प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७

Pradhanmantri-Awas-Yojna
ता.क.-  हि राजकारणाने प्रेरित होऊन केलेली पोस्ट नाही. वाचक माहितीसाठी हे वाचू शकता. 

आपले स्वतःचे हक्काचे घर ? असावे  हे मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाचे आयुष्यातले एक महत्वाचे स्वप्नच असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घेतलेल्या होम लोनवर सब्सिडी वाढवून देण्याची घोषणा केली आहे.

या योजने अंतर्गत विविध उत्पन्न गटासाठी म्हणजेच ३ लाख ते १८ लाख पर्यंतची मिळकत असलेल्यांना कर्जाच्या व्याजावर सब्सिडी दिली जाते.

योजनेचे लाभार्थी

ही योजना प्रामुख्याने समाजातील विशिष्ठ गटांना ध्यानात घेऊन आखली गेलेली आहे. जसे ….
१) वंचित महिला, वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग
२) आर्थिक दृष्ट्या कमकुवत गट
३) मध्यम उत्पन्न गट
४) अनुसूचित जाती जमाती
५) शेड्युलड कास्ट

या श्रेणीतील लोकांना १ लाख ते २.३० लाख च्या रकमेपर्यंतची सब्सिडी देण्याची तरतूद या योजनेत केली गेलेली आहे.

पंतप्रधान आवास योजनेची वैशिष्ठ्ये

१) कर्जाच्या सुरुवातीपासून लाभार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावर उत्पन्न गटाच्या वर्गीकरणानुसार ६.५% ते ३% व्याजात सवलत दिली जाईल.
२) या योजनेअंतर्गत महिला अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.
३) वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग अर्जदारांना ग्राउंड फ्लॉवर च्या वाटपासाठी प्राधान्य देण्याची तरतूद या योजनेत आहे.
४) पहिली गृह खरेदी असावी.

[table id=1 /]

प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा

हा अर्ज देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्जासाठी (येथे क्लीक करावे). हि योजना इ- गव्हर्नन्स नुसार असल्याने कॉमन सर्विस सेंटर जाणून घेण्यासाठी (येथे क्लीक करावे). Application Acknowledgement Receipt साठी येथे क्लीक करावे.  

Pradhanmantri-Awas-Yojna

कल्याण येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साधारण २.५० लाख ते ३ लाख सबसिडी देणारे गृहप्रकल्प सध्या बांधकाम चालू स्तिथीत आहेत. साधारण १ वर्षापर्यंत याचे हस्तांतरण होऊ शकेल. याबद्दल माहितीसाठी खालील अभिप्रायात किंवा Contact  Us आपण संपर्क साधू शकता. यातील एक प्रकल्प येथील Image मध्ये आपण पाहू शकता.

यातील गृहप्रकल्प विविध बँकांकडून मान्यताप्राप्त आहेत. ICICI बँकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लीक करा.

 


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!