छोट्या शिलाईदुकानापासून २२५ करोडचे साम्राज्य उभे करणाऱ्या भावांची प्रेरणादायी कहाणी

नरेंद्र मोदींचा ‘तो’ तब्बल १० लाखांचा बहूचर्चित पिनस्ट्रीप सूट आठवतो? ज्यावर छोट्या छोट्या अक्षरात त्यांचं नाव लिहिलेलं होतं?

तो ज्या ‘जेड ब्लु’ (Jade Blue ) या प्रीमियम ब्रांडचा होता, त्याचे संस्थापक असलेले जितेंद्र चव्हाण आणि विपीन चव्हाण यांच्या थक्क करणाऱ्या यशाची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे.

Narendra modi suit

अहमदाबादपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबडी गावात राहणारं चौहान कुटुंब… सहा पिढ्यांपासून शिवणाचं काम करून उपजीविका चाललेली.

हाच व्यवसाय सध्याच्या पिढीत जितेंद्र चौहान आणि विपीन चौहान यांनी चालू ठेवला.

त्याआधी जितेंद्र यांचे वडील चिमणलाल चौहान यांनी लिंबडी, मुंबई, कोलकाता इथं शिवणाचा व्यवसाय सुरू केला होता. पण धार्मिक वृत्ती असलेले चिमणलाल काही काळातच संन्यास घेऊन जुनागढला निघून गेले.

त्यामुळे व्यवसायाला खीळ बसली. त्यावेळी जितेंद्र यांचं वय फक्त ५ वर्षे इतकं होतं.

त्यामुळे सहाजिकच कुटुंबाची जबाबदारी एकट्या आईवर आली. साबरमती आश्रमाजवळ त्यांचं ‘चौहान टेलर्स’ नावाचं दुकान होतं. त्यावर कुटुंबाची गुजराण चालली होती.

एक वर्षानंतर सारं कुटुंब जितेंद्र यांच्या आजोळी रतनपोल, अहमदाबाद इथं आलं. तिथे १३ वर्ष वयाच्या जितेंद्र यांनी मामाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तेव्हा शालेय शिक्षणाबरोबरच शिवणाचं कौशल्य त्यांनी शिकून घेतलं.

१९७५ साली जितेंद्र यांचे मोठे भाऊ दिनेश यांनी ‘दिनेश टेलर्स’ नावाचं स्वतःचं दुकान सुरू केलं. तेव्हा भावाच्या दुकानात जितेंद्र यांनी काम सुरू केलं. दिवसाला दहा बारा शर्ट शिवण्याइतकं कौशल्य संपादन केलं. त्याचवेळी मानसशास्त्र विषयात पदवीही मिळवली.

कामाचा आवाका वाढवण्यासाठी १९८१ साली जितेंद्र यांनी स्वतःचं ‘बिस्पोक टेलरिंग अँड फॅब्रिक’ नावाचं दुकान सुरू केलं. बँकेकडून लोन घेऊन 250 स्क्वेअर फूट च्या जागेत सुरू केलेल्या या व्यवसायात माप घेणे, कपड्यांचे कटिंग करणे, योग्य ती स्टाईल देऊन शिवून सेल्समनचे काम सुद्धा जितेंद्र चपखलपणे सांभाळू लागले.

१९८६ साली मुंबईतील एका कंपनीसाठी त्यांनी कपडे शिवून दिले. पण काही कारणांमुळे सगळा माल परत आला….

मित्रांनो, यशस्वी उद्योजक तोच होऊ शकतो, जो अशा अडचणींमधून संधी शोधून कामाला लागतो.

या परत आलेल्या मालातूनच त्यांनी रेडिमेड शर्टचं ‘द पीक पॉईंट’ नावाचं दुकान सुरू केलं. आणि रिटेल व्यवसायात पाऊल टाकलं. एक वर्षानंतर रेडिमेड पँटही दुकानात उपलब्ध केल्या.

यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली. फॅशनचं ज्ञान, ग्राहकांची आवड आणि विश्वास या आधारावर प्रगती झाली असं जितेंद्र चौहान सांगतात…

१९९५ साली जितेंद्र यांनी ‘जेड ब्ल्यू’ नावाचं दुकान सुरू केलं. १९९९ साली यातच वाढ करून मल्टिब्रँड आऊटलेट सुरू केलं. ज्यात बारा नॅशनल प्रिमियम ब्रँडच्या पुरूषांच्या कपड्यांचा समावेश होता.

jade blue

पुढे फॅशनप्रमाणे जीन्स आणि विशिष्ट सांस्कृतिक पेहराव दुकानात उपलब्ध केले. २००३ साली ‘ग्रीन फायबर’ नावाने दुकान सुरू केलं. सध्या त्याच्या तीस शाखा आहेत, त्यापैकी आठ फ्रँचायजी म्हणून देण्यात आल्या आहेत.

सध्या अठरा शहरांमध्ये त्यांची बावीस दुकानं आहेत. नरेंद्र मोदींचा ‘तो’ तब्बल १० लाखांचा चर्चित पिनस्ट्रीप सूट याच ‘जेड ब्लु’ मध्ये तयार झालेला… या बहुचर्चित सुटला ४ करोड ३१ लाखाची बोली लागली तेव्हा ‘जेड ब्लु’ हा ब्रँड राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीच्या झोतात आला.

लवकरच जामनगर, भोपाळ, इंदोर येथे चार दुकानं सुरू होणार आहेत. सध्या ‘जेड ब्ल्यू’ चे वार्षिक उत्पन्न २२५ करोड असून जवळपास १२०० कर्मचारी येथे काम करतात.

आपल्या व्यवसायासंदर्भात जितेंद्र यांची काही तत्त्व आहेत.

  • व्यवसायात आपली मूल्यं जपा. स्वतःचं कौशल्य ओळखा.
  • कर्तव्य निष्ठेने आणि मनापासून आपलं काम करा.
  • आपल्या कामात इतरांना सहभागी करून एक कुटुंब तयार करा.
  • जोखीम घ्या, जबाबदारी घ्या आणि ताकदीनिशी काम करा.
  • ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ हे तंत्र कायम लक्षात ठेवा.
  • इतरांकडून काय शिकायला मिळेल ते बघा. लोकांना काय हवं आहे ते नीट समजून घ्या. जगात वावरताना कान सतत उघडे ठेवा.

अशा प्रकारे जितेंद्र चौहान आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच आयडॉल आहेत. हुशारी, जिद्द, कामावरील निष्ठा, जोखीम घ्यायची तयारी, लोकांना समजून घेण्याची कला हि जितेंद्र यांच्या यशाची गुपितं…. आपल्या दुकानात टेलरिंग करत आयुष्य घालवणं असं छोटंसं आपलं जग न ठेवता, एका शिलाई दुकानापासून २२५ करोडचं साम्राज्य उभं करण्याचं आपलं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं.

सध्याच्या काळात रोजगाराच्या वाटा शोधण्यापेक्षा त्या निर्माण करण्याची जर इच्छा असेल तर जितेंद्र चौहानांची तत्त्व कायम लक्षात ठेवा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय