१५०/- रूपये पगार ते १००० कोटींचा व्यवसाय असा वेगळा आलेख मांडणारा अवलिया

सध्या तरूण वर्गाला नाना प्रश्न भेडसावत आहेत. नोकरी उद्योग करण्याचं वय आहे, पण संधी नाही.

अर्थार्जन होत असेल तर पुरेसं नाही. काम मिळालच तर ते टिकवता येईल याची शाश्वती नाही.

दिवसेंदिवस जबाबदारीचा डोंगर मात्र वाढतोय.

पण अशा वेळी खचून जाऊन कसं चालेल??

काही ना काही तडजोड करून, हिंमत करून तग धरून उभं राहणं महत्वाचं. शोध घेतला तर काम मिळवता येतं.

हिंमत केली तर इतरांसाठीही कामं निर्माण करता येतात.

विश्वास बसत नाहीये ना.. तर आज अशाच एका अवलियाची गोष्ट आपण पाहणार आहोत..

ही गोष्ट आहे खरंतर एका सामान्य शिक्षकाची.

दरमहा १५०/- रूपये पगार. त्यावर कशीबशी कुटुंबाची गुजराण व्हायची.

मुलं मोठी होऊ लागली तसा खर्च वाढायला लागला. थोडक्यात चारचौघांसारखी परिस्थिती.

पण काही माणसं असतातच ‘out of the way’ जाऊन काहीतरी करून दाखवणारी.

त्यापैकीच हे एक उदाहरण.

खर्चाचा ताळमेळ जमवण्यासाठी सुरू झालेली एका शिक्षकाची धडपड.

प्रयत्न करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

आणि बघता बघता अजंता, ऑरपॅट, ओरेवा हे नामांकित ब्रँड तयार करून १००० कोटींचा व्यवसाय उभा केला.

ज्यातून कुटुंबाची गुजराण हा सामान्य उद्देश तर सफल झालाच शिवाय स्वतःच्या व्यवसायातून इतरांनाही अर्थार्जनाची संधी दिली.

सध्याच्या तरूण पिढीसाठी हे एक आदर्श उदाहरण आहे.

मित्रांनो, अडचणीतून संधी शोधा आणि काम सुरू करा.

अजंता, ऑरपॅट, ओरेवा हे ब्रँड तयार करणाऱ्या निर्मात्याचं नाव आहे ओधावजी पटेल.

ओधावजी खरंतर सामान्य शेतकरी कुटुंबातले.

आवडत्या विज्ञान विषयात पदवी घेऊन, बी. एड. करून त्यांनी शिक्षकाची नोकरी स्विकारली.

शाळेत विज्ञान आणि गणित शिक्षक म्हणून तीस वर्ष नोकरी केली.

मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसाबसा घर खर्च भागत होता.

मुलं मोठी झाल्यावर हा खर्च भागवणं अवघड होऊ लागलं.

उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी व्यवसाय सुरू करायचं ठरवलं.

सुरूवातीला एक कपड्यांचं दुकान सुरू केलं, ते काही वर्ष चालवलं.

१९६० च्या सुमारास तीव्र दुष्काळ पडला. पाण्याची टंचाई निर्माण झाली.

गावागावात विहिरी होत्या पण काही कोरड्या तर काही विहिरींच्या अगदी तळाशी पाणी होतं.

हे पाणी खेचण्यासाठी तेल इंजिन वापरावं लागायचं.

ओधावजींना यात संधी दिसली आणि कल्पना सुचली. त्यांनी स्वतः असे तेल इंजिन बनवायला सुरुवात केली.

स्वतःच्या मुलीच्या नावावरून त्याला ‘जयश्री’ असं नाव दिलं.

जवळपास पाच वर्ष हे युनिट चाललं.

पुढे काही लोकांनी ट्रांझिस्टर घड्याळाची कल्पना ओधावजींपुढे मांडली.

ओधावजींनी या कल्पनेला आकार द्यायचं ठरवलं. त्या काळी जवळपास दीड लाख रूपयांच्या भांडवलातून दरमहा सहाशे रूपये देऊन एका भाडोत्री घरात घड्याळ बनवण्याचा कारखाना सुरू केला आणि ‘अजंता’ ब्रँडच्या घड्याळाची कल्पना प्रत्यक्षात आणली.

सुरुवातीला या कामात ओधावजींना नुकसानही सोसावं लागलं.

पण व्यवसाय म्हटल्यावर कधी फायदा कधी नुकसान या गोष्टी गृहीत धरलेल्या असतात.

काही दिवसांनी ‘अजंता’ घड्याळांना बाजारपेठेत चांगली मागणी मिळायला लागली.

बघता बघता ‘अजंता’ ब्रँड लोकप्रिय झाला. हळूहळू व्यवसाय वाढला.

पुढे ऑरपॅट आणि ओरेवा हे नामांकित ब्रँड सुद्धा ओधावजींनी बाजारात आणले.

अडचणीतून संधी शोधणारी दृष्टी, व्यवसाय सुरू करून चालवण्याची हिंमत, लोकांच्या अपेक्षेप्रमाणे उत्पादन तयार करण्याची क्षमता, फायदा, नुकसान दोन्हीचा विचार करून केलेलं नियोजन याच गोष्टी उद्योजकांसाठी महत्वाच्या असतात.

मित्रांनो, आयुष्यात तुमच्यासमोर काय येईल, कोणत्या परिस्थिती पासून तुम्ही सुरुवात कराल, हे नक्कीच तुमच्या हातात नसतं, पण प्रामाणिकपणे कष्टांची पेरणी करत राहणं हे तुमच्याच हातात असतं…

सहजासहजी काहीही मिळत नाही, म्हणून काम करत राहा, कल्पनांना सत्यात उतरवायचे मार्ग शोधत राहा… कारण ओधावजींसारखी कोटीच्या कोटी उड्डाणे तुम्ही सुद्धा नक्कीच घेऊ शकता…. काय पटतंय ना…

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय