जाणून घ्या ऑफिस मध्ये असताना झोप येण्याची कारणे

एरवी तुम्ही एक उत्साही आनंदी व्यक्ति आहात पण ऑफिसमध्ये असताना मात्र आदल्या रात्री व्यवस्थित झोप झाली असूनही तुम्हाला पेंगुळल्यासारखे वाटते का?

सारख्या जांभया येऊन झोप आल्यासारखे वाटते का? असे होत असेल तर त्याची अनेक कारणे आहेत, ती जाणून घेऊन आपण ह्या समस्येवर मात करू शकतो.

चला तर मग पाहूया ऑफिसमध्ये असताना झोप येण्याची काही कारणे

ऑफिस मध्ये असताना झोप येण्याची कारणे ऑफिसमध्ये झोप का येते

कमी पाणी पिणे- जर अत्यंत बिझी शेड्यूल मुळे तुम्ही ऑफिसमध्ये असताना अधून मधून पाणी पिणे विसरत असाल म्हणजेच तुमच्याकडून योग्य त्या प्रमाणात पाणी प्यायले जात नसेल तर तुमची चिडचिड होऊन थकवा जाणवू लागेल.

कारण शरीरातील पाणी कमी झाले (dehydration) तर चिडचिड वाढून थकवा येऊ शकतो व व्यक्तीस पेंगुळल्यासारखे वाटते.

ऍनिमिया- ऍनिमिया म्हणजे लोह किंवा अन्य vitamins ची कमतरता.

शरीरात जर योग्य प्रमाणात लोह असेल तर लाल रंगाच्या पेशींचे प्रमाण देखील योग्य राहते व त्यामुळे संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

परंतु लोह किंवा अन्य vitamins च्या कमतरतेमुळे लाल पेशी कमी प्रमाणात तयार होतात व त्या ऑक्सिजन चा पुरेसा पुरवठा शरीरभर करू शकत नाहीत. व म्हणून अश्या व्यक्तीस सतत थकवा येऊन झोप आल्यासारखे वाटते.

नैराश्य- जर तुम्ही नैराश्याने म्हणजेच डिप्रेशनने ग्रासलेले असाल तरीदेखील तुम्हाला कामाच्या वेळेत झोप येऊ शकते.

सतत दु:खी व उदास असल्यामुळे अश्या व्यक्तीस सतत अशक्तपणा व थकवा जाणवतो. अश्या वेळी एक तर खूप जास्त प्रमाणात झोप येते किंवा मग अजिबात झोप येत नाही. निद्रनाश होतो.

जागरण- ऑफिसला येण्याच्या आदल्या काही रात्री जर तुमची झोप अपूर्ण होत असेल तरीही तुम्हाला कामाच्या वेळात झोप आणि सतत जांभया येऊ शकतात.

ह्यावरून आपण आपली नेमकी समस्या काय ते ओळखून त्यावर योग्य तो उपाय करू शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.