जाणून घ्या मोतीबिंदूबद्दलचे ७ समज आणि गैरसमज

motibindu marathi Mahiti मोतीबिंदू

भारतात सध्या अगदी सहजपणे आढळणारा आजार म्हणजे मोतीबिंदू. मात्र लोकांमध्ये मोतिबिंदुबद्दल नीट माहिती असण्यापेक्षा गैरसमजच अधिक आहेत. त्यामुळे मोतिबिंदुवर योग्य वेळी योग्य ते उपचार झालेले दिसत नाहीत.

जून महिना ‘कॅटॅरॅक्ट अवेअरनेस मंथ’ म्हणजेच मोतिबिंदूची माहिती देण्याचा महिना म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण मोतीबिंदूबद्दलचे गैरसमज आणि त्यातील तथ्ये जाणून घेऊया.

मोतिबिंदुबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. तो होऊ नये ह्यासाठी काय करायचं किंवा झाला तर काय उपचार घ्यायचे हयाबद्दलही अनेक संभ्रम आहेत. आपण आज ते दूर करण्याचा प्रयत्न करुया.

१. मोतीबिंदू फक्त वयस्कर लोकांना होतो.

सत्य – मोतीबिंदू वयस्कर लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळत असला तरी तो काही फक्त वृद्ध लोकांना होणारा आजार नव्हे. मोतीबिंदू कोणत्याही वयात होऊ शकतो.

जनुकीय गुणधर्मामुळे लहान वयातच मोतीबिंदू होऊ शकतो किंवा धूम्रपान, स्ट्रेस, रक्तदाब किंवा डायबीटीस ह्यामुळे तरुण वयात देखील मोतीबिंदू होऊ शकतो.

२. योग्य आहार, व्यायाम आणि योगासने ह्यामुळे मोतीबिंदू होणे रोखता येते.

सत्य – अनेक लोकांमध्ये हा गैरसमज आढळून येतो की योग्य आहार, व्यायाम, योगासने किंवा काही औषधे ह्यामुळे मोतीबिंदू होऊ न देणे शक्य आहे. परंतु हे सत्य नाही.

मोतीबिंदू होणारच नाही असा काही उपाय किंवा औषध नाही. परंतु हे खरे आहे की नियमित डोळ्यांची तपासणी करणे, धूम्रपान न करणे, वजन प्रमाणात ठेवणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे ह्यामुळे मोतिबिंदूची वाढ हळूहळू होईल आणि फार त्रास होणार नाही असे प्रयत्न करता येऊ शकतात.

३. आय ड्रॉप्स मुळे मोतीबिंदू विरघळतो 

सत्य – असे कोणतेही आय ड्रॉप्स नाहीत ज्यामुळे मोतीबिंदू विरघळतो, बरा होतो किंवा होतच नाही.

अन्न व औषध प्रशासनाने अशा कोणत्याही आय ड्रॉप्सना मान्यता दिलेली नाही. मोतीबिंदू वयोपरत्वे किंवा इतर वर दिलेल्या कारणांमुळे हळूहळू होतो आणि वाढत जातो. त्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेऊन दृष्टी वाचवणे आवश्यक आहे.

४. मोतीबिंदू झालेला डोळा आधीसारखा करता येतो.

सत्य – नाही, मोतीबिंदू झालेला डोळा पुन्हा आधीसारखा करता येत नाही. ह्याचे कारण असेकी आपल्या डोळ्यात असणारी लेन्स ही मोतीबिंदू झाला की धूसर होत जाते त्यामुळे तो भाग काढून नवी लेन्स बसवणे हाच ह्यावरचा उपाय आहे.

आहे तीच लेन्स स्वच्छ करता येत नाही. फक्त धूसर होण्याची प्रक्रिया हळु होईल एवढे प्रयत्न करता येतात.

त्यासाठी योग्य आहार, नियमिट व्यायाम आणि धूम्रपान न करणे तसेच डोळ्यांच्या सुरक्षेसाठी उन्हात जाताना गॉगल लावणे आवश्यक आहे.

५. त्याच डोळ्याला पुन्हा मोतीबिंदू होऊ शकतो.

सत्य – आपल्या डोळ्यातील मूळ लेन्स धूसर झाल्यामुळे दृष्टी कमी होते त्याला मोतीबिंदू झाला असे म्हणतात.

त्यावरचा उपाय म्हणजे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया. ह्यामध्ये डॉक्टर आधीची धूसर झालेली लेन्स काढून टाकून तिथे नवीन लेन्स बसवतात. त्यामुळे त्याच डोळ्याला पुन्हा मोतीबिंदू होणे अशक्य आहे.

६. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया ही गंभीर आणि वेदनादायक असते.

सत्य – हा लोकांमध्ये असणारा एक मोठा गैरसमज आहे. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया गंभीर असते अशा समजामूळे लोक ही सोपी असणारी शस्त्रक्रिया करून घेत नाहीत आणि त्यामुळे दृष्टी गमावून बसतात.

खरे तर लेसर किरणांद्वारे केली जाणारी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया ही अत्यंत सोपी, कमी वेळात होणारी आणि अगदी इफेक्टिव शस्त्रक्रिया आहे.

ह्याचा यशस्वी होण्याचा रेटही अतिशय चांगला आहे. त्यामुळे अशा गैरसमजाना थारा न देता शस्त्रक्रियेविषयी आपल्या डॉक्टरांशी जरूर बोला.

७. मोतिबिंदूचे ऑपरेशन केल्यावर बरे होण्यास खूप वेळ लागतो.

सत्य – हे सत्य नाही. बहुतांश लोकांमध्ये ऑपरेशन झाल्यावर लगेचच दृष्टी सुधारते.

दुसऱ्याच दिवशीपासून ऑपरेशन झालेली व्यक्ति स्वतःची सगळी कामे करू शकते. काही लोकांची दृष्टी संपूर्णपणे सुधारण्यास थोडा वेळ लागतो. परंतु ते देखील लगेचच स्वतःची कामे करू शकतात.

तर हे आहेत मोतिबिंदुबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज आणि त्याची खरी उत्तरे. मोतीबिंदू होणे थांबवता येत नाही हे तर खरे परंतु त्याची वाढ हळूहळू होईल हे पाहणे शक्य आहे.

त्यासाठी आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडून नियमितपणे डोळे तपासून घेत राहणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा गैरसमजांना थारा देऊ नका. आपल्या डोळ्यांची काळजी घ्या.

मोतीबिंदूवरील घरगुती उपायांची माहिती देणारा लेख, लवकरच मनाचेTalks वर वाचायला मिळेल.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!