८० रुपयांच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या लिज्जतच्या साम्राज्याची प्रेरणादायक यशोगाथा

उधार घेतलेल्या ८० रुपयांच्या भांडवलावर उभे राहिले ३३४ करोड टर्नओव्हर असणारे साम्राज्य. वाचा “लिज्जत पापड” या समूहाची ही प्रेरणादायी यशोगाथा

“कर्रम् कुर्रम्.. लिज्जत पापड” ही जाहिरात सगळ्यांनाच आठवते. घराघरात पापड म्हटले की ते लिज्जतचे असेच समीकरण आहे. परंतु हा एवढा मोठा लिज्जत समूह केवळ ८० रुपयांच्या भांडवलावर वर उभा राहिला आहे आणि ते ८० रुपये देखील उधार घेतले गेले होते हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

मुंबईतील गिरगावात राहणाऱ्या काही महिलांनी मिळून दुपारचा रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी सुरु केलेला हा व्यवसाय इतके मोठे स्वरूप धारण करेल याची त्या महिलांना कल्पना देखील नव्हती. गिरगावातील एका चाळीत राहणाऱ्या जसवंती बेन पोपट यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काही महिलांची मदत घेऊन हा व्यवसाय सुरू केला.

पती कामावर आणि मुले शाळेत गेल्यावर दुपारी उरलेला रिकामा वेळ कसा घालवायचा या विवंचनेत असलेल्या या महिलांनी १५ मार्च १९५९ या दिवशी उधार घेतलेले ८० रुपये वापरुन डाळ आणि मसाले खरेदी केले. ते वापरून त्यांनी पापड तयार केले. त्या पापडांची चार पॅकेटस् बनवून त्यांनी जवळच्या दुकानात नेऊन दिली. त्या दुकानदाराला ते पापड आवडले. त्याने आणखी पॅकेटस् तयार करण्याची ऑर्डर जसवंती बेन आणि त्यांच्या ६ मैत्रिणींना दिली. आणि अशा प्रकारे झाली “लिज्जत पापड” ह्या मोठ्या उद्योगसमूहाची सुरुवात. १५ दिवसातच घेतलेली उधारी ह्या महिलांनी फेडली. आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

पहिल्याच वर्षी लिज्जत पापडांची ६१९६ रुपयांची विक्री झाली. त्यामुळे हुरूप येऊन ह्या महिलांनी आणखी महिलांना आपल्या कामात सामील करून घेतले. जवळपासच्या महिला जसवंतीबेन कडे येऊन काम शिकू लागल्या. काही महिला सकाळपासूनच पापडचे पीठ भिजवत. मग दिवसभर इतर महिला येऊन ते पीठ घरी घेऊन जात आणि पापड बनवून दुसऱ्या दिवशी सेंटरवर आणून देत. ह्या महिलांना घरच्या घरी पापड बनवणे सोपे जात होते कारण घराकडे लक्ष देऊन काम करणे त्यांना सोयीचे वाटत होते. आजकाल वापरली जाणारी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना १९६० मध्येच “लिज्जत पापड” ने वापरली.

तुम्हाला गम्मत वाटेल पण लॉकडाउनच्या काळात ‘लिज्जत पापड़ वर्क फ्रॉम होम’ असा इंटरनेटवर सर्च करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

आज “लिज्जत पापड समुहात यात सुमारे ४० हजार महिला मेम्बर असून दररोज सुमारे ९० लाख पापडांची निर्मिती होते. या संस्थेचे मुख्य ऑफिस मुंबई येथे असून पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. सुरुवातीपासून संस्थेशी निगडित असणाऱ्या २१ महिला मिळून हा सर्व व्यवसाय चालवतात. हजारो महिलांना आत्मनिर्भर बनवणारा हा लिज्जत पापड समूह अतिशय प्रामाणिकपणे आपले काम करतो आहे.

देश-विदेशात निर्यात होणारा लिज्जत पापड अतिशय लोकप्रिय असून मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत असते. होणारा संपूर्ण नफा पापड लाटणाऱ्या सर्व महिलांमध्ये वितरित केला जातो त्यामुळे आपोआपच त्या महिलादेखील कंपनीच्या मालक बनल्या आहेत. घरबसल्या काम करून पैसा मिळणे ही सदर महिलांसाठी फार मोठी गोष्ट आहे. आता या महिला घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावू शकतात.

“श्री महिला गृह उद्योग, लिज्जत पापड” ची स्थापना करणाऱ्या जसवंती बेन पोपट आज वयाच्या ९१ व्या वर्षी देखील कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिज्जत पापड समूहाची घोडदौड जोरात सुरू आहे. अतिशय उत्तम क्वालिटी आणि पारदर्शक व्यवहार यासाठी लिज्जत पापड प्रसिद्ध आहे. जसवंतीबेन यांना सरकारने पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केले आहे.

अशी ही गिरगावातील छोट्या चाळीत सुरू झालेली लिज्जत पापड समूहाची मोठी कहाणी. स्त्रियांनी ठरवले तर त्या कितीही मोठी भरारी सहजपणे घेऊ शकतात हेच आपल्याला यातून समजते. मैत्रिणींनो, आपणही यातून प्रेरणा घेऊया आणि जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करूया.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय