गणेशोत्सवात सॅनिटायझरचा वापर कसा कराल?

गणेशोत्सव हा आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवाचा उत्साह दरवर्षी शिगेला असतो, मात्र कोरोनाच्या संकटाचे सावट असल्याने यंदाचा गणेशोत्सव काहीसा घरगुती स्वरूपातच आहे.

कोरोना या जीवघेण्या महामारी विरोधात सॅनिटायझरचा व मास्कचा नियमित वापर करणे हे एकमेव शस्त्र आपल्या हातात आहे. सॅनिटायझरचा वापर करा असे आवर्जून आपण म्हणतो, पण वापर कसा व कुठे करावा आणि वापरतांना काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. कारण सॅनिटायझर हे ज्वलनशील आहे. त्यामुळेच योग्य ती काळजी घेतली तर ज्वलनाचा अपघात घडण्याचे संकट ओढवणार नाही.

सॅनिटायझर या द्रव्यात अल्कहोलचे प्रमाण जवळपास ८०-९०% एवढे असते. अल्कहोल हे ज्वलनशील असल्याने ते आगीच्या जवळ जाताच तात्काळ पेट घेते. उदा. स्पिरिट, पेट्रोल आणि इतर ज्वालाग्राही पदार्थ जसे क्षणाचाही विलंब न होता आगीच्या संपर्काने पेट घेतात त्याप्रमाणे सॅनिटायझर देखील लगेच पेट घेते.

गणेशोत्सवात सॅनिटायझर वापरतांना काय काळजी घ्यावी?

१. दिवा पेटवितांना हातांना सॅनिटायझर लावलेले नसावे

२. आरती करतांना व होम-हवन करतांना सॅनिटायझरचा वापर पूर्णपणे टाळावा

३. मोदक बनविणे व स्वयंपाक करण्यापूर्वी महिला-भगिनी यांनी सॅनिटायझरचा वापर केलेले हात स्वच्छ धुवून घ्यावेत

४. लहान मुलांपासून सॅनिटायझर दूर ठेवावे

उदा.

आपण गणेशोत्सवात आनंद घेण्यामध्ये तल्लीन असतो. अशातच अवती-भोवती सुरू असलेले संगीतमय वातावरण, लहान मुलांचा मोदकासाठी चाललेला गोंगाट यामध्ये अचानक आपल्या समोर आरतीचे पात्र आले तर आपण हात पुढे करून भावभक्तीत लिन होतो. मात्र कोरोनामुळे आपण सॅनिटायझरचा वापर करत असल्याने हात त्या ताटातील दिव्याजवळ जाताच हातांवर लावलेल्या सॅनिटायझरने पेट घेतल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.

पुरेसे जागरूक नसल्यामुळे काय होते याचे उदाहरण काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. पिंपळगाव येथील साकोरे फाटा टोलनाक्याजवळ एका कारमध्ये शॉर्टसर्किट झाले व गाडीत सॅनिटायझरचा वापर केलेला असल्याने गाडीने आतून पेट घेतला आणि चालकाचा मृत्यू झाला हि घटना समोर आली होती.

असे अनेक घटना व प्रसंग घडलेले आहेत त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे हा सर्वोत्तम उपाय संकट टाळण्यासाठी आहे हे कुणीही विसरता कामा नये. सॅनिटायझर हे जसा जीव वाचवण्यासाठी सुरक्षा कवच आहे तसेच ते वेळप्रसंगी काळजीपूर्वक हाताळले नाही तर जीवघेणे देखील आहे याचे भान सर्वांनी ठेवायलाच हवे.

या अपघातात शरीराच्या कोणत्या अवयवांना अधिक इजा होण्याचा संभव असतो.?

१. हात

२. चेहरा उदा. हातांना सॅनिटायझर लावल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवलेले असल्याने चेहरा पेट घेऊ शकतो.

३. शरीराचा संपूर्ण भाग उदा. अनेकजन हे स्प्रे चा वापर करून पूर्ण शरीरावर सॅनिटायझर फवारतात

अपघात कसा टाळता येतो ?

१. आगीच्या जवळ जाण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावे

२. सॅनिटायझर साठवलेल्या बाटल्या अथवा कॅन हे सुरक्षित जागी ठेवावे

३. लहान मुलांकडे लक्ष ठेवावे

अशा प्रकारे आपण सॅनिटायझरचा वापर गणेशोत्सव काळात करायला हवा व खबरदारी देखील घ्यायला हवी. ही सुरक्षितता केवळ या उत्सवात न बागळता नेहमी दक्षता घेतली पाहिजे. ज्यामुळे आपण, आपले कुटूंबातील सदस्य आणि आपल्या अवती-भोवती असलेले नागरिक सुरक्षित राहण्यासाठी आपली जागरूकता लाभदायक ठरेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय