गजकर्ण (Ringworm ) खरूज आणि नायटा होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

गजकर्ण (Ringworm ) खरूज आणि नायटा कारणे लक्षणे आणि घरगुती उपाय

Tags: खरूज वर घरगुती उपाय, खरूज वर उपाय, त्वचा रोग घरगुती उपाय, नायटा क्रीम, मायकोल मलम फोटो, गजकर्ण बेस्ट क्रीम, गजकर्ण घरगुती उपाय, त्वचा रोग घरगुती उपाय, गजकर्ण उपाय सांगा, गजकर्ण कशामुळे होते,  गजकर्ण होण्याची कारणे, नायटा साठी औषध, नायटा फोटो

त्वचारोग ही एक कॉमन समस्या आहे. अनेक लोक ह्या समस्येने ग्रस्त असतात.

त्वचारोगाच्या अनेक प्रकारांपैकी गजकर्ण, खरूज आणि नायटा हे सामान्यपणे आढळतात.

आज आपण गजकर्ण म्हणजे काय, हे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय काय ते जाणून घेऊया.

गजकर्ण हे त्वचेच्या वरच्या भागात होते. वैद्यकीय परिभाषेत गजकर्णाला टिनीया (Tinea) असे म्हणतात. हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला अगदी सहजपणे होतो.

गजकर्ण झाला की त्वचेवर एक गोलाकार लाल रंगाचा चट्टा उमटतो. ह्या चट्टयाला खूप खाज सुटते आणि तिथे आग आणि वेदना होतात.

गजकर्ण हे बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल किंवा इतर वस्तु वापरल्यामुळे सहजपणे पसरते.

तर आज आपण जाणून घेऊया गजकर्ण, खरूज इत्यादि होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय.

गजकर्ण म्हणजे नक्की काय

गजकर्ण हे एक प्रकारचे fungal इन्फेक्शन आहे.

अतिरिक्त प्रमाणात गोड किंवा मसालेदार पदार्थ खाणे, शिळे अन्न खाणे, उघड्यावरील अन्न खाणे आणि शरीराची स्वच्छता न राखणे ह्या कारणांमुळे त्वचेवर लालसर चट्टा उमटून तेथे खाज येणे, तो भाग लाल होणे अशी लक्षणे दिसतात. हेच गजकर्ण होय.

गजकर्णाचे चार प्रकार आहेत

१. टिनिया क्रूरीस (Tinea crusis)– ह्या प्रकारचे गजकर्ण हे सांध्यांमध्ये किंवा जांघा, नितंब अशा ठिकाणी होते.

२. टिनिया कॅपिटिस (Tinea capitis)– हे गजकर्ण डोक्याच्या वरील त्वचेला (टाळू / scalp) होते. हे सहसा लहान मुलांमध्ये जास्त आढळते आणि शाळेतून ह्याचा फैलाव जास्त प्रमाणात होतो. डोक्याच्या ज्या भागाला हे गजकर्ण होते तिथे हळूहळू टक्कल दिसू लागते.

३. टिनिया पीडिस (Tinea Paedis)– हे गजकर्ण पावलांना होते. सार्वजनिक ठिकाणी चपला न घालता वावरल्यामुळे अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.

४. टिनिया बार्बी ( Tinea Barbae )– हे गजकर्ण पुरुषांना दाढी येण्याच्या भागात आणि मानेवर होते.

सहसा हे तेथील केस अर्धवट तुटल्यामुळे होते. काही वेळा हे इन्फेक्शन सलून मध्ये सगळ्यांसाठी, त्याच स्वच्छ न केलेल्या वस्तु वापरण्यामुळे पसरते. म्हणून ह्याला बारबर्स ईच असे देखील नाव आहे.

तसेच एकमेकांच्या टॉवेल, कंगवा, कपडे अशा वस्तु वापरल्यामुळे देखील हे इन्फेक्शन पसरते.

गजकर्ण आहे हे कसे ओळखावे (लक्षणे)

गजकर्ण झाला असता त्वचेच्या त्या भागाला खाज येते हे प्रमुख लक्षण आहे. त्याशिवाय

१. त्वचेच्या त्या भागाची आग होणे.

२. त्वचेवर लाल रंगाचा चट्टा दिसून येणे.

३. त्वचेवरील चट्टा गोल असून त्याच्या कडा लाल आणि पुरळ असलेल्या असणे.

४. त्वचेवर तो चट्टा उभरून वर आल्यासारखा दिसतो.

गजकर्ण होऊ नये ह्यासाठी काय करावे 

गजकर्ण मुळात होऊच नये ह्यासाठी आपण आपल्या आहार आणि जीवनशैली मध्ये काही बदल करू शकतो.

आहारात खालील पदार्थांचा समावेश केला तर fungal इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

१. व्हिटॅमिन ‘इ’ चे सेवन- विटामीन ‘ई’ युक्त खाद्य पदार्थांचे सेवन करा. त्यामुळे आपली प्रतिकार शक्ति वाढते.

Fungal इन्फेक्शन कमी होण्यास मदत मिळते.

सूर्यफूल तेल, अक्रोड, मसुरची डाळ, पालक, बदाम, तीळ हे सगळे विटामीन ‘ई’ युक्त पदार्थ आहेत. ह्यांच्या सेवनाने बराच फरक पडतो.

२. लवंग- लवंग खाण्यामुळे देखील fungal इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

३. शरीराची स्वछता- शरीराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. अंघोळीनंतर अंग पुसून नीटकोरडे करणे, घाम आला असता तो नीट पुसून शरीर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

तसेच ज्याना इन्फेक्शन झाले आहे अशा लोकांच्या वस्तु न वापरणे, इनफेकटेड पाळीव प्राण्यांना जवळ न घेणे ह्याची काळजी घ्यावी.

४. व्यसन टाळावे- अतिरिक्त प्रमाणात गोड, तिखट, मसालेदार पदार्थ, जंक फूड, मद्यपान धूम्रपान इत्यादि करू नये.

५. खाजवू नये – जिथे गजकर्ण झाला आहे त्या जागी वारंवार खाजवू नये. त्याने इन्फेक्शन आणखी पसरते.

गजकर्ण: घरगुती उपाय

१. नारळाचे तेल– त्वचाविकारावर नारळाचे तेल अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. शिवाय इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. म्हणून गजकर्ण झालेल्या ठिकाणी नारळाचे तेल लावावे.

२. लसूण– लसणात Ajoene नावाचा एक अँटी फंगल पदार्थ असतो ज्यामुळे फंगल इन्फेक्शन बरे होऊ शकते.

लसणाच्या पाकळ्यांचे पातळ काप करून ते गजकर्ण झालेल्या ठिकाणी लावून वरुन एक पट्टी बांधून ठेवावी. असे रात्रभर ठेवल्यामुळे गजकर्ण बरे होण्यास मदत होते. इथे लसणाची पेस्ट देखील वापरता येऊ शकते.

३. हळद– हळद हे नॅच्युरल अँटी बायोटिक आहे. हळदीमध्ये पाणी मिसळून ते मिश्रण कापसाच्या सहाय्याने गजकर्ण झालेल्या ठिकाणी लावावे. हा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.

४. ऍपल सायडर विनिगर– ऍपल सायडर विनिगर कापसात बुडवून गजकर्ण झालेल्या ठिकाणी दिवसातून ४, ५ वेळा लावावे. हा देखील गजकर्ण बरे करण्याचा खात्रीचा उपाय आहे.

५. टी ट्री ऑइल– टी ट्री ऑइल हे अनेक प्रकारच्या त्वचा विकारांवर प्रभावी आहे. गजकर्ण झालेल्या ठिकाणी कापसाच्या सहाय्याने दिवसातून ३, ४ वेळा टी ट्री ऑइल लावावे. खूप फरक पडतो.

६. कोरफड– त्वचेसाठी कोरफडीचा चिक देखील अत्यंत गुणकारी आहे. गजकर्ण झालेल्या ठिकाणी रात्रभर कोरफडीचा चीक लावून ठेवावा. ह्यामुळे गोल चट्टा बरा होण्यास तसेच येणारी खाज कमी होण्यास मदत होते.

७. मोहरीची डाळ– मोहरीची डाळ पाण्यात काही वेळ भिजवून वाटून ते मिश्रण जर इन्फेक्शन झालेल्या भागाला लावले तर गजकर्ण कमी होण्यास मदत होते.

८. कारल्याचा रस– कारल्याचा रसात गुलाब पाणी मिसळून ते लावल्यामुळे गजकर्ण कमी होण्यास मदत होते.

९. एरंडेल– एरंडेलाची पाने दिवसातून ४, ५ वेळा चावून खावीत ह्यामुळे गजकर्ण कमी होण्यास मदत होते.

१०. कडुलींब– कडुलींबाची पाने अंघोळीच्या गरम पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करण्यामुळे त्वचारोग बरे होतात.

तर हे आहेत गजकर्ण (ringworm) वरचे घरगुती उपाय. त्याचा जरूर लाभ घ्या.

पण लक्षात ठेवा की हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. आणि ह्याचे प्रमाण जर वाढले तर त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

त्यामुळे जर वरील उपायांमुळे बरे वाटले नाही तर लगेच त्वचा तज्ञांचा सल्ला घ्या.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. kalade s E says:

    तळ हात भेगा पडणे कातडे जाने ववचा कोरडी पडणे रखरखीत होने उपाय सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!