बहुगुणी हिंगाचे आरोग्यासाठी फायदे

हिंगाचे आरोग्यासाठी फायदे

आपल्या स्वैपाकघरत नेहेमी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हिंग.

हिंग हा मसाल्याच्या पदार्थापैकी एक असून जवळजवळ प्रत्येक घरात नेहेमी वापरला जातो.

हिंगाने पदार्थांचा स्वाद वाढतो हे तर आपल्याला माहीत आहेच, पण हिंगात अनेक औषधी गुण असल्यामुळे हिंग प्रकृतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.

अनेक वेगवेगळ्या आजारांवर हिंगाचा औषधासारखा उपयोग होतो.

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे वात, अपचन, पोटदुखी, वातामुळे पोट फुगणे , डायबीटीस, मूळव्याध ह्या सगळ्यांवर हिंगाचा औषधासारखा उपयोग होतो.

चला तर मग आज जाणून घेऊया हिंगाचे अनेक फायदे.

हिंग म्हणजे काय

हिंगाचं झाड १.५ ते २.४ मीटर उंच असते. हे झाड सुगंधी असते.

सदोदित हिरवे असणाऱ्या हिंगाच्या झाडाचे खोड मऊ असते.

झाडाच्या खोडाला चीर पाडून तिथून पाझरणारा रस साठवला जातो, तोच आपण वापरतो तो हिंग.

खोडाला एके ठिकाणी चीर पाडली की तेथून रस आणि डिंकासारखा घट्ट पदार्थ पाझरत राहतो.

तो सलग ३ महीने गोळा केला जातो, त्यानंतर पहिल्या चिरेच्या खाली दुसरी चीर देतात आणि तेथून पाझरणारा रस गोळा केला जातो.

हिंगाच्या झाडाची मुळे देखील रसयुक्त आणि डिंक असणारी असतात.

त्यातूनही हिंग गोळा केला जातो.

मार्च ते ऑगस्ट महिन्यात ह्याचे जास्त प्रमाणात उत्पादन होते.

शुद्ध हिंग हा पांढरा, स्फटिकाच्या आकाराचा साधारण ५ मिमि व्यासाचा गोल किंवा चपट्या तुकड्यांमध्ये असतो.

हिंगाचे झाड ४ वर्षाचे झाले की निघणारा हिंग हा सर्वोत्तम मानला जातो.

गोळा केलेल्या डिंक आणि घट्ट झालेल्या रसाचे चूर्ण/पावडर केली जाते.

आणि हाच आपण स्वैपाकात वापरतो तो हिंग.

हिंगाचे फायदे व उपयोग

हिंगाचा औषध म्हणून खालील प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो.

१. कावीळ – हिंग पाण्यात कालवून त्याची पेस्ट काजळाप्रमाणे डोळ्यात लावली असता काविळीवर त्याचा औषधासारखा उपयोग होतो.

२. कानदुखी – हिंग आणि सुंठ पावडरीचा काढा करून त्यात मोहोरीचे तेल घालून त्याचे १/२ थेंब कानात सोडावेत.

ह्याचा कानदुखी, कानात झालेल्या जखमा किंवा वेदना ह्यावर उपयोग होतो.

हिंग्वादी तेलाचे २ थेंब कानात घातल्याने देखील कानदुखी बरी होते.

३. दमा – हिंग पाण्यात विरघळवून ते कोमट करून छातीवर लावले असता दमा.

फुफ्फुसांना आलेली सूज ह्यावर उपयोग होतो.

४. मासिक पाळीच्या समस्या – अनियमित मासिक पाळी अथवा पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना, पोटदुखी ह्यावर हिंगाचे सेवन करणे उपयुक्त ठरते.

५. दात दुखी – दात दुखीवर घरच्या घरी करण्याचा उपाय म्हणजे हिंगाचा वापर.

त्यामुळे दात दुखी आटोक्यात येऊ शकते.

६. पोटदुखी – पोट दुखीवर हिंग गुणकारी आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे.

हिंग हा वात हारक असल्यामुळे मुरडा येऊन होणारी पोटदुखी थांबवण्यास मदत करतो.

लहान बाळांचे गॅस होऊन पोट दुखत असेल तर हिंगाचे पाणी पोटाला लावल्यास बरे वाटते.

७. डांग्या खोकला – लहान मुलांना होणारा डांग्या खोकला देखील हिंगाने बरा होऊ शकतो.

हिंगामुळे कफ कमी होतो व आराम पडतो.

तर हे आहेत निरनिराळ्या आजारांवर हिंगाचे घरगुती उपाय,

ह्याचा नक्की उपयोग करा. पण अर्थातच जर त्रास वाढत असेल, आराम पडत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

स्वस्थ रहा. आनंदी रहा…..

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

हिंगाची इतर भाषांमधील नावे

मराठी- हिंग

इंग्लिश – asafoetida

तमिळ- पेरूगियम

संस्कृत – सहस्रवेधी , हिंगु

उर्दू – हिंग

कन्नड – हिंगु

गुजराती – बधारणी

तेलगू – इंगूरा

बंगाली- हिंग,हिंगु

१० पंजाबी- हिंगे, हिंग

११ मल्याळम- करीक्कयम

१२ अरबी – हल तीत

१३ पर्शियन – अगेंजह

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.