FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल? वाचा या लेखात

FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल?

टॅक्स मध्ये बचत करण्यासाठी आणि गुंतवलेल्या पैशांची वृद्धी होण्यासाठी बँकेत FD किंवा PPF यात तुम्ही गुंतवणूक करत असाल.

बरेच लोक FD मध्ये गुंतवणूक करावी की PPF मध्ये गुंतवणूक करावी या द्विधा मनःस्थितीत असतात.

आज आम्ही तुम्हाला PPF आणि ५ वर्षांसाठी बँकेतले FD यांचे फायदे आणि तोटे याबद्दल सांगणार आहोत. म्हणजे गुंतवणूक करताना निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल.

PPF मधल्या गुंतवणूकीच्या मॅच्युरिटीची अवधी ही १५ वर्षांची असते. भारतातील गुंतवणूकदारांमध्ये ही सर्वात लोकप्रिय अशी गुंतवणूक योजना आहे.

इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 C नुसार PPF मधील गुंतवणूकीवर टॅक्स मधून सूट घेता येते.

आर्थिक वर्ष 2021-2022 च्या युनियन बजेट नुसार 2.5 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक PPF मध्ये केल्यास व्याजावर टॅक्स लावण्याचा प्रमुख बदल केला गेलेला आहे.

परंतु PPF कायद्या नुसार वर्षभरात 1.5 लाखापर्यंतची गुंतवणूक ही करमुक्त करता येते.

त्यामुळे काही एक्सपर्ट्सचे म्हणणे असे आहे की, युनियन बजेट मधील बदलाचा काही फरक पडणार नाही कारण यासाठी मुळात PPF कायद्यामध्ये बदल करावा लागेल.

PPF मधली गुंतवणूक ही इतकी लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे ही गुंतवणूक तिहेरी बचतीचा लाभ देऊन जाते.

PPF मधील गुंतवणूक ही तिहेरी बचत म्हणजेच EEE श्रेणी मध्ये मोडते.

Exempt-Exempt-Exempt म्हणजेच करमुक्त गुंतवणूक, करमुक्त व्याज आणि करमुक्त मॅच्युरिटी असे तिहेरी फायदे यात घेता येतात.

सोप्या भाषेत सांगायचे तर

(१) PPF खात्यात वर्षभरात जमा रकमेवर टॅक्स द्यावा लागत नाही (1.5 लाखापर्यंत गुंतवणूक),

(२) यावर मिळणारे व्याज सुद्धा टॅक्सफ्री असते,

(३) मच्युरिटीला मिळणारी पूर्ण रक्कम ही सुद्धा टॅक्सफ्री असते.

यावर ही गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की PPF अकाउंट हे मच्युरिटी च्या आधी बंद करता येत नाही. फक्त अकाउंट होल्डर च्या मृत्यूनंतर नॉमिनी ते अकाउंट बंद करू शकतात.

(याबाबत मुलांचे १८ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर पालकांनी गुंतवणूक आणि इतर बाबतीत घेण्याची काळजी याबद्दल माहिती देणारा लेख #मनाचेTalks वर लवकरच प्रकाशित होणार आहे.)

तसेच १५ वर्षांच्या मच्युरिटी नंतर दोन वेळा अकाउंट ची मुदत ही नियमानुसार पुढे वाढवता येते.

रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीचे जर तुमचे ध्येय असेल तर १५ वर्षांनंतर सुद्धा PPF अकाउंट चालू ठेवणे योग्य ठरते.

सुरुवातीच्या 15 वर्षांच्या लॉक इन पिरियड नंतर दर वर्षी गुंतवणूक करणे बंधनकारक नसते. आणि गुंतवणूकदार वर्षातून एकदा पैसे काढू सुद्धा शकतो.

31 मार्च 2020 पर्यंत PPF वरील व्याजदर हा वार्षिक 7.9% टक्के होता.

परंतु 1 ऑक्टोबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत वार्षिक 7.1% करण्यात आला होता.

ही व्याजवृद्धी वार्षिक चक्रवाढ पद्धतीने असून. दर वर्षी 31 मार्चला तुमच्या अकाउंट मध्ये जमा होते.

हा व्याजदर 5 वर्षांच्या बँक फिक्स डिपॉझिट पेक्षा भरपूर चांगला असून चक्रवाढ पद्धतीचा फायदा यात घेता येतो.

शिवाय बँक FD मधून मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागत असल्याने व्याजदर प्रभावित होतो, म्हणजेच कमी होतो (कारण त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो)

बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये केल्या जाणाऱ्या टॅक्स सेव्हिंग FD मध्ये केलेल्या गुंतवणूकीवर सेक्शन 80C नुसार टॅक्स मधून सूट मिळते. परंतु मिळणाऱ्या व्याजावर इनकम टॅक्स च्या स्लॅब नुसार टॅक्स भरावा लागतो.

मित्रांनो या माहितीचा वापर करून PPF किंवा 5 वर्षांची बँक FD यात आपल्या गरजेनुसार कशात गुंतवणूक करणं सोयीस्कर होईल हे तुम्ही ठरवू शकता.

अशीच FD आणि SIP याबद्दलची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हा लेख वाचून तीनही गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल तुम्हाला चांगली माहिती मिळेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.