या चार परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुमची तयारी ठेवली आहे का?

आपण सतत सकारात्मक विचार केला पाहिजे आणि आनंदी, उत्साही राहिले पाहिजे हे अगदी खरे आहे.
पण त्याच बरोबरीने आपण आपल्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या संकटांचा, वाईट परिस्थितीचा देखील विचार करून ठेवला पाहिजे.
बहुतेकवेळा होतं काय की आपण दुसऱ्या कुणाच्या बाबतीत अशी उद्भवलेली परिस्थिति पाहतो, आपल्याला खूप हळहळ देखील वाटते परंतु आपल्या बाबतीत देखील असे काही घडू शकेल, त्यामुळे आपण त्या तयारीत असावे असं काही आपलं मन मानायला तयार होत नाही.
आपण नेहेमी असाच समज करून घेतो की असं काही वाईट घडतं ते इतरांच्या बाबतीत.
आपण मात्र लकी आहोत. आपल्याला काही धोका नाही.
पण मित्रांनो, थांबा.. अशा उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करण्याची वेळ आली आहे.
कारण अशी काही वाईट परिस्थिति अचानक आपल्या आयुष्यात आली तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला बरेच काही सहन करावे लागते.
कुटुंबाची आर्थिक घडी कोलमडून जाते. पुष्कळ वेळा आपण ती परिस्थिती सावरायला तिथे नसतो किंवा असलो तरी सक्षम नसतो.
मग तेव्हा पश्चाताप होतो की आधीपासून छोट्या छोट्या गोष्टींची तयारी केली असती तर अशी वेळ आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर आली नसती.
तर म्हणूनच आज आपण पाहूया की अशा ४ परिस्थिती आपल्यावर ओढवल्या तर आपण त्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहोत की नाही.
परिस्थिती १. जर तुमची नोकरी गेली तर
असा विचार करा की आत्ता ह्या क्षणी तुमची नोकरी गेली आहे, तर मग तुम्हाला इथून पुढचे कमीत कमी सहा महिने सगळ्या आर्थिक जबाबदाऱ्या निभावता येतील का?
तुमच्या घराचा ईएमआय, इतर बिले तुम्ही भरू शकाल का?
नवी नोकरी मिळेपर्यंत तुम्ही घरखर्च व्यवस्थित भागवू शकाल का?
तुमच्या कुटुंबाला काही तडजोडी तर कराव्या लागणार नाहीत ना?
तसेच तुमच्या आवडीची नवी नोकरी मिळेपर्यंत थांबता येण्याची तुमची आर्थिक क्षमता आहे, की तुम्हाला मिळेल ती पहिली नोकरी घ्यावी आर्थिक सुरक्षेसाठी घ्यावी लागणार आहे?
ह्या प्रश्नांची हो किंवा नाही अशी उत्तरे स्वतःला द्यायचा प्रयत्न करा.
तर ही आहे उद्भवू शकणारी दुसरी वाईट परिस्थिती. अशा परिस्थितीसाठी सुद्धा आपण तयार असलंच पाहिजे ना ?
हातची नोकरी गेली तर काय करायचे? अशा प्रसंगाला सामोरं कसं जाल!!, याबद्दल लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
परिस्थिती क्रमांक २. जर तुम्हाला अचानक ५ लाख रुपयांची निकड निर्माण झाली तर
जर आजारपण किंवा आणखी काही कारणामुळे तुम्हाला ५ लाख रुपये अचानक उभे करायची गरज निर्माण झाली तर तुम्ही ते करू शकाल का?
तुम्हाला काही काळाची मुदत दिली तर असे पैसे उभे करणे जमेल का?
तितकी बचत तुम्ही तुमच्या खात्यात ईमर्जन्सि फंड म्हणून ठेवली आहे का?
किंवा तुम्ही कर्ज काढून अशी रक्कम उभी करू शकाल का?
ते फेडण्याची तुमची ताकद आहे का?
तर ही आहे तिसरी वाईट परिस्थिती. सध्या आपण असा विचारच करतोय, प्रत्यक्ष अशी वेळ आपल्यावर आलेली नाही, तर मग अशी वेळ आली तर कराव्या लागणाऱ्या तयारीला आपल्याकडे वेळ आहे, चला तर मग, लागा तयारीला.
इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तो कसा जमवावा, याबद्दल लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
परिस्थिती क्रमांक ३. जर तुम्हाला काही कारणाने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले तर
अचानक आलेले आजारपण किंवा अक्सिडंट ह्यामुळे अशी वेळ कोणावरही येऊ शकते.
अशा वेळी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असताना जर तुम्ही शुद्धीवर असाल तर नक्कीच तुमच्या कुटुंबाला मार्गदर्शन करू शकाल की मेडिक्लेम पॉलिसीचे कागद कुठे आहेत किंवा कोणत्या बँकेतून पैसे काढून दवाखान्यात भरायचे.
परंतु दुर्दैवाने तुम्ही जास्त आजारी असाल, तुमची शुद्ध हरपली असेल तर तुमचे कुटुंब अडचणीत येऊ शकते.
ह्यासाठी सर्वांच्या मेडिक्लेम पॉलिसीचे कागद, इन्शुरन्स कार्ड हे एकत्र ठेवून त्याची माहिती कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला देऊन ठेवणे आवश्यक आहे.
इतरही आर्थिक बाबींची माहिती तुमच्या कुटुंबाला असली पाहिजे.
अन्यथा आजारी व्यक्तीवर उपचार सुरु होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
परिस्थिती ४. जर काही कारणाने आपला मृत्यू ओढवला तर
खरं म्हणजे हे इतक्या थेट शब्दात लिहिणं तितकंस बरोबर नाही, पण सध्याचा अस्थिर काळ पाहता असा विचार करण्याची वेळ आली आहे हे मात्र नक्की.
जर काही कारणाने तुम्ही अचानक ह्या जगातून निघून गेलात तर तुमच्या कुटुंबाला तुमच्याशिवाय जगता येईल का?
त्यांना तुमच्या बँक अकाऊंटची, त्यात शिल्लक असलेल्या रकमेची, ते पैसे एटीएम मधून काढायचे झाल्यास त्याच्या पिन / पासवर्डची माहिती आहे का ?
तुमच्या कुटुंबाला तुमच्यावर असणाऱ्या आर्थिक जबाबदऱ्यांची कल्पना आहे का?
तसेच तुम्हाला मिळणार असणाऱ्या पैशांची त्यांना माहिती आहे का?
म्हणजेच थोडक्यात काय तर तुम्ही नसताना सुद्धा तुमचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहू शकेल का?
ही झाली पहिली परिस्थिती. आहात का तुम्ही त्यासाठी तयार?
तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी, याबद्दल लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तर ह्या अशा नकोशा वाटणाऱ्या परिस्थिती आहेत. खरंतर अशी वेळ कोणावरही यायला नको.
पण म्हणतात ना की वेळ काही सांगून येत नाही.
ह्या लेखाचा उद्देश आपल्याला घाबरवून सोडण्याचा किंवा निराश करण्याचा नक्कीच नाही, उलट काही वाईट घडणार तर नाहीच पण घडलेच तर त्या गोष्टीसाठी मी व माझे कुटुंब तयार आहोत असा आत्मविश्वास देण्याचा आहे.
तर मित्रांनो, ह्या लेखात दिलेल्या परिस्थितीचा नक्की विचार करा.
त्या दृष्टीने आपल्या कुटुंबाशी चर्चा करा. त्यांना सर्व आर्थिक बाबींची माहिती द्या, आणि संकट आलेच तर त्याला सामोरे जायला सिद्ध रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा