टाळ्या वाजवण्याचे ७ फायदे आणि क्लॅपिंग थेरपीची पद्धत जाणून घ्या

क्लॅपिंग थेरपीचे फायदे आणि करण्याची पद्धत वाचा या लेखात

कोणालाही प्रोत्साहन द्यायचे असेल, अभिनंदन करायचे असेल किंवा आनंद व्यक्त करायचा असेल तर आपण सहजपणे टाळ्या वाजवतो.

पण तुम्हाला हे माहीत आहे का, की हे असं काही मिनिटांसाठी टाळ्या वाजवणे आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहे.

लाफिंग थेरपी प्रमाणेच टाळ्या वाजवण्याची थेरपी (क्लॅपिंग थेरपी) देखील आता खूप लोकप्रिय होत आहे.

मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे.

शरीराचे सर्व अवयव हे एकमेकाना नसांच्या आणि रक्त वाहिन्यांच्या सहाय्याने जोडले गेले आहेत.

आपल्या हाताच्या बोटांपर्यंत रक्तवाहिन्या आलेल्या असतात.

तिथे बोटांच्या टोकांपर्यन्त त्या असतात.

क्लॅपिंग थेरपी

नियमित टाळ्या वाजवल्या तर त्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारे रक्ताभिसरण सुधारते आणि तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात.

हाताच्या तळव्यात अक्यूप्रेशरचे ३० पॉईंट्स असतात.

टाळ्या वाजवल्यामुळे ते ऍक्टिव्हेट होऊन त्याचा तब्येतीस फायदा होतो.

चला तर मग आज जाणून घेऊया टाळ्या वाजवण्याचे ७ फायदे जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत.

१. मानसिक आरोग्य सुधारते

मनावरचा ताण कमी करण्याचे टाळ्या वाजवणे हे सर्वात उत्तम साधन आहे.

टाळ्या वाजवायला सुरुवात केल्यावर आपल्या मेंदूकडे पॉझिटिव्ह संदेश जाण्यास सुरुवात होते ज्यामुळे मनावरचा ताण, नैराश्य कमी होते तसेच मनात असलेल्या सर्व चिंता, ताण तणाव दूर होण्यास मदत होते.

आपण जर नियमीत स्वरूपात क्लॅपिंग थेरपी केली तर शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होऊन आपले मानसिक आरोग्य सुधारते.

२. हृदयाचे आरोग्य सुधारते

टाळ्या वाजवण्यामुळे हातांचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो, सुरळीत होतो.

त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.

तसेच इतरही अनेक हृदयाशी संबंधित आजार जसे की रक्तवाहिनी मध्ये गुठळ्या होणे, नसा ब्लॉक होणे इत्यादी कमी होण्यास मदत होते.

टाळ्या वाजवण्यामुळे श्वासाची गती देखील नियंत्रित होते.

३. रोगप्रतिकारशक्ति वाढते

संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की टाळ्या वाजवण्यामुळे रोगप्रतिकारशक्ति (इम्युनिटी) वाढते.

टाळ्या वाजवल्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होऊन प्रतिकार शक्ति वाढते, आणि हवामानात होणाऱ्या बदलांमुळे होणारे आजार कमी होण्यास मदत होते.

४. मुलांना फायदेशीर

नियमित स्वरूपात टाळ्या वाजवल्यामुळे मुलांच्या आकलन शक्तिमध्ये वाढ होते.

ह्यामुळे मुलांचा मेंदू तल्लख बनतो, स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते आणि हस्ताक्षर देखील सुधारते.

५. हाडे बळकट होतात

हाडांच्या दुखण्यामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांनी क्लॅपिंग थेरपी चा प्रयोग नियमित स्वरूपात करावा.

ह्यामुळे हाडांना बळकटी येऊन दुखणे कमी होण्यास मदत होते.

६. केसगळती वर उपयोगी

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की क्लॅपिंग थेरपी ही केसगळती रोखण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.

नियमित टाळ्या वाजवण्यामुळे संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारते व त्यामुळे केसांची मुळे सशक्त होतात आणि केस गळणे कमी होते.

७. अनेक रोगांवर उपयुक्त

क्लॅपिंग थेरपी ही संधिवात, उच्च रक्तदाब, मधुमेह, झोप न येणे, डोकेदुखी, सर्दी, डोळ्यांचे आजार अशा अनेक आजारांवर उपयुक्त आहे. ह्या आजारांचे पेशंटस ही थेरपी वापरुन त्यांचे आरोग्य सुधारू शकतात.

तर हे आहेत नियमित टाळ्या वाजवण्याचे क्लॅपिंग थेरपी चे फायदे. टाळ्या तर आपण नेहेमीच वाजवतो आणि तश्या त्या वाजवल्या तरी फायदा आहेच पण योग्य पद्धतीने टाळ्या वाजवल्या तर जास्त उपयुक्त आहेत.

योग्य पद्धत कोणती ते आपण जाणून घेऊया.

तर क्लॅपिंग थेरपी म्हणजेच टाळ्या वाजवण्यास सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही हातांच्या तळव्यांना खोबरेल तेल किंवा मोहोरीचे तेल लावून घ्या.

ते तळव्यांमध्ये पूर्णपणे जिरू द्या. मग दोन्ही तळवे सरळ ठेवून एकमेकांवर अशा पद्धतीने आपटा की तळवे व बोटे जुळली पाहिजेत.

अशा प्रकारे नियमितपणे क्लॅपिंग थेरपी करा. सकाळच्या वेळी क्लॅपिंग थेरपी केलेली जास्त फायदेशीर आहे, परंतु दिवसाच्या कोणत्याही वेळी आपल्या सोईप्रमाणे ती केली तरी फायदा आहेच.

तर हे आहेत शास्त्रशुद्ध क्लॅपिंग थेरपी चे फायदे. त्याचा जरूर लाभ घ्या. स्वस्थ रहा. आनंदी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “टाळ्या वाजवण्याचे ७ फायदे आणि क्लॅपिंग थेरपीची पद्धत जाणून घ्या”

  1. Excellent information. Trutiyapanthi aajari padat nahit kinva farach kvchit aajari padtat tyamagche “clapping” hech karan aahe,ase barech Doctors sangtat.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय