तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा नाणी आहेत का? असतील तर तुम्ही बनू शकता श्रीमंत

जुन्या नोटा किंवा नाणी आहेत का? असतील तर तुम्ही बनू शकता श्रीमंत जुने नाणी मूल्य

चकित झालात ना? पण हे खरे आहे, आपल्याकडे जर काही विशिष्ठ जुन्या नोटा किंवा नाणी असतील तर त्यांच्यामुळे आपण अगदी लखपती होऊ शकतो. कसे ते आपण आज जाणून घेऊया.

आपल्याला अनेकदा जुन्या नोटा किंवा नाणी साठवून ठेवायची सवय असते. काहीजण अशा पाकिटात असणाऱ्या नोटा खर्च करत नाहीत, किंवा काही वेळा अनावधानाने अशा नोटा किंवा नाणी आपल्याकडे राहून जातात.

परंतु अशा नोटा/ नाणी आपल्याला घरबसल्या भरपूर पैसे मिळवून देणार आहेत.

इंडियामार्ट, कॉईनबाजार किंवा पैसाबोलताहै अशा वेबसाइटवर सध्या अशा जुन्या नोटा किंवा नाणी विकल्या जात आहेत.

अनेक लोकांना जुन्या आणि विविक्षित नंबरच्या नोटांचा संग्रह करायचा शौक असतो. ते लोक अशा नोटा, नाणी कितीही रक्कम मोजून घ्यायला तयार असतात. नक्की कोणत्या नोटांना व नाण्यांना मागणी असते ते पाहूया.

नक्की कोणत्या नोटांना/नाण्याना मागणी असते?

१. १, २ किंवा ५ रुपयांच्या जुन्या नोटा ज्या आता चलनात नाहीत.

२. ज्या नोटांवर ट्रॅक्टरचे चिन्ह आहे किंवा ज्या नाण्यांवर गेंडा किंवा इतर विविक्षित चित्र आहे. (हे वेबसाइट वर नोंदवलेले असते.)

३. एखाद्या ठराविक राज्यपालांची सही असलेल्या नोटा.

४. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या नोटा / नाणी

५. ८८८८८ किंवा १२३४५ अशा सिरियल नंबरच्या नोटा.

६. ७८६ हा मुस्लिम लोकांचा लकी नंबर असलेल्या नोटा

७. एखाद्याच्या लकी नंबर किंवा जन्मतारीख असलेल्या नोटेसाठी ती व्यक्ति जास्त पैसे द्यायला तयार होते.

उदाहरण द्यायचं झालं तर एका १०० रुपयांच्या नोटेवर राज्यपाल ‘बी. सी. रामराव’ यांचे चित्र होते ती नोट coinbazzar.com वर ही १६०००/- रुपयांना विकली गेली.

ट्रॅक्टरचं चिन्ह असणाऱ्या ५ रुपयांच्या जुन्या नोटेला देखील अशीच मागणी होती. २५ पैशांचे गेंडयाचे चिन्ह असलेले जुने स्टीलचे नाणेदेखील असेच सध्या चर्चेत आहे. त्याला देखील खूप मागणी आहे.

कशी करायची जुन्या नोटा किंवा नाण्यांची विक्री?

आपण २५ पैश्यांच्या नाण्याचे उदाहरण घेऊया. जर तुमच्याकडे जूने स्टीलचे, गेंडयाचे चित्र असणारे २५ पैश्यांचे नाणे असेल तर ते तुम्हाला लखपती बनवू शकते. कसे ते पहा.

१. त्यासाठी त्या नाण्याचा एक स्पष्ट दिसणारा फोटो काढा.

२. त्यानंतर तो फोटो इंडियामार्ट किंवा कॉइनबाजार सारख्या वेबसाइट वर अपलोड करा.

३. तेथे होत असणाऱ्या लिलावात भाग घ्या.

४. जो तुमच्या नाण्यावर जास्तीत जास्त बोली लावेल त्या व्यक्तिला तुमचे नाणे विका.

५. ह्याबाबतीत तुम्ही घासघीस देखील करू शकता. त्यामुळे तुम्हाला जास्तीतजास्त पैसे मिळतील.

६. अर्थातच सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्यामुळे खबरदारी घेणे तितकेच आवश्यक आहे. खात्रीच्या वेबसाइटवरूनच असे व्यवहार करा.

तर अशा प्रकारे तुमच्याजवळ पडून असणाऱ्या जुन्या नोटा, नाणी तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देवू शकतात. त्याचा जरूर लाभ घ्या आणि घरबसल्या श्रीमंत व्हा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

3 Responses

  1. Praful shamram khonde says:

    Yes I have intred

  2. Prabhjit Singh Bedi says:

    I have old coin notes

  3. NITIN RAMDAS KHOBRAGADE says:

    I also have old coin

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!