मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाच्या रंगावरून जाणून घ्या तुमची तब्येत

मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाच्या रंगावरून जाणून घ्या तुमची तब्येत

मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे.

वयाच्या साधारण १२ व्या वर्षी सुरु होणारी मासिक पाळी स्त्रीच्या वयाच्या ४५ ते ५० वर्षांपर्यंत सुरु असते.

स्त्रियांच्या आरोग्याशी मासिक पाळीचा जवळून संबंध असतो.

मासिक पाळी गरोदरपणाचा काळ सोडला तर एरवी नियमितपणे दर २८ ते ३० दिवसांनी येणे अपेक्षित आहे.

ती तशी येत नसेल, जर लवकर किंवा उशिराने येत असेल तर स्त्रीरोगतज्ञांना वेळीच दाखवून त्यावर उपचार करून घेणे आवश्यक आहे.

तसेच पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे, पोटात फारच जास्त दुखणे किंवा चक्कर येणे असे प्रकार होत असतील तर महिलांनी त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे.

ह्याशिवाय पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव कसा असावा हे देखील वैद्यकशास्त्रात सांगितले आहे.

त्यापेक्षा निराळ्या रंगाचा स्त्राव असेल तर ते तब्येतीच्या तक्रारीचे लक्षण आहे.

मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाच्या रंगावरून जाणून घ्या तुमची तब्येत

वेगवेगळ्या रंगांचे रक्तस्त्राव वेगवेगळे आजार दर्शवतात. कोणते ते आपण पाहूया 

१. लाल रंग 

नॉर्मली पाळीदरम्यान लाल रंगाचा रक्तस्त्राव होतो. त्यामुळे फ्रेश लाल रंगाचा रक्तस्त्राव होत असेल तर ते अगदी योग्य आहे.

२. काळपट लाल रंग 

पाळीच्या सुरुवातीला आणि पाळी संपताना रक्तस्त्रावाचा रंग काळपट लाल असणे नॉर्मल आहे. परंतु संपूर्ण पाळीदरम्यान असे होत असेल तर ते योनिमार्गातील अडथळ्याचे लक्षण आहे. तेथे इन्फेक्शन असू शकते. त्यामुळे ताप येणे, योनिमार्गात आणि आसपासच्या भागात खाज येणे, लघवी करताना दुखणे अशी लक्षणे देखील दिसून येतात.

३. ग्रे रंग

ग्रे रंगाचा रक्तस्त्राव हे बॅक्टेरियल इन्फेक्शनचे लक्षण आहे. ह्या आजाराला बॅक्टेरियल वजायनॉसिस असे म्हणतात. योनिमार्गात असणाऱ्या बॅक्टीरियांचे संतुळण बिघडले की असा रक्तस्त्राव होतो.

५. केशरी रंग 

केशरी रंगाचा स्त्राव असेल तर सर्वायकल फ्लूइड पाळीच्या स्त्रावात मिसळले जात असण्याची खूप जास्त शक्यता आहे. असे होणे इन्फेक्शनचे लक्षण आहे. ह्याची त्वरित तपासणी होणे आवश्यक आहे.

६. चॉकलेटी किंवा डार्क लाल रंग 

पाळीच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या काळात असा रक्तस्त्राव होऊ शकतो. गर्भधारणेच्या सुरुवातीला देखील काही वेळा असे होऊ शकते. तसेच शरीरात ऑक्सिजनची कमतरता असेल तर असे होऊ शकते.

तर ही आहेत काही लक्षणे ज्यावरून आपण आपल्याला काही आजार आहे का हे ओळखू शकतो.

तसेही सर्व स्त्रियांनी दर ६ महिन्यांनी एकदा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना आपली तब्येत जरूर दाखवावी. स्त्रिया बहुतेक वेळा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग डॉक्टरांकडे गेलं तरी उशीर झालेला असतो.

तेच जर वेळेत तपासणी झाली तर अनेक आजार औषधे घेऊन सहज बरे होऊ शकतात.

तर महिलांनो, आपल्या तब्येतीबाबत जागरूक रहा. स्वतःची काळजी घ्या, तरच तुम्ही कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकाल.

Image Credit : News18

मनाचे श्लोक

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!