माझ्याच नशीबी दुर्भाग्य का?, असं वाटत असेल तर हे वाचा

एकच गोष्ट असते, जी तुमच्या आणि यशाच्या आड येते ती गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची मानसिकता…

माझ्याचं नशीबी दुर्भाग्य का?…. प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो.

पण आपण एकटेच नाही, तर जगभरातल्या प्रत्येकाला ही चिंता सतावत असते. मला यश मिळेल का? माझ्या मनासारख्या गोष्टी घडतील का? ही काळजी प्रत्येकाला वाटते.

मग यश आपल्याकडे खेचून आणण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंचा वापर केला जातो. मोरपीस, घोड्यांची नाल, सशाचा पाय, अशा असंख्य वस्तू नशीबाने आपली साथ द्यावी म्हणून, भाग्य उजळावं म्हणून जवळ बाळगल्या जातात.

प्रार्थना केली जाते, अनेक उपाय केले जातात.

जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती भाग्य उजळवण्यासाठी काही गोष्टी श्रद्धेने करत असतात. जसे 555 हा नंबर शाहरुख खानसाठी लकी आहे, असं ते मानतात. त्यामुळे त्यांच्या सगळ्या कारच्या नंबरमध्ये 555 हा अंक असतोच.

सलमान खानची फिल्म ईदच्या दिवशी रिलीज होते हे आपल्याला माहिती आहेच. टेनिसपटू सेरेना विलियम्स खेळ सुरू करण्यापूर्वी मोजून पाच वेळा चेंडू हवेत उडवतात. अशी बरीच उदाहरण आपल्याला माहीत असतील.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केल्यावरही ‘नशीब’ किंवा ‘बॅड लक’चा पगडा मनामनावर बिंबलेला आहे. काही समजुती आपल्या मनात खोलवर रुतलेल्या आहेत. जेव्हा एखादया घटनेकडे पहाताना आपला मेंदू त्या घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा भाग्य आणि दुर्भाग्य ही संकल्पना प्रामुख्याने समोर उभी राहते.

माझ्याच नशीबी दुर्भाग्य का ?

हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर स्वतःच्या विचांराना, निर्णयांना पुन्हा एकदा तपासण्याची वेळ झाली आहे.

सकारात्मक मानसिकता तुमचे भाग्य उजळायला तुमची मदत करू शकते.

प्रत्येक गोष्टीत माझे दुर्भाग्य आडवे का येते?…. याचं एक जुनं उदाहरण

‘त्सुतोमु यामागुची’ या व्यक्तीविषयी तुम्हांला माहिती आहे का? हिरोशिमामध्ये बाँब पडला त्या दिवशी ते तिथे कामानिमित्त गेले होते. नागासाकीत परतले तेंव्हा तिथेही बाँम्बहल्ला झाला. अशा घटना दुर्मीळ असतात, पण या घटनेला दुर्भाग्यशाली म्हणता येईल का?

Banner

रोजच्या जीवनातल्या अशा असंख्य अडचणींना आपण माझ्याच नशीबात दुर्भाग्य का? असं विचारत टाहो फोडत असतो. खरंतर हा चुकीचा प्रश्न आहे. आपण स्वतःला योग्य पद्धतीने प्रश्न विचारायल हवा, माझ्या कर्तृत्वाने आणि आत्मविश्वासाच्या बळावर भाग्य उजळायला कशी मदत होईल? मला माझ्या आयुष्यात जें अपेक्षित आहेत जी जीवनशैली मला हवी आहे. त्यासाठी मी कोणत्या दिशेने प्रयत्न करू? असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत.

अमिताभ बच्चन यांचा आवाज रेडीयो स्टेशनने नाकारला होता. हे दुर्भाग्य? की त्याचमुळे बच्चन साहेब फिल्मसंघर्षाकडे पुन्हा वळले हे भाग्य! प्रसारणासाठी योग्य नसलेला आवाज असा शिक्का बसला. अमिताभ बच्चन यांनी तो पुसून काढला. आज त्यांच्या आवाजाचा, शब्दफेकीचा अभ्यास केला जातो.

दुर्भाग्याचे भाग्यात रूपांतर कसं करायचं ?

काही माणसे सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्म घेतात असं आपल्याला वाटत असतं. तर हा विचार बदला! यशस्वी भाग्यशाली माणसांना कोणत्याही विशेष कृपेचा लाभ झालेला नसतो, तर त्यांनी जाणीवपूर्वक या ‘नऊ’ गोष्टी केलेल्या असतात.

1) तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार- विश्वास ठेवा तुम्ही तुमचे आयुष्य घडवू शकता

यशस्वी व्यक्तींना नेमकं माहिती असतं, की हे दुर्भाग्य माझ्या वाट्याला का आलं? अर्थात चिंता करण्याची त्यांना गरज नसते. कारण ते त्यांचं आयुष्य घडवू शकतात. त्यांच्याकडे विशाल मानसिकता आणि बदल घडवण्याचा विश्वास असतो अशा व्यक्ती जबाबदाऱ्या सहज पेलतात, या जबाबदा-यांचं ओझं न मानता अद्वितीय असे काही निर्माण करण्याचे स्वप्न बघतात. आंतरिक शक्तीची जाणीव असलेले लोक भाग्य आपल्याजवळ खेचून आणतात.

2) यशासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा ओळखा

आपल्या आयुष्यासाठी काही गोष्टींची गरज असते. सुनिश्चितता, महत्व, विविधता, स्नेह, नाती, विकास आणि योगदान. या गोष्टींवर आपले निर्णय बहुतेक वेळा अवलंबून असतात. आपल्याला जर असे वाटत असेल की दुर्भाग्याने आपल्याला पूर्ण वेढून टाकले आहे, तर नैराश्यावर मात करत झपाटयाने विकासाच्या दिशेने पावलं टाका. नवं शिकण्याची तयारी ठेवा. कारण तुम्ही ज्ञानाने विकसित होत नसाल तर तुम्ही मृत्युच्या दिशेने वाटचाल करत आहात. अशा वेळेला दुर्भाग्याचा पाश आणखी घट्ट होऊ शकतो.

3) तुमची गोष्ट नव्याने रचा

जेंव्हा तुम्ही तुमच्या समस्यांना दोषी ठरवता, तेंव्हा तुम्ही स्वतः स्वतःच खच्चीकरण करत असता. नकाराच्या वर्तुळात अडकत जाता. ज्यामुळे आयुष्य तिथल्या तिथेच घोटाळत राहत. नव्या वाटा सापडत नाहीत. एकाच वर्तुळात फिरुन फिरून तुम्ही थकून जाता. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी स्वतःची प्रेरणादायी कथा नव्याने लिहा.

तुमच्या आयुष्याचा एकदा नव्याने विचार करून बघा. तुमच्या स्वतःच्या उपलब्धीकडे अभिमानाने बघा.

4) यशावर लक्ष केंद्रीत करा

जिथे तुमचे लक्ष केंद्रीत होते त्याप्रमाणे आयुष्यात घटना घडायला लागतात. अपयशावर लक्ष केंद्रीत केलेत तर अपयश पुन्हा पुन्हा समोर येईल याउलट यशाची चव चाखली नसली तरी यशावर मन केंद्रित केलंत तर तुम्ही यशासाठी तुमचं दार खुलं करता. सतत ज्याचा विचार करता, ज्यावर मन एकाग्र करता त्या गोष्टी सहज घडायला लागतात यामुळे काही तंत्राचा आधार घेऊन आपलं ध्येय निश्चित करा, आणि आपल्या मेंदूला यशासाठी तयार करा.

5) नकारात्मक विचारांची साखळी तोडा

एखादी वेदनादायी घटना दुःखद घटना घडते, तेंव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया देता? तुमच्या मनावर या घटनेचा आघात होऊ देता का? तुमच्या उत्साहाची पातळी कमी होऊ देता का? आणि नकारात्मक साखळीशी जखडून जात माझ्याच नशीबात हे दुर्भाग्य का? असा आकांत करता का? मग हे ताबडतोब थांबवा.

कुठल्या बाबतीत हे सातत्याने घडतं हे ओळखायला शिका. त्यासाठी स्वतःकडे थोडं त्रयस्थपणे पहा ही निगेटीव्ह विचारांची साखळी तोडा आणि सकारात्मक शब्दांचं प्रोत्साहन दया. समजून उमजून आणि ठरवून चांगले शब्द वापरा. जेंव्हा तुम्ही तुमच्या शब्दांना सकारात्मकता द्याल तेंव्हा ‘तेच शब्द’ तुमचा आयुष्याला सकारात्मकता आणि यश बहाल करतील.

6) मंदीत संधी शोधा.

यशस्वी लोकांच्या आयुष्यात वाईट वळण येतं तेंव्हा त्यांचा प्रवास संपत नाही तर नव्या मार्गाचा पर्याय ते शोधतात. माझ्यासमोर अडचणींचा डोंगर का उभा राहिला असे म्हणत हताश न होता यशस्वी लोक स्वतःला विचारतात ‘या समस्येतून काय बरं शिकायला मिळाले?’ गरज ही जशी शोधाची जननी असते, तशीच प्रत्येक समस्येच्या मुळाशी नवी संधी असते. या समस्यांशी दोन हात केल्याशिवाय प्रगती होत नाही. अडचणींमध्ये नव्या संधी, नव्या प्रगतीच्या वाटा असतात त्या शोधल्या की यश तुमच्या गळ्यात हार घालेल.

7) कृतज्ञता व्यक्त करा.

जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेंव्हा तुम्ही भय आणि चिंतामुक्त होता. विपुल आनंदाची, समृध्दतेची खाण तुम्हाला सापडते. मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता, नकारात्मक भावनांना जवळपास फिरकू देत नाही. यामुळे दुर्भाग्याचं भाग्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.

जेंव्हा तुम्ही समृद्धतेवर मन एकाग्र करता तेंव्हा “पेला अर्धा सरला आहे, असं न म्हणता पेला अर्धा भरला आहे” असे म्हणत खुश होता. समृद्ध आणि खुशीत असणा-या व्यक्ती माझ्याच नशीबात दुर्भाग्य का असे म्हणण्यात वेळ घालवत नाहीत.

8) भीतीचा सामना करा

दुर्भाग्याला ब्रेक लावण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक उर्जेच्या निर्मितीसाठी वापर करायला भीतीच्या छायेतून बाहेर पडा. नापास होण्याची भीती वाटते? व्यवसायात अपयशाची भीती वाटते? प्रेमात वैफल्प येण्याची भीती वाटते? लोक तुमच्याविषयी काय बोलतात याची भीती वाटते? ही भीती या दुर्भाग्यामुळे निर्माण होत नाही तर भीती हेच दुर्भाग्याचे कारण ठरते. या शंकाकुशंकेचं नेमकं कारण शोधा आणि दुर्भाग्याला यशात परिवर्तित करा.

रोजच्या जीवनात भीतीला जा सामोरे दिलदार मनाने…

9) ठोस पाऊल उचला

अमिताभ बच्चन यांचा आवाज नाकारल्यावर ते निराश झाले नाहीत. अनेक ऑडीशन देऊनही संधी मिळाली नाही तेंव्हा त्यांना वैफल्य आलं नाही नव्या जोमाने ते प्रयत्न करत राहिले आणि संधी निर्माण केली. स्वतःवर विश्वास ठेऊन न थकता त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तेंव्हाच सहस्त्रकातले महानायक बनले.

अशा काही छोट्या छोट्या गोष्टी शिकून आपण ही आपल्या जीवनाला यशाच्या मार्गावर नेऊ शकतो आपलं भाग्य उजळवू शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “माझ्याच नशीबी दुर्भाग्य का?, असं वाटत असेल तर हे वाचा”

  1. दुर्भाग्याचे भाग्यात रूपांतरित करण्यासाठी खूप सुंदर अशा नऊ टीप दिलेल्या आहेत. आपण त्या अंमलात आणल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल.
    मनापासून आभार आणि या उपक्रमाला शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय