आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी सांगितलेली जीवनशैली…

आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आणि खाण्या पिण्यात काही जुजबी नियम पाळले तरी उत्तम आरोग्य आणि सुदृढ जीवनशैली सहज मिळवता येते.

पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले (Aayurvedachary Vaidya Khadiwale) यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना या लेखात आपण वाचणार आहोत.

ह्या साध्या आणि सोप्या सूचना पाळल्यास तुमच्यापासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील…. आणि स्लिम अँड फिट राहाल ….

तरुण दिसण्यासाठी आणि स्लिम-ट्रिम राहण्यासाठी आजकाल बरेच द्रविडी प्राणायाम लोकं करतात. आणि अव्वाच्या सव्वा पैसा यात खर्च होतो.

यात खाली दिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी जरी पाळल्या तरी कायम तारुण्याचा अनुभव नक्कीच घेता येईल……

  • रात्रीच्या झोपण्यासाठी १०.०० वाजण्यापेक्षा जास्त उशीर करू नये.
  • सकाळी ५.०० – ५.३० किंवा त्याच्या आत उठावे.
  • ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून प्यावे.
  • १० मिनिटे वज्रासनात बसावे.
  • कमीत कमी फक्त १० सूर्यनमस्कार जास्तीत जास्त २५ हळुवारपणे घालावे.
  • फक्त १० मिनिटे प्राणायाम कमीतकमी…५ मिनिटे ओंकार करावा.
  • रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस घ्यावा.
  • ८.३० – ९.०० वाजता भरपूर नाष्टा करावा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
  • १२.३० ला थोडे हलके जेवण.
  • कामाच्या ठिकाणी मधेच दर १ तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करावे.
  • संध्याकाळी ७ – ७.३० ला एकदम कमी जेवण घ्यावे.
  • कंपल्सरी १५ मिनिटे तरी वज्रासना मध्ये बसावे.
  • १०.०० वाजता १ ग्लास गरम पाणी प्यावे आणि झोपावे.

या खबरदारी घ्या…

  • रात्रीच्या जेवणानन्तर थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात…. म्हणजे शंभर पावले चालणे….
  • लोकं ५-५ किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री…. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
  • जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवणा नंतर एक तासाने पाणी प्यावे.
  • पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.
  • रोज कमीत कमी ३ लिटर पाणी प्यावे.
  • फक्त सिजनल फळेच खावी
  • कोल्डड्रिंक पिणे टाळावे.
  • डाव्याकुशीवर झोपावे.
  • सकाळी ५ मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.

आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलंही आजारपण येत नाही, पचनाशी सम्बंधित छोट्या छोट्या तक्रारीच हळूहळू मोठ्या आजाराचे रूप घेतात. आणि वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यासाठीच आहेत.

वैद्य खडीवाले

किडनीस्टोनच्या त्रासावर करण्यासारखा घरगुती उपाय…

कोथींबीर बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात बारीक चिरलेली कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ ग्लास ठीक १५ दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक स्टोन निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्णपणे साफ होईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी सांगितलेली जीवनशैली…”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय