योगनिद्रेचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का?

नियमित योगाभ्यास करण्याचे अगणित फायदे आहेत. प्राणायाम, सूर्यनमस्कार, वेगवेगळी योगासने ह्यांचे फार सकारात्मक परिणाम आपल्या तब्येतीवर होतात.

ही गोष्ट आता भारतातच नव्हे तर परदेशातही मान्य केली जाते. जगभर योगाभ्यास करणारे आणि त्याचा नियमित लाभ घेणारे लोक आहेत. लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण योगाभ्यास करू शकतात.

ह्याच योगाभ्यासाचा एक महत्वाचा भाग आहे योगनिद्रा

योगनिद्रा ह्याचा शब्दश: अर्थ घ्यायचा झाला तर योगाद्वारे घेतलेली निद्रा असा होऊ शकतो.

दररोज योगासने करणाऱ्या लोकांनी आपल्या सेशनचा शेवट योगनिद्रेने करावा. योगनिद्रेचे अनेक फायदे आहेत.

ते आपण जाणून घेणार आहोतच. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे योगासने करण्यामुळे शरीराचे तापमान वाढते ते योगनिद्रेमुळे पूर्वपदावर येते.

योगनिद्रेत शरीराचा एक एक अवयव क्रमाक्रमाने शिथिल, निद्रिस्त करायचा असतो.

सर्वप्रथम शवासन करून पुढे एक एक सूचना ऐकत त्याप्रमाणे शरीर शिथिल करत न्यायचे असते. त्यामुळे संपूर्ण शरीराला अतिशय आराम मिळून स्नायूंची झीज भरून येण्यास मदत होते.

नंतर ज्या क्रमाने अवयव शिथिल केले त्याच क्रमाने ते पुन्हा जागृत करायचे असतात.

अशा सूचना रेकॉर्ड करून त्या ऐकत घरी देखील आपण योगनिद्रा करू शकतो.

योगनिद्रेपासून शरीराला अनेक लाभ होतात. कोणते ते आपण पाहूया

१. योगनिद्रेमुळे शरीर आणि मनावरील ताण हलका होण्यास मदत होते. तसेच स्नायूंवरील ताण देखील हलका होतो.

२. योगनिद्रेमुळे स्वभावतील चिडचिडेपणा, अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

३. निद्रनाश (रात्री खूप वेळ झोप न येणे ), काही मानसिक आजार आणि त्यामुळे होऊ शकणारे शारीरिक आजार बरे होण्यास योगनिद्रेमुळे मदत होते.

४. योगनिद्रेमुळे स्मृतिभ्रंश कमी होतो, लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते आणि मुलांमध्ये नवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता वाढते.

५. योगनिद्रेमुळे शरीराच्या एकूण उर्जेत वाढ होते. त्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते.

६. सर्व प्रकारचे हॉरमोनल असंतुलन बरे होण्यास योगनिद्रेमुळे मदत होते.

७. शरीरातील वाईट गोष्टी टाकून देण्याचे म्हणजेच डीटोक्सीफिकेशनचे काम योगनिद्रेमुळे होते. तसेच मनावरचा ताणही हलका होतो.

८. योगनिद्रेमुळे कलात्मकता, कल्पकता वाढण्यास मदत होते, त्यामुळे कलाकार, आर्टिस्ट ह्यांना फार उपयोग होतो.

९. योगनिद्रेमुळे पंचेंद्रिये जागृत होण्यास मदत होते. त्यामुळे शरीराच्या जाणिवा सुधारतात.

१०. योगनिद्रेमुळे शरीराचा संपूर्ण थकवा कमी होऊन नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. योगनिद्रा हा दररोज नवीन जन्म मिळाल्यासारखा अनुभव असतो.

तर हे आहेत नियमित योगनिद्रा करण्याचे फायदे. आपणही जगभरात मान्यता पावलेल्या आपल्या योगाभ्यासाचा फायदा घेऊया.

नियमित योगासने आणि त्यानंतर योगनिद्रा करूया आणि निरोगी राहुया.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय