चहा हे उत्साहवर्धक, तरतरी आणणारे पेय आहे.
दिवसाची सुरुवात चहाने न करणारी व्यक्ति विरळाच. आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी चहा पिऊ शकणारे अट्टल चहाप्रेमी आपल्याला आजूबाजूला नेहेमीच दिसतात.
तर असा हा लोकप्रिय चहा. चहाच्या अनेक गुणधर्मामुळे चहाचा आयुर्वेदात औषधी म्हणून उपयोग केला जातो.
परंतु एकीकडे असे देखील म्हटले जाते की चहा चा अतिरेक वाईट, चहा पिण्यामुळे नुकसान होते.
तर मग नक्की काय, काय आहेत चहाचे गुणधर्म आणि चहा पिण्याचे फायदे ते ह्या लेखात पाहूया.
चहा म्हणजे खरंतर चहाची पाने, ही पाने चहाच्या ९ ते १५ मी. उंचीच्या झुडुपांवर असतात.
ही झुडुपे सदोदित हिरव्या रंगाची असतात. वारंवार कापल्यामुळे पानांची वाढ भराभर होते.
आणि चहाच्या झुडुपाची साधारण १५० सेमी. पेक्षा जास्त वाढत नाही.
चहाच्या झाडावरची पुढची २ पाने आणि एक कलिका खुडून चहाची पावडर तयार केली जाते. ही पाने व कलिका सुगंधी असतात.
चहाचे भारतात आसाम आणि दार्जिलिंग मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
डिसेंबर ते मार्च च्या दरम्यान चहाचे सर्वाधिक उत्पादन होते.
अश्या पानांचे पावडर स्वरूप म्हणजे आपण वापरतो तो चहा.
चहामध्ये Tannin आणि caffeine नावाचे द्रव्य असते ज्यामुळे चहा प्यायला की आपल्याला तरतरी आल्यासारखे वाटते.
त्यामुळे थकवा आला असेल तर चहा प्यायल्यामुळे बरे वाटते, ताजेतवाने वाटते.
परंतु सतत चहा पिण्यामुळे चहाचे व्यसन लागल्यासारखे होते आणि कोणतेही व्यसन शरीरास वाईटच.
चहा हे मूळचे कडसर, उष्ण प्रवृत्तीचे आणि ऊर्जादायक पेय आहे.
चहा हे पेय कफ आणि पित्त नाशक असले तरी काही प्रमाणात वात दोषाला निमंत्रण देणारे आहे.
आणि चहामुळे हुशारी वाटत असली तरी काहीवेळा चहाच्या अतिरेकमुळे किडणीचे आजार उद्भवू शकतात.
इतर भाषांमध्ये चहाला काय म्हणतात?
मराठीत चहा आणि इंग्लिश मध्ये टी (tea ) असे चहाला म्हटले जाते. तर इतर भाषांमध्ये…
1. हिंदी – चाय;
2. उर्दु – चाय (Chai);
3. ओरिया – चाइ (Chai), चा (Cha);
4. कन्नड – चा (Cha), चाय (Chay), चाहा (Chaha);
5. गुजराती – चहा (Chaha), चाय (Chay);
6. तामिळ – करूप्पुट्टेयिलेई (Karupputteyilai), तायीलि (Thayili);
7. तेलगू – थेयाकू (Theyaku);
8. बंगाली – चाइ (Chai), चाय (Chai);
9. नेपाळी – चा (Chha), चिया (Chiya);
10. पंजाबी – चाई (Chai), चाय (Chay);
11. मराठी – चहा (Chaha);
12. मल्ल्याळी – चाया (Chaya)
13. इंग्रजी – आसाम टी (Assam tea), चाइना टी (China tea), इंडियन टी (Indian tea), टी प्लांट (Tea plant);
14. अरबी – चाह (Chha);
15. पर्शियन – चाइका थाई (Chaika thai)
16. संस्कृत – श्यामपर्णी, चाहम्, चविका;
निरनिराळ्या आजारांवर चहाचा औषधासारखा उपयोग होतो. ते आजार पुढीलप्रमाणे
1. डोकेदुखी- डोकेदुखीवर चहा हे उत्तम औषध आहे.
2. डोळे आलेले असताना चहाच्या पानांचा काढा करून त्याचे 2/3 थेंब डोळ्यात घातले तर खूप आराम पडतो.
3. घसा दुखत असताना किंवा घश्याला सूज आली असताना चहाच्या काढयाने गुळण्या केल्यास बराच आराम मिळतो.
4. ऋतु/हवामान बदलेले की अनेक लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होतो.
अश्या वेळी चहाच्या पानांचा काढा करून प्यायल्याने सर्दी खोकला बरा होतो, घश्यास आराम पडतो.
5. पोटदुखीवर देखील चहा गुणकारी आहे.
चहाची पाने आणि पुदिना एकत्र करून उकळून केलेला काढा घेतला की पोट दुखणे कमी होते.
6. मूत्राशयाशी निगडीत आजारांमध्ये देखील चहा गुणकारी आहे.
मूत्रमार्गात जळजळ होणे, वेदना होणे, ह्यावर चहाचा काढा उपयोगी आहे.
7. भाजल्यामुळे शरीरास झालेल्या जखमांवर चहाच्या पानांचा काढा गार करून लावल्यास जखमा भरून येण्यास मदत होते.
8. चहा हे उत्तम hair टॉनिक आहे. काळे व चमकदार केस मिळवणे चहा पिण्यामुळे शक्य आहे.
तर असे आहेत चहाचे गुणधर्म व फायदे.
योग्य प्रमाणात चहा प्या व ह्या फायद्यांचा लाभ घ्या, मात्र चहाचा अतिरेक करू नका.
स्वस्थ रहा, आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
चहा पिण्याचे फायदे खूप आवडले 😊. चांगले लिहिता👍👍