पण हेच तुमचे संकल्प तुम्हाला वर्षभर निभावून नेता यावेत आणि या वर्षाच्या शेवटी तुम्हाला अनेक चांगल्या सवयी लागल्याचे समाधान मिळावे म्हणून आम्ही हा लेख घेऊन आलोय.

तुमचे संकल्प तुम्हाला सात्यत्याने करता यावेत, त्यात खंड पडू नये यासाठी महत्वाचे आहे ते संकल्पांचे नियोजन.

ते नेमके कसे करायचे हेच तुम्हाला या लेखात समजणार आहे.

तुम्ही कोणकोणत्या बाबतीत संकल्प करू शकता, आणि ते कशाप्रकारे वर्षभर पाळू शकता याची साधारण कल्पना तुम्हाला या लेखात येईल.

गेले वर्ष कसेही गेले असले तरीही नवीन सुरुवात करताना या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही काटेकोरपणे पाळल्या तर तुम्हाला नक्की फायदा होईल.

अ. आरोग्याशी निगडित

1. खाण्यापिण्याच्या सवयी

तुम्हाला जर बाहेरचे, तेलकट, गोड, जंकफूड खायची सवय असेल तर ते बंद, किंवा निदान कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.

एकदम कोणतीही गोष्ट बंद करणे त्रासदायक ठरू शकते, अशावेळेला मग बाहेरचे फक्त महिन्यातून तीन वेळा किंवा चार वेळा खायचे असे ठरवून तुम्ही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलू शकता.

2. व्यायाम

दिवसभरातून व्यायामासाठी आवर्जून वेळ काढण्याचा संकल्प केला तर ते आरोग्यासाठी लाभदायक असेल.

सुरुवातीला जास्त वेळ जमला नाही, जास्त व्यायामाची सवय नसेल तर वीस मिनिटांपासून सुरुवात करून वर्षाच्या शेवटी दीड तासापर्यंत वाढवत नेऊ शकता.

3. फोनचे व्यसन

दिवसभरात फोनचा वापर कामासाठी किती केला जातो आणि इतर गोष्टींसाठी किती यावर लक्ष ठेवले पाहिजे.

फोनचा अति वापर केल्याने इतर कामांकडे दुर्लक्ष होते आणि वेळेचा अपव्यय होतो.

म्हणूनच नवीन वर्षाचे संकल्प करताना फोनच्या अति वापराचा विचार करणे महत्वाचे आहे.

ब. कुटुंबाशी निगडित

1. नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना महत्व द्या

आपले घर, कुटुंब तर महत्वाचे असतेच पण तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सुद्धा वेळ देण्याचा संकल्प करू शकता.

पण यातही महत्त्वाची गोष्ट ही की, तुम्हाला निगेटिव्हटी देणाऱ्या लोकांपासून मात्र, आवर्जून दूर राहा!!

आपले बरे वाईट अनुभव सांगायला, दुःख हलकी करायला आणि सुख अनुभवायला चांगले नातेवाईक आणि मित्रमंडळी खूप गरजेचे असतात.

वेळ होत नाही या सबबीखाली अनेकदा त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा राहून जातो.

पण येत्या वर्षी तुम्ही हे टाळू शकता.

2. जोडीदाराला वेळ द्या

तुमचे तुमच्या जोडीदाराशी जे संबंध असतात त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि एकूण आयुष्यावर होत असतो.

तुमचे नाते सतत बहरत राहावे यासाठी तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे.

यासाठी जोडीदाराबरोबर काही कामे वाटून घेणे, बाहेर फिरायला जाणे, एकमेकांना मदत करणे, काही सरप्राईज देणे यासारख्या गोष्टी, तुम्ही यंदा करण्याचा नेम करू शकता.

क. स्वतःशी निगडित

1. तुमच्या आजूबाजूचे वातावरण

घरात अनेक अनावश्यक गोष्टी असतात.

‘कधीतरी लागतील’ म्हणून खूप गोष्टी साठवून ठेवायची सवय तुम्हाला सुद्धा असेल तर ती वेळेतच थांबवायला हवी.

यामुळे घरात अनेक बिनगरजेच्या गोष्टी घरात साठतातच पण यामुळे जो पसारा होतो, त्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होत असते.

यासाठी घरातील अशा वस्तू मार्गी लावण्याचा एक महत्वाचा संकल्प करू शकता.

यासाठी वापरात नसलेल्या, गरजेच्या नसलेल्या किमान दोन तरी वस्तू दर महिन्याला कमी करण्याचे टार्गेट तुम्ही ठेऊ शकता.

सुस्थीतल्या पण न वापरातल्या गोष्टी कमी करून गरजूंना देण्याचे महत्वाचे काम या संकल्पामुळे घडेल.

2. मनाची शांतता

तुमच्या आजूबाजूची शांतता जितकी महत्वाची आहे तितकीच तुमच्या मनाची शांतता सुद्धा महत्वाची आहे.

भावना मनात साठवून ठेवल्या की कधीतरी अचानक त्या उफाळून बाहेर पडतात.

याचा त्रास तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाला सुद्धा होतो. मानसिक स्वास्थ्य जपणे हे एक महत्वाचे काम आहे.

यासाठी वेळच्यावेळी भावना व्यक्त करणे, संवाद साधणे या गोष्टींना प्राधान्य द्यावे.

तसेच मनःशांतीसाठी योग, प्राणायम यासारख्या गोष्टी करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता.

ड. पैशांशी निगडित

1. बचत

पैशांच्या बचतीचे महत्व वेळोवेळी अधोरेखित केले जाते.

ही बचत का करावी, कशी करावी, त्याचे पर्याय कोणते, बचतीचे महत्व या संदर्भात मनाचेTalks वर अनेक लेख उपलब्ध आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही बचतीचे महत्व जाणून घेऊन जास्तीतजास्त बचत कशी करता येईल, अनावश्यक खर्च कसे टाळता येतील हे बघायला हवे.

तुमचा पगार, घर आणि इतर खर्च यांचे गणित मांडून किती रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवायला हवी हे महिन्याच्या सुरुवातीलाच आखून घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करू शकता.

वर्षाच्या शेवटी अमुक एक रक्कम जमली पाहिजे हे ध्येय तुमच्यापुरते तुम्ही ठरवू शकता.

2. खर्च लिहून ठेवणे

या दोन्ही खरेतर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला जर खर्च लिहून ठेवायची सवय असेल तर गरज नसलेले खर्च आपोआप टळले जातात.

वर्षाच्या सुरुवातीलाच खर्च लिहायला म्हणून एक छानशी वही तुम्ही करू शकता. दिवसभरातले खर्च झोपण्यापूर्वी लिहून ठेवायचा नेम करून तो नियमितपणे पाळू शकता.

यामुळे तुम्हाला किती खर्च होतो याचा अंदाज येऊन बचत कशी करायची हे देखील समजेल.

एकदोन संकल्प करून ते विसरून जाण्यापेक्षा असे शिस्तबद्ध पद्धतीने नवीन सवयी लावून घेतल्या तर ते सोपे होईल, हो ना?

तुम्ही केलेले संकल्प यापैकी कशामध्ये मोडतात?

तुम्ही ठरवलेल्या गोष्टींबरोबरच यातील कोणत्या गोष्टी तुमच्या उपयोगी येतील?

या गोष्टीचा विचार करून या वर्षाची सुरुवात करा! आणि मित्रांनो, #अफवा_नाही_मनाचेTalks_पसरवा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय