मोतिबिंदुवरील १२ घरगुती उपाय

मोतिबिंदु वरील १२ घरगुती उपाय

मोतीबिंदू हा डोळ्यांना होणारा एक आजार आहे. हया आजारात डोळ्यात असणारे दृष्टिपटल हळूहळू धूसर होत जाऊन दिसणे कमी होत जाते.

जसजसा धुसरपणा वाढेल तसतशी दृष्टी कमी होते. सामान्यतः हा आजार उतारवयात होतो.

परंतु काही जनुकीय दोषांमुळे लहानपणी किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणपणी देखील हा आजार होऊ शकतो. उतार वयात डोळ्यांच्या पटलाचा हळूहळू ऱ्हास होऊन मोतीबिंदू होऊ शकतो.

तर तरुणवयात सतत धूम्रपान करणे, वजन खूप जास्त असणे, अनियंत्रित रक्तदाब किंवा मधुमेह असणे आणि सतत कम्प्युटरसमोर काम करणे ह्यामुळे हा आजार होऊ शकतो.

मुळात हा आजार होऊच नये ह्यासाठी आपली जीवनशैली चांगली ठेवणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या डोळ्यांची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे.

परंतु तरीही वयोपरत्वे हा आजार उद्भवलाच तर तो भराभर वाढू नये म्हणजेच मोतीबिंदू लवकर पिकू नये ह्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

ह्या उपायांनी मोतिबिंदूची तीव्रता कमी होतो. त्याची वाढ हळूहळू होते. दृष्टी टिकून राहण्यास मदत होते.

आज आपण हे घरगुती उपाय कोणते ते पाहूया 

१. बडीशेप आणि धने समप्रमाणात घेऊन त्यात पिठीसाखर मिसळून ठेवावी. हे मिश्रण दररोज सकाळ संध्याकाळ १० ग्राम सेवन करावे. ह्याचा मोतीबिंदू लवकर न पिकण्यासाठी खूप फायदा होतो.

२. ६ बदाम आणि ७ काळी मिरीचे दाणे कुटून त्यात पाणी घालून ते गाळून घ्यावे. त्या पाण्यात पिठीसाखर मिसळून ते प्यावे. मोतिबिंदुवर गुणकारी आहे.

३. १० ग्राम गुळवेलीच्या रसात १ चमचा सैंधव आणि एक चमचा मध घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट काजळाप्रमाणे डोळ्यात घालावी.

४. त्रिफळ्याची पाणी घालून घट्ट पेस्ट करून ती डोळ्यावर ठेवून मग त्यावर पट्टी बांधून ठेवावी. नंतर डोळे धुवून टाकावेत. खूप उपयोग होतो.

५. १० मिलि कांद्याचा रस, १० मिलि मध आणि २ ग्राम भीमसेनी कापूर एकत्र मिसळून ते मिश्रण सकाळ संध्याकाळ डोळ्यांना लावावे.

६. गाजर , पालक आणि आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे.

७. एक चमचा धने बारीक कुटून एक कप पाण्यात उकळून घ्यावे. हे पाणी गाळून घेऊन सकाळ संध्याकाळ डोळ्यात घालावे.

८. नियमितपणे गाईचे दूध प्यावे. तसेच आहारात मेथी, भेंडी, पालक, केळी, द्राक्षे, सफरचंद, संत्रे, डाळिंब ह्यांचे नियमित सेवन करावे. फार आंबट व तिखट पदार्थ खाऊ नयेत.

९. रोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाल्ल्यामुळे डोळ्यांना तसेच इतरही बाबतीत लाभ होतो.

१०. तीव्र प्रकाश, कडक ऊन ह्यापासून डोळ्यांचे रक्षण करावे.

११. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा देखील डोळ्यांवर थेट परिणाम होतो.

१२. सतत कम्प्युटरवर काम करणे आवश्यक असेल तर दर अर्ध्या तासाने ५ मिनिटे ब्रेक घ्यावा. तसेच डोळ्यांचे व्यायाम नियमित करावेत.

हे आहेत मोतीबिंदू वाढू न देण्याचे घरगुती उपाय. ते जरूर करून पहा. हयाबरोबरच आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी डॉक्टरांकडून करत राहणे देखील आवश्यक आहे. ती देखील करत रहा. आपल्या डोळ्यांची काळजी घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

1 COMMENT

  1. मोतीबिंदू असल्यास तो operation न करता घालवता येतो का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.