चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे ते वाचा या लेखात

गेल्या वर्षभरात शाळा, कॉलेज, क्लास, ऑफिस सह एक महत्वाची गोष्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होऊ लागली आहे. ही गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार.

खरेतर काही लोकं मागील दोन ते तीन वर्षांपासून नियमित असे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करत आहेत. ऑनलाईन बँकिंग अनेक लोकांना सोयीस्कर वाटते.

तरुण मुलांचा तर सगळेच व्यवहार ऑनलाईन करण्याकडे भर असतो. फोन, लाईटची बिल्स, पैसे ट्रान्स्फर हे सर्वच केवळ काही क्लिक्समध्ये घरबसल्या होते.

क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, गुगल पे यामुळे तर पैसे न बाळगता घराबाहेर पडल्यावर सुद्धा काहीच आडत नाही. पण सगळ्यांनाच त्यात गती असते असे नाही.

काही जुन्या पद्धतीच्या लोकांना, ज्यांना मोबाईल, कॉम्पुटर सहजपणे वापरता येत नाहीत त्यांना रोख व्यवहारच सोयीचा वाटतो.

२०२० सालाने मात्र हे चित्र पूर्णपणे बदलून टाकले.

पैसे हाताळणे कमी व्हावे यासाठी त्याची देवाण घेवाण थांबवणे गरजेचे झाल आणि सगळ्यांनाच हे ऑनलाईन व्यवहार शिकण्यासाठी भाग पाडले.

भाजीवाला, किराणावाल्या पासून सगळ्यांकडे गुगल पे, फोन पे, PayTM सारखी साधने येऊ लागली.

एका दृष्टीने हे सगळ्यांनाच सोयीस्कर झाले.

अशा प्रकारे पैशांचे व्यवहार करताना सहसा काही अडचण येत नाही कारण यामध्ये सरळ मोबाईल नंबर टाकून, ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या नावाची खात्री करूनच मग व्यवहार करता येतो.

म्हणूनच याच्या वापरात विशेष अडचणी येत नाहीत.

पण काही लोकांच्या बाबतीत खरा प्रश्न येतो तो NEFT करताना.

आपल्या बँकेच्या खात्यातून कोणाला पैसे पाठवायचे असतील तर त्या माणसाच्या बँकेच्या खात्याचा नंबर आणि अन्य काही माहिती देखील लागते.

या माहितीच्या देवाणघेवाणीत काहीतरी गडबड व्हायची शक्यता आहे.

असे क्वचित होत असेल की आपल्या बँकेची माहिती, खाते क्रमांक टाईप करून पाठवताना अंक इकडचे तिकडे होऊ शकतात किंवा कदाचित पैसे पाठवणाऱ्या कडून नजरचूक होऊ शकते.

त्याच्याकडून टाईप करताना काही अंक बदलले जाऊ शकतात. कधी घाईच्या वेळी बेनीफीशीअरी निवडताना चूक होऊ शकते.

थोडक्यात, वेंधळेपणामुळे म्हणा किंवा नजरचुकीमुळे म्हणा नेट बँकिंग द्वारा पैसे पाठवताना अशा चुका होऊ शकतात, नव्हे होत असतात.

मित्रांनो, कारण काहीही असो पण चुकीच्या खात्यात अशा प्रकारे पैसे गेल्यावर काय करायचे?

अगदी परवाच माझ्या ओळखीच्या एका काकांनी आपल्या मुलीला पैसे पाठवण्याऐवजी ते ज्या दुकानातून सामान मागवतात त्यांना पाठवले होते.

त्यांच्या चूक लक्षात येताच त्यांनी त्या दुकानदाराला फोन केला. दुकानदार सुद्धा त्यांच्या ओळखीचा होता, चांगला होता म्हणून त्याने त्यांना ती रक्कम परत पाठवली व ती मुलीला पाठवण्यासाठी सुद्धा मदत केली.

पण हेच जर कोणा अनोळखी व्यक्ती बाबत झाले असते तर? अशी मोठी रक्कम जर कोणा अनोळखी व्यक्तीच्या खात्यात चुकून गेली तर तुम्हाला त्या व्यक्तीशी संपर्क करता येईलच असे नाही.

संपर्क झाला तरी ती व्यक्ती चांगुलपणाने मान्य करून पैसे परत करेल याची शाश्वती नाही. त्यात जर तुम्ही तुमच्या ऑफिसच्य वतीने हे व्यवहार करत असाल तर तुम्हाला दिवसा तारे दिसतील.

असे नुकसान झाल्यावर काय पर्याय असतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

अशावेळी काय करायचे? तेच या लेखात तुम्हाला वाचायला मिळणार आहे.

१. जर तुमच्याकडूनअशी चूक झाली तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेला संपर्क करणे. तुमची चूक तुमच्या लक्षात आल्यावर ताबडतोब बँकेला फोन करून झाल्या प्रकारची कल्पना देणे महत्वाचे आहे.

यासंबंधी बँकेला ईमेल द्वारे सुद्धा कळवावे जेणेकरून तुमच्याकडे बँकेला सदर घटना कळवल्याचा पुरावा राहतो.

२. बँकेला कळवून झाल्यावर बँक मॅनेजरची प्रत्यक्ष भेट घेणे सुद्धा महत्वाचे आहे.

बँक मॅनेजरला भेटून, चुकीच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, कधी झाली आहे याचा पुरावा द्यावा. यासाठी त्या व्यवहाराचा स्क्रीनशॉट बँक मॅनेजरला द्यावा.

कोणतेही नेट बँकिंगचे व्यवहार करताना स्क्रीनशॉट घेणे अनिवार्य आहे. तुम्हाला ही सवय नसेल तर तुम्ही ती जाणीवपूर्वक लावून घ्यायला हवी.

३. ज्या खात्यात तुम्ही चुकून पैसे पाठवले आहेत ते खाते ज्या बँकेचे असेल त्या बँकेत सुद्धा लेखी तक्रार नोंदवावी.

तक्रारीच्या शेवटी तुमची पैसे तुम्हाला परत मिळावेत यासाठी विनंती करावी.

सर्व लेखी तक्रारींच्या फोटोकॉपी तुमच्याजवळ ठेवाव्यात. असे केल्याने ती बँक मदत करेल.

ज्या अकाऊंट होल्डरच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत त्याला पैसे परत करायची विनंती करेल.

४. या पायरी पर्यंत तुमचे सगळे सुरळीत झाले तर तुमचे गेलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.

पण समजा ज्याच्या खात्यात चुकीने पैसे गेले आहेत त्या व्यक्तीने पैसे परत करायला नकार दिला तर? अशावेळी मात्र पोलिसात तक्रार करण्याला पर्याय उरत नाही.

५. हे समजून घेणे महत्वाचे आहे की या संदर्भात तुमची बँक सुद्धा पोलिसात व गरज पडल्यास कोर्टात लेखी तक्रार करून तुम्हाला मदत करू शकते.

रिझर्व बँकेच्या नियमानुसार असे झाल्यास पैसे परत मिळवून द्यायची जबाबदारी ही बँकेची सुद्धा असते. यामुळे बँकेकडून आवश्यक ती मदत जरूर घ्यावी.

तुमच्याकडून अशी चूक झाल्यास या गोष्टी केल्याने तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. चुकीच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर काय करायचे हे समजून घेणे महत्वाचे आहेच पण मुळात अशी चूक होऊच नये यासाठी काळजी घेणे सुद्धा महत्वाचे आहे.

१. नेट बँकिंग द्वारा व्यवहार करताना काळजीपूर्वक करावेत. घाईच्या वेळी किंवा दो कामांच्या मध्ये असे व्यवहार करणे टाळावे. एका जागी शांत बसून, लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घेऊनच पैसे ट्रान्स्फर करावेत.

२. सगळी माहिती काळजीपूर्वक भरावी. ट्रान्स्फर करण्यापूर्वी माहिती पडताळून घ्यावी. शक्य असल्यास घरातील इतर कोणाला तपासायला द्यावी.

३. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. मोठी रक्कम पाठवण्यापूर्वी अगोदर त्यातील काही थोडी रक्कम पहिले त्या खात्यात पाठवून ते खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री घेऊनच मग उरलेली रक्कम ट्रान्स्फर करावी.

४. सगळ्या व्यवहारांचे स्क्रीनशॉट काढून ठेवणे महत्वाचे आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे ते वाचा या लेखात ”

  1. आमच्या बँकेने त्यांच्या App मध्ये जाणीवपूर्वक screenshot not able असे सेटिंग करुन ठेवले आहे. UNION BANK OF INDIA.
    कोणाकडे तक्रार करावी लागेल?

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय