पाॅ-र्नचे तुमच्या आयुष्यावर होणारे विपरीत परिणाम 

पॉ-र्न चे वाईट परिणाम पॉ-र्न चे साईड इफेक्ट्स

आज आपल्या हातात पूर्ण जग आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही.

आपल्या हातातील मोबाईल द्वारे आपण खरेच संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत.

कोणतीही माहिती, कोणतेही संदर्भ केवळ काही क्लिकवर आपल्याला उपलब्ध असतात.

या इंटरनेटचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा आहेत.

या माध्यमाचा कसा वापर करावा हे आपल्यावर असते. 

इंटरनेटचा वापर करताना आजकाल तरुण वयातच मित्रांच्या आग्रहामुळे, कुतूहलापोटी अनेक मुले पाॅ-र्न साईटवर क्लिक करतात.

सुरुवातीला जरी हे कुतुहलापुरते मर्यादित असले तरी याची मुलांना सवय लागायला वेळ होत नाही.

पाॅ-र्न-ग्रा-फी हा या इंटरनेटचा सर्वात मोठा दुष्परिणाम ठरतो आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

एकदा पाॅ-र्न बघायची सवय लागली की ती सहजासहजी जात नाही.

केवळ तरुणांसाठीच नाही तर प्रौढांसाठी सुद्धा ही एक अवघड आणि न सुटणारी सवय झाली आहे.

काहीवेळा तर पाॅ-र्न बघण्याच्या सवयीमुळे सुधारकेंद्रात सुद्धा जाण्याची वेळ येते. 

जरी प्रत्येकाचे पाॅ-र्न बघण्याचे व्यसन या थराला गेलेले नसले तरी ते धोकादायकच आहे.

आठवड्यातून एकदा पाॅ-र्न बघणे आणि दररोज पाॅ-र्न बघणे अशी यामध्ये तुलना करता येत नाही.

शाळेतील मुलांना पाॅ-र्न बघण्याची सवय लागली तर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाच्या दृष्टीने ते धोकादायक तर असतेच पण मोठ्यांसाठी सुद्धा या वाईट सवयीचे अनेक दुष्परिणाम असतात.

पाॅ-र्नचा मनावर आणि शरीरावर खूप प्रमाणात विपरीत परिणाम होत असतो. 

आज या लेखात आपण याबद्दलच बोलणार आहोत.

पाॅ-र्न बघण्याने मनावर आणि शरीरावर काय दुष्परिणाम होतात ते आज या लेखात तुम्हाला सविस्तर वाचायला मिळणार आहे.

यामुळे जर तुम्ही स्वतः पाॅ-र्नच्या आहारी जात असाल तर वेळीच तुम्हाला स्वतःला सावरता येईल किंवा जर तुम्हाला या संदर्भात कोणाला मदत करायची असेल तर ती सुद्धा करता येईल. 

१. पाॅ-र्न तुमच्या मूल्यांना धक्का पोहोचवतो 

काहीही वाचण्यापेक्षा जर ते व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही बघितले तर त्याचा तुमच्या मनावर दीर्घकाळासाठी ठसा राहतो.

पाॅ-र्नच्या बाबतीत सुद्धा हेच होते.

एकतर वाचण्यापेक्षा व्हिडीओ बघणे सोयीचे वाटते त्यामुळे पाॅ-र्नचे व्यसन असणारे बहुतेक जण हे पाॅ-र्नो-ग्रा-फि-क गोष्टी वाचण्यापेक्षा व्हिडीओ बघणे पसंत करतात.

या व्हिडीओचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो.

पाॅ-र्न व्हिडिओ मधील एखादी गोष्ट, घटका तुम्ही वरवर जरी विसरलात तरी ती तुमच्या मनावर खोल कुठतरी आपला ठसा उमटवून गेलेली असते.

यामुळे प्रत्यक्ष शा-री-रि-क सं-बं-ध ठेवताना तुम्ही नको त्या अपेक्षा बाळगण्याची शक्यता असते ज्या पूर्ण होणे शक्य नसते. 

याचेच एक उदाहरण हल्लीच नागपूरच्या एका हॉटेल मध्ये पॉ-र्न बघितल्यानंतर गळफासमुळे झालेला मृत्यू, हे बरेच जणांच्या वाचनात आलेच असेल.

पाॅ-र्न-चा तुमच्या नातेसंबंधांवर सुद्धा अप्रत्यक्ष रित्या वाईट परिणाम होत असतो.

सामान्य माणसाचे सहजीवन, सामान्य जोडप्यांचे शा-री-रि-क सं-बं-ध हे पाॅ-र्नमध्ये दाखवतात त्यापेक्षा खूप वेगळे असते.

सतत पाॅ-र्न बघून या मूल्यांना मात्र धक्का पोहोचतो.

पाॅ-र्नमध्ये अनोळखी व्यक्तीशी शा-री-रि-क सं-बं-ध ठेवणे, एकाच वेळेला अनेक लोकांशी शा-री-रि-क सं-बं-ध ठेवणे या गोष्टी दाखवल्या जातात.

याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर देखील होतो.

सतत तेच बघून तुमची विचार करण्याची पद्धत बदलण्याची शक्यता असते.

यामुळे तुमच्या आयुष्यात सुद्धा असे तात्पुरते नातेसंबंध, फक्त शा-री-रि-क गरजा पुरवण्यासाठी निर्माण होऊ शकतात.

शा-री-रि-क गरजा पुरवण्यासाठी नातेसंबंध ठेवणे हे साहजिकच कमकुवत मनाचे लक्षण आहे.

तुमचे मन कमकुवत नसतानाही पाॅ-र्न तुम्हाला अशा पद्धतीने विचार करण्यासाठी भाग पाडू शकतो.

आयुष्यात एक यशस्वी नाते जोपासणे हे यामुळे अवघड होऊ शकते. 

तुम्ही जे बघता, वाचता किंवा ऐकता त्याचप्रमाणे विचार करू लागता.

पाॅ-र्नच्या बाबतीत सुद्धा असेच होते.

त्यामध्ये दाखवले गेलेले सगळे सत्य नसते पण तेच सत्य आहे असे मानून तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा तशाच अपेक्षा बाळगता.

यामुळे गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. 

२. पाॅ-र्नमुळे वंध्यत्वाचा धोका संभवतो 

पाॅ-र्न बघणे हे एक व्यसन आहे.

काहीवेळा काही जण पाॅ-र्नच्या इतके आहारी जातात की त्यांना शा-री-रि-क संबंध ठेवताना सुद्धा पाॅ-र्न बघण्याची गरज वाटते.

पाॅ-र्नच्या अति आहारी गेलेल्यांना हा त्रास होतो.

अशी लोकं आपल्या पार्टनर सोबत असताना सुद्धा गुंतू शकत नाहीत.

काहीवेळा पाॅ-र्न बघितल्याशिवाय त्यांना प्रत्यक्ष शा-री-रि-क संबंध ठेवण्याच्या वेळी आत्मविश्वास वाटत नाही’ तर काहीवेळा मध्येच हा आत्मविश्वास ढासळून नर्व्हस व्हायला होते. 

हे वाचून तुम्ही अंदाज लाऊ शकताच की पाॅ-र्न बघण्याचा तुमच्या नातेसंबंधांवर किती खोल व कायमचा परिणाम व्हायची शक्यता असते.

तुम्हाला सुद्धा काही प्रमाणात असा अनुभव आला असेल तर तुम्ही वेळीच स्वतःला थांबवले पाहिजे.

आयुष्यात अन्हेल्दी पर्याय भरपूर असतात पण त्यातून हेल्दी पर्याय निवडून आपले आयुष्य जास्तीतजास्त चांगले करणे हे ज्याच्या त्याच्या हातात असते.

पाॅ-र्नच्या बाबतीत हे अगदी लागू होते.

पाॅ-र्न बघून क्षणिक आनंद मिळवायचा की त्याचा तुमच्या नात्यांवर, व्यक्तिमत्वावर अशाप्रकारे परिणाम होऊ द्यायचा ही निवड तुम्हाला करायची आहे. 

३. पाॅ-र्न तुम्हाला लोकांपासून लांब नेते 

पाॅ-र्न ही एकांतात बघण्याची गोष्ट आहे.

खासकरून वयाने लहान असणारी मुले मुली जेव्हा पाॅ-र्न बघायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना लोकांमध्ये वावरताना अवघडल्यासारखे होते.

आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून, मित्रमैत्रिणींपासून सुद्धा काही प्रमाणात ते दूर होतात.

पाॅ-र्न लपूनछपून बघताना आपण काहीतरी चुकीचे करतोय याची जाणीव त्यांना असते आणि याचमुळे त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात अवघडलेपण येते.

यामुळे हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि त्यांना एकटे राहण्याची सवय लागते.

एकटे राहण्यामुळे, लोकांमध्ये न मिसळल्यामुळे ही मुले पुन्हा पाॅ-र्नकडे खेचली जातात.

अशाप्रकारे ही एक सायकल अविरतपणे सुरु राहते.

अशी मुले मोठी होताना माणसांशी संपर्क ठेवायला शिकत नाहीत यामुळे पुढे जाऊन त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात सुद्धा त्यांना अनेक मर्यादा येण्याची शक्यता असते. 

४. पाॅ-र्नचा व्यावसायिक आयुष्यावर वाईट परिणाम होतो 

कोणत्याही व्यसनाचा जसा वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो तसाच व्यावसायिक आयुष्यावर सुद्धा होत असतो.

पाॅ-र्न बघणे हे सुद्धा एक व्यसनच आहे.

पाॅ-र्नला व्यसन म्हणायला ते रोज बघायला हवे असे नसते.

कारण क्वचित पाॅ-र्न बघणाऱ्यांना सुद्धा पाॅ-र्न बघण्याची हुक्की अगदी कधीही येण्याची शक्यता असते.

अशावेळेला हातातील महत्वाच्या एखाद्या कामाला प्राधान्य द्यायचे का पाॅ-र्न बघायच्या इच्छेला या प्रश्नावर  पाॅ-र्न बघण्याची त्यावेळेची इच्छा मात करते.

इतर कोणत्या गोष्टीला महत्व न देता ही इच्छा पूर्ण करणे गरजेचे होऊन बसते. 

काम करण्याची, अभ्यास करण्याची, व्यायाम करण्याची किंवा जेवण करण्याची.. थोडक्यात दिवसभरात तुम्ही जी कामे करता ती करण्याची तुमची एक निश्चित वेळ असते.

पाॅ-र्न बघण्यासाठी अशी कोणतीच एक वेळ ठरवलेली नसते.

पण पाॅ-र्न बघण्याची इच्छा यापैकी कोणतेही काम करत असताना होण्याची शक्यता असते.

अशावेळेला हातातील काम मध्यावर सोडून सुद्धा पाॅ-र्नच्या आहारी लोकं सहज जातात.

त्यामुळे रोज पाॅ-र्न बघणे हे जितके धोकादायक आहे तितकेच लहर आली की पाॅ-र्न बघणे हे सुद्धा धोकादायक आहे.

ही लहर एकदा आली की पाॅ-र्न बघितल्याशिवाय समाधान होत नाही. 

त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर होत असतो.

पाॅ-र्न बघण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम टाळण्यापासून ते लोकांना टाळण्यापर्यंत गोष्टी घडू लागतात.

असे वागणे हे धोकादायक आहे. 

चांगल्या सवयी स्वतःला जाणीवपूर्वक लाऊन घेऊन वाईट सवयींचा त्याग करणे हे यशस्वी आयुष्याचे गुपित आहे.

याचा वापर आपण सुद्धा आपल्या सवयी बदलण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनात करायला हवा, नाही का? 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

2 Responses

 1. राजेश says:

  अगदि बरोबर आहे….
  मी याचा अनुभव घेतला आहे.

  • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

   सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

   तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

   त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!