पेट्रोल पंपावर फसवले जाऊ नये, म्हणून या ट्रिक्स खास तुमच्यासाठी

आपल्या देशात फसवणूक करणे हे दुर्दैवाने सरसकट चालते.

ग्राहकांची अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे फसवणूक होते.

पण या एका ठिकाणी मात्र नेहमीच ग्राहकांची फसवणूक होते, ते म्हणजे पेट्रोल पंप!

पेट्रोल पंपावर जाणे कोणालाही टाळता येत नाही.

अनेकांना तर या फसवणुकीची कल्पना सुद्धा नसते. पण सगळ्याच शहरांमध्ये हे अगदी सर्रास चालते.

तुम्हाला सुद्धा याचा अनुभव नक्कीच आला असेल.

काही वेळेला नक्की काय झाले, कुठे गडबड केली ते समजत नाही.

पण आपण फसवले गेलोय हे मात्र समजते.

अशा वेळेला भांडून सुद्धा उपयोग होत नाही कारण भांडायला न पुरावा असतो न मुद्दा.

काही वेळा मात्र कुठे गडबड झालीये हे नेमके समजते पण पुढच्या वेळेला काय काळजी घ्यायची ते लक्षात येत नाही.

हा लेख वाचून तुमच्या या दोन्ही समस्या दूर होतील.

पेट्रोल पंपावर फसवले जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची त्यासंबंधी या ट्रिक्स आहेत.

या वाचून तुम्हाला कसे फसवले जाते हे सुद्धा समजेल आणि ते टाळण्यासाठी कशा युक्त्या लढवायच्या हे सुद्धा समजेल.

तुम्हाला जर पेट्रोल पंपावर असे अनुभव आले असतील किंवा येत असतील तर हा लेख वाचा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

१. इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर करून फसवेगिरी करणे

पेट्रोल पंपामधील मशीन्समध्ये अशा प्रकारच्या काही इलेक्ट्रॉनिक चीप्स बसवलेल्या असतात ज्यामुळे मशीनवर एंटर केलेल्या किमतीपेक्षा थोडे कमी पेट्रोल बाहेर येते.

या चिप्स सहसा रुपये १००, २००, ५००, १००० अशा किमतीसाठी सेट करून ठेवलेल्या असतात.

जेव्हा तुम्ही २०० रुपयांचे पेट्रोल घालायला सांगता तेव्हा मशीनवर २०० रुपये सेट केले जातात न या चीपच्या सेटिंगमुळे प्रत्यक्षात २०० रुपयांपेक्षा कमीच पेट्रोल तुमच्या गाडीत भरले जाते.

यावर उपाय म्हणजे, पेट्रोल भरताना कधीही १००, २००.. अशा किंमतीचे न भरता रुपये १२०, २६० अशा अडनिड्या किंमतीचे भरावे.

२. लक्ष विचलित करून फसवेगिरी करणे

फसवेगिरी करायची ही पद्धत बहुतेक वेळा आजमावली जाते.

तुम्हाला हा अनुभव तर नक्कीच आला असेल. तुम्ही पेट्रोल ५००चे भरायला सांगता, पेट्रोल भरणारी व्यक्ती तुम्हाला झिरो बघून खात्री करून घ्यायला सांगते.

तुम्ही खात्री करता तोच दुसरी एक व्यक्ती येऊन तुम्हाला गाडी पुसू का? कार्ड देणार का कॅश?

असे काहीबाही प्रश्न विचारून तुमचे लक्ष विचलित करते.

तोवर पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीने २०० वरच पेट्रोल थांबवले असते.

ते बघून तुम्ही प्रश्न केला की त्या व्यक्तीचे उत्तर तयार असते की त्याने ५०० नाही तर २०० ऐकले असते.

तुम्ही काही बोलायच्या आत ती व्यक्ती रिसेट करून अजून ३०० भरतो असे सांगते.

एकीकडे बाजूच्या व्यक्तीचे प्रश्न सुरूच असतात, कधी सुटे पैसे परत देण्याच्या तर कधी पैसे मागण्याच्या निमित्ताने ती व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेत असते.

तुम्हाला रिसेट करतो असे सांगून मात्र मशीन रिसेट केले जात आही.

मग २००ला सुरु होऊन मिटर ३०० ला थांबतो. म्हणजेच ५०० रुपयांच्या पेट्रोलचे पैसे भरून तुम्हाला २०० अधिक १०० असे ३०० चेच पेट्रोल मिळालेले असते.

हे टाळण्यासाठी झिरोची खात्री करून सुद्धा लक्ष मीटरच केंद्रित केले पाहिजे.

कोणी बोलायला आले तरी त्याला थांबवून आधी पेट्रोल भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे.

पेट्रोल भरून झाल्यावर नेहमी मशीनमधून जनरेट होणाऱ्या बिलाची जर तुम्ही मागणी केलीत तर त्यावर मशीन मधून भरले गेलेले पेट्रोल व त्याची किंमत हे दोन्ही नमूद केलेले असते.

हाताने लिहून दिलेले बिल व कार्डची रिसीट यासाठी हे लागू होत नाही.

३. पेट्रोल भरताना लबाडी करून फसवणे

पेट्रोल भरताना पंप नीट लॉक करणे अपेक्षित असते.

एकदा मशीनमध्ये सेटिंग दिले ती तितके पेट्रोल गाडीत गेल्यावर पंप ऑटो कट ऑफने अपोआप बंद होतो.

पण असे होऊ न देता जर पेट्रोल भरणारी व्यक्ती वारंवार पंप चालू बंद करत असेल तर ते योग्य नाही.

ही फसवण्याची एक पद्धत आहे कारण जर सतत पंप चालू बंद केला तर थोडे पेट्रोल पाईपमध्येच अडकून राहते.

हे पेट्रोल तुमच्या गाडीच्या टाकीत जातच नाही.

हे अडकून राहण्याचे प्रमाण जरी थोडे असले तरी दर वेळीच अशी फसवणूक केल्याने तुमचे विनाकारण नुकसान होते.

तुम्हाला हा अनुभव येत असेल तर तुम्ही अधिक सतर्क असण्याची गरज आहे.

पेट्रोलचा पाईप चालू केल्यावर ऑटो कट ऑफ होई पर्यंत तो हाताळला जात नाही ना?

याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

४. कारवाल्यांची फसवणूक करणे

तुमच्या बाबतीत हे एकदा तरी झाले असेलच की तुम्ही कार घेऊन पेट्रोल भरायला गेल्यावर तुम्हाला कार पुढे मागे करण्याची सूचना दिली गेली असते.

फसवणूक करण्यासाठी याचा वापर केला जातो.

तुमची कार मुद्दाम अशा ठिकाणी लावायला सांगितलीजाते जिथून पेट्रोल भरत असताना तुम्हाला मीटर दिसणार नाही.

पण हे तुमच्या लक्षात येऊ नये म्हणून तुम्हाला झिरो बघण्याचा आग्रह केला जातो. कारमध्ये बसूनच तुम्ही पेट्रोलच्या टाकीचे झाकण उघडता व झिरो बघून पेट्रोल भरले जाण्याची वाट बघता.

नंतर तुम्ही सांगितलेली रक्कम मशीनवर दिसली की पैसे देता.

पण या दरम्यान तुमच्या नकळत मशीन चालू बंद करून, रीडिंगमध्ये घोळ घातला जाऊ शकतो.

कित्येकदा अशा वेळी लाईट गेले किंवा मशीन बंद झाले अशी कारणे दिली जातात आणि रीडिंगमध्ये घोळ घालून कमी रकमेचे पेट्रोल भरतात.

म्हणूनच तुम्ही जर कारमध्ये पेट्रोल भरायला जात असाल तर खाली उतरून झिरो तपासून तसेच पेट्रोल पूर्ण भरून होईपर्यंत लक्ष ठेवणे हेच हिताचे आहे.

५. सुटे पैसे देताना फसवणूक

पेट्रोल पंपावर बऱ्याचदा गोंधळ असतो, गर्दी असते.

अशा वेळेला तुम्ही जर बंदे पैसे दिले तर त्याचे सुटे परत करताना फसवले जाण्याची शक्यता असते. बऱ्याचदा तुम्ही पैसे दिल्यावर तुम्हाला गाडी पुढे घ्या म्हणून घाई केली जाते.

अशावेळी तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते.

काहीवेळा तुमच्या नोटा फाटलेल्या आहेत असे सांगून एकदोन नोटा परत केल्या जातात आणि चलाखीने तुमच्याकडून अजून पैसे मागून घेतले जातात.

तुम्ही घाईत असल्यामुळे हिशोब व्यवस्थित करत नाही पण नंतर मात्र हिशोब लागत नाही.

गर्दीचा फायदा उचलून सुटे पैसे देताना फसवण्याचे इतरही अनेक मार्ग असतील.

काहीवेळा तर लक्षात सुद्धा येत नसतील.

पेट्रोलचे पैसे भरताना शक्यतो सुटेच द्यायचे. जेणेकरून आपले पैसे देऊन झाले की लगेच जाता येते.

काही कारणाने सुटे पैसे नसतीलच तर गाडी पुढे घेऊन पार्क करून आरामात व्यवहार करावा.

किंवा शक्य असेल तर फोन पे, गुगल पे या व्हॉलेट चे ऑप्शन वापरून ऑनलाइन पैसे द्यावेत. ज्यामध्ये कधीतरी कॅशबॅक मिळण्याची सुद्धा शक्यता असते.

मित्रांनो, पेट्रोल पंपावर फसवेगिरी करण्याचे किती मार्ग आहेत आणि त्याला बळी न पडण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेऊ शकता हे तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “पेट्रोल पंपावर फसवले जाऊ नये, म्हणून या ट्रिक्स खास तुमच्यासाठी ”

    • अतिशय संशयास्पद आहे.आम्हि कधी विचारच केला नाही. धन्यवाद. …

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय