जाणून घ्या मोहोरीचे फायदे आणि तोटे

मोहोरीचे फायदे आणि तोटे

‘चुर्र..’ असा आवाज आणि खमंग वास आला की आपण ओळखतो की घरात कोणत्यातरी पदार्थाला फोडणी दिली गेली आहे. फोडणीच्या खमंग वासाचा सगळीकडे नुसता घमघमाट सुटतो.

भारतीय जेवणाचा प्रमुख भाग असलेल्या ह्या फोडणीतला मुख्य घटक असतो तो म्हणजे मोहरी. मोहरी काळी, लाल किंवा पांढरी देखील असते. स्वयंपाकात मुख्यतः काळी किंवा लाल मोहरी वापरली जाते. अगदी लहान किंवा मध्यम आकाराची मोहरी मिळते. आपापल्या आवडीनुसार लोक ती वापरू शकतात.

भारतातील प्रत्येक राज्यात मोहरी नक्कीच वापरली जाते. फोडणीच्या बरोबरीने काही भागात मोहरीचे तेल देखील वापरले जाते.

आज आपण आहारात मोहरी असण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत.

आहारात मोहरीचे फायदे 

१. अजीर्ण 

अजीर्ण झाले असल्यास ३ ग्रा. मोहरी वाटून तिची पेस्ट पाण्यात मिसळून प्यावी. आराम मिळतो.

२. फिट येणे, चक्कर येणे 

फिट किंवा चक्कर येऊन भान हरपल्यास मोहरी बारीक वाटून त्याचा वास रुग्णाला दिल्यास रुग्ण भानावर/ शुद्धीवर येतो.

३. मासिक पाळीच्या समस्या 

मासिक पाळीच्या समस्या असणाऱ्या स्त्रियांनी २ ग्रा. मोहोरीचे चूर्ण जेवताना पहिल्या घासाबरोबर खावे. मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

४. सर्दी 

सर्दी झालेली असल्यास मोहोरीचे चूर्ण आणि मध समप्रमाणात घेऊन चाटण बनवावे. हे चाटण दिवसातून २ वेळा घेतल्यास सर्दीपासून आराम मिळतो.

५. उचकी लागणे 

१० ग्राम मोहरी २५० एमएल पाण्यात उकळून ते पाणी गाळून घ्यावे. कोमट झाल्यावर ते पाणी प्यायले असता उचकी थांबते.

६. विषबाधा 

अन्नातून विषबाधा (फूड पॉइजनिंग) झाली असेल तर २ चमचे मोहोरीचे चूर्ण पण्याबरोबर घ्यावे. जोरदार उलटी होऊन पोटातील सर्व अन्न बाहेर पडते आणि विषबाधेचा प्रभाव कमी होतो.

मोहोरीचा लेप 

मोहोरीचा लेप अनेक आजारांवर गुणकारी आहे.

लेप करण्याची कृती – मोहोरीचे दाणे गार पाणी घालून वाटून घ्यावे. ते मिश्रण एका तलम मलमलच्या कपड्यावर पसरून मग तो कपडा शरीरावर जिथे लेप करायचा असेल तिथे ठेवावा. कपड्यात न गुंडाळता थेट त्वचेवर लेप लावला तर त्वचेवर पुरळ येऊन त्रास होऊ शकतो कारण मोहोरी फार उष्ण असते.

लेप जास्तीतजास्त १० ते १५ मिनिटे ठेवावा. त्याहून अधिक काळ ठेवल्यास त्रास होऊ शकतो. त्वचा लाल होऊन त्वचेवर चट्टे येऊ शकतात.

असा लेप पोटदुखी असेल किंवा उलट्या होत असतील तर पोटावर लावावा. त्वरित आराम मिळतो.

परंतु मोहोरी प्रकृतीने उष्ण असल्यामुळे तिचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

कोणते ते आपण जाणून घेऊया.

मोहोरीचे आरोग्यासाठी तोटे 

कोणताही पदार्थ खाण्याचा अतिरेक केला तर त्याचे शरीराला तोटे होतात हे तर खरेच आहे. त्यामुळे मोहोरी देखील प्रमाणात खावी.

मोहोरीच्या अतिरेकामुळे उष्णतेशी निगडीत विकार होऊ शकतात. त्यामुळे खालील विकार झाले असल्यास मोहोरीचे सेवन प्रमाणात करावे.

१. उच्च रक्तदाब

२. मूळव्याध किंवा बवासीर

३. पित्त

४. संधिवात

५. जळजळ किंवा वेदना

६. वारंवार चक्कर येणे.

तर हे आहेत आपल्या किचनमधील प्रमुख घटक पदार्थ मोहोरी खाण्याचे फायदे आणि तोटे. प्रमाणात खाऊन मोहोरीच्या खमंगपणाचा आस्वाद घ्या, तिच्या सेवनाचा अतिरेक टाळा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.