पुरुषांची लै_गिंक क्षमता कमी होणे, नपुंसकत्व, सं_भोग करताना लिं_ग ताठ न होणे या समस्यांवर ७ उपाय

ई_रेक्टाईल डिसफं_क्शन पुरुषांची लै_गिं_क क्षमता कमी होणे नपुंस_कत्व सं_भो_ग करताना लिं_ग ताठ न होणे

ई_रेक्टाईल डिसफं_क्शनने ग्रस्त आहात? हा लेख पूर्ण वाचा आणि त्या समस्येपासून मुक्ती मिळवा.

ई_रेक्टाईल डिसफं_क्शन म्हणजे सं_भो_ग करताना लिं_गामध्ये पुरेशी ताठरता न येणे किंवा आलेली ताठरता टिकवता न येणे.

पुरुषांना येणारी ही अशी समस्या आहे ज्यावर चर्चा किंवा औषधोपचार तर दूरच परंतु ह्याची वाच्च्यता करणे देखील टाळले जाते.

बऱ्याच लोकांना ह्या समस्येचा त्रास होत असतो. ई_रेक्टाईल डिसफं_क्शन होण्याची अनेक कारणे आहेत.

खूप प्रकारची औषधे घेत असणे, एखादा जुना आजार असणे, शरीराच्या पेल्विक एरियाला म्हणजेच पोटाच्या खालच्या भागाला पुरेसा रक्तपुरवठा न होणे, आणि अति मद्यपान आणि धूम्रपान करणे ही त्यापैकी काही कारणे.

सहसा ह्या आजाराची वाच्च्यता केली जात नाही. परंतु घरच्या घरी काही उपाय करून आणि दिनचर्येत काही बदल करून ह्या आजारावर मात केली जाऊ शकते. कशी ते पाहूया…

१. व्यायाम करा 

सतत बैठे काम करणे किंवा बसून राहणे टाळा.

शारीरिक हालचाल करणे हे शरीरातील चांगल्या रक्ताभिसरणासाठी आवश्यक आहे.

शारीरिक हालचाल न करणारे, व्यायाम न करणारे पुरुष हे सहसा ई_रेक्टाईल डिसफं_क्शनच्या त्रासाने ग्रस्त असतात.

वेगवेगळे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. भरभर चालणे, पळणे, पोहणे किंवा जीम मधील व्यायाम हयापैकी काहीही नियमितपणे करू शकता.

त्यामुळे ई_रेक्टाईल डिसफं_क्शन बरोबरच मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल आणि स्थूलता देखील कमी होते.

२. काय खाता ह्याकडे लक्ष द्या

चांगला आणि पौष्टिक आहार घेणे हे शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.

सतत जंक फूड खाणे, निकृष्ट आहार घेणे हे शारीरिक व्याधी निर्माण करते.

पौष्टिक आहारामुळे शरीरात पुरेसा रक्तसाठा राहतो आणि लैं_गि_क अवयवांपर्यंत चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो.

आपल्या आहारात भरपूर भाज्या, हिरव्या पालेभाज्या, उसळी, फळे, मोड आलेली कडधान्ये ह्यांचा वापर करा.

भरपूर फायबर असणारे पदार्थ आहारात असू द्या. लाल मांस आणि रिफाईनड पदार्थ आहारात घेऊ नका.

३. औषधे कमी करण्याचा प्रयत्न करा 

काही औषधे मुख्यत्वे नैराश्य किंवा झोप न येणे ह्यावरची औषधे ह्यांनी ई_रेक्टाईल डिसफं_क्शनचा त्रास होतो असे सिद्ध झाले आहे.

अशा औषधांची सवय लागते आणि मग ती औषधे घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

म्हणून वेळेवरच अशा आजारांचा सामना करा, त्यातून बाहेर या आणि अशी औषधे घेणे टाळण्याचा किंवा त्यांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा.

४. पुरेशी झोप घ्या 

थकवा आणि तणाव ह्या दोन्हीचा कामजीवनावर परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे.

पुरेशी झोप झालेली नसेल तर ई_रेक्टाईल डिसफं_क्शनचा त्रास होऊ शकतो.

तसेच मनावर असलेल्या ताणामुळेही असा त्रास होऊ शकतो.

म्हणून शरीराला आणि मनाला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे.

५. व्यसनांपासून दूर रहा

मद्यपान आणि धूम्रपान ही व्यसने सर्वच दृष्टीने वाईट आहेत.

परंतु दारू आणि सिगरेटचा सर्वाधिक परिणाम हा लैं_गि_क अवयवांवर होतो.

दारूच्या अतिसेवनाने लैं_गिक क्षमता कमी होते, तर सिगरेट मध्ये असलेल्या निकोटीनमुळे शरीरातील रक्ताभिसरण कमी होऊन ई_रेक्टाईल डिसफं_क्शनचा त्रास उद्भवतो.

म्हणून ह्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी दारू आणि सिगरेट सारख्या व्यसनांपासून दूर रहा.

६. ऍक्युपंक्चरचा उपयोग करा

ई_रेक्टाईल डिसफं_क्शनवर ऍक्युपंक्चर थेरपीचा बराच परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे तज्ञ लोकांकडून ही थेरपी करून घेणे फायद्याचे ठरू शकते.

७. जिनसेंग आणि डाळिंब

जिनसेंग ही हर्बल वनस्पती आणि डाळिंब हे ई_रेक्टाईल डिसफं_क्शनवर पूर्वापार औषध म्हणून वापरले जाते.

त्याचा आहारात समावेश करावा.

तर हे आहेत असे काही उपाय ज्यामुळे घरच्या घरी ई_रेक्टाईल डिसफं_क्शनवर मात करता येऊ शकते. त्याचा जरूर लाभ घ्या.

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

 

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.