लस ‘नकली’ आहे कि ‘असली’ आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

लस 'नकली' आहे कि 'अधिकृत' आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

भारतात सध्या करोनाचे लसीकरण अगदी जोरात सुरु आहे. २१ जून पासून केंद्र सरकारने राबवलेल्या नव्या धोरणामुळे १८ वर्षे वयाच्या वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम अगदी धडाक्यात सुरु आहे.

भारतात बनवलेल्या लसी तसेच काही प्रमाणात परदेशात बनवलेल्या लसी असे सर्व डोस उपलब्ध झाल्यामुळे आता भारतात लसीकरण वेगाने सुरु झाले आहे.

आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात एकूण ३२ कोटींपेक्षा जास्त डोस देऊन झाले आहेत.

शिवाय दररोज मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊन हा आकडा वाढतच आहे.

परंतु त्याच बरोबर नकली लसींचा व्यापार देखील देशात जोरात सुरु झाला आहे.

महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल मध्ये देखील नकली लसींचे प्रकरण समोर आले आहे. तृणमूल कोंग्रेसच्या सदस्य मिमी चक्रवर्ती अशाच प्रकारच्या नकली लसीकरण कॅम्पमध्ये सहभागी होऊन आजारी पडल्या आहेत.

महाराष्ट्रात मध्यंतरी अशा पद्धतीचा मोठा फ्रॉड समोर आला आहे.

मुंबईच्या कांदिवली ह्या उपनगरातील हिरानंदानी हेरिटेज ह्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये असे प्रकरण घडले आहे.

ह्या सोसायटीने ३० मे रोजी सोसायटीच्या सर्व रहिवाश्यांसाठी सामूहिक लसीकरण कॅम्प आयोजित केला होता. त्यात सुमारे ३९० लोकांनी लस घेतली.

परंतु ह्यात काहीतरी फसवणूक आहे असे लक्षात आले कारण ३९० पैकी एकाही व्यक्तिमध्ये लसीकरण झाल्यावर जाणवणाऱ्या लक्षणांपैकी एकही लक्षण दिसून आले नाही.

तसेच लसीकरण झाल्यावर मिळणारे सर्टिफिकेटही त्यांच्यापैकी कोणालाच मिळाले नव्हते. त्यानंतर चौकशी केली असता असे समोर आले की ज्या हॉस्पिटलच्या नावाने हे लसीकरण करण्यात आले होते त्या हॉस्पिटलने असे काही लसीकरण केलेच नव्हते.

कोणीतरी परस्पर त्या हॉस्पिटलच्या नावाने नकली लसी देऊन लुबाडणूक केली होती. प्रत्येक लसीचे १२६० रुपये घेण्यात आले म्हणजे जवळजवळ ५ लाख रुपये लुबाडले गेले.

असेच प्रकरण पश्चिम बंगालमध्येही समोर आले आहे. एका माणसाने आपण आयएएस अधिकारी आहोत असे भासवून ठिकठिकाणी लसीकरण कॅम्प घेतले. तेथे अनेक नागरिकांना लसी देण्यात आल्या. संसदपटू मिमी चक्रवर्ती अशा खोट्या लसीकरणाच्या शिकार होऊन आजारी पडल्या तेव्हा हे प्रकरण समोर आले.

चक्रवर्ती ह्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता सदर प्रकार समोर आला. ह्या आरोपीला अटक झाली असून करोना लसीच्या जागी अँटिबायोटिक डोस दिल्याचे त्याने कबूल केले आहे.

अशा प्रकारच्या नकली लसीकरणामुळे पैश्यांची लूट तर होतेच शिवाय लसीऐवजी भलतेच काही शरीरात टोचले गेल्यामुळे आपल्याला काही धोका देखील होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नकली लसीकरणापासून सावध रहा.

ह्यासाठी काय काळजी घ्यावी ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लसीकरण झाले असल्याचा मेसेज आणि सर्टिफिकेट फार महत्वाचे आहे.

आपले लसीकरण यशस्वी झाले आहे हे कसे ओळखावे?

आपल्याला लस दिल्यापासून ५ मिनिटात आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर तसा मेसेज आला पाहिजे.

तसेच लस दिल्यापासून १ तासाच्या आत कोविन पोर्टल वर आपले सर्टिफिकेट मिळाले पाहिजे.

सर्व सरकारमान्य लसीकरण केंद्र आणि मान्यताप्राप्त खाजगी हॉस्पिटल्स ह्याच पद्धतीने काम करत आहेत.

म्हणजेच मेसेज किंवा सर्टिफिकेट मिळायला वेळ लागत असेल किंवा त्यात टाळाटाळ होत असेल तर ते लसीकरण नकली असू शकते.

मुंबईतील प्रकरणात सर्व रहिवाश्यांना एकत्र सर्टिफिकेट मिळेल असे सांगून नंतर सर्टिफिकेट दिलीच नव्हती. त्यामुळे असे सांगितले गेले तर वेळीच सावध व्हा. आधी सर्व खात्री करून मगच लस घ्या.

लसीकरण नोंदणी करताना फ्रॉड 

लस मिळण्यासाठी नावनोंदणी करताना ती अधिकृत कोविन ऍपवरुन करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही लिंक वर क्लिक करून आपली माहिती दिल्यास फ्रॉड होण्याची शक्यता आहे. आपल्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो,

तशा अनेक घटना सध्या समोर येत आहेत.

तर मित्रांनो, नकली लसीकरणापासून सावध रहा कारण ही फक्त पैश्यांची लुबाडणूक नव्हे तर नकली लसीमूळे आपले आरोग्यही धोक्यात येऊ शकते.

लवकरात लवकर लस घ्या पण सुरक्षित आणि अधिकृत ठिकाणीच.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!