स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह का असतात?

स्त्रिया असतात पुरुषांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह आहेत कारणं

स्वागतासाठी “सुहासिनी”असतेस, वाढतांना “यक्षिणी”असतेस, भरवतांना “पक्षिणी” असतेस, साठवतांना “संहिता” असतेस, भविष्‍याकरता “स्वप्नसखी” असतेस.

विंदा करंदीकरांनी स्त्रीचं व्यक्तीमत्व अशा उत्साही आणि सगळ्या आघाडीवर काम करणारी अशा पध्दतीने रेखाटलं आहे. नोकरी किंवा गृह उदयोग सांभाळत घराची पुर्ण जबाबदारी, नातेवाईकांचं आदरातिथ्य, मुलांचं वेळापत्रक सांभाळणारी ती, सगळया गोष्टी कशा काय मॅनेज करत असेल असा प्रश्न पडतो ना ?

एका संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मेंदू जास्त कार्यक्षम असतो, जास्त अ‍ॅक्टिव्ह असतो.

स्त्रियांचा मेंदू दोन ठिकाणी पुरूषांपेक्षा जास्त सक्षम असतो.

1) पहिलं क्षेत्र ‘प्री फ्रंटल कॉर्टेक्स’

एखाद्या विषयाची सखोल आखणी, मांडणी करणं हे प्री फ्रंटल कॉर्टेक्सचं काम असतं.

यामध्ये स्त्रिया नेहमी पुढे असतात. घरातल्या एखाद्या समारंभाचं नियोजन असो किंवा कार्पोरेट क्षेत्रात एखादा प्रोजेक्ट असो, स्त्रिया समजून उमजून त्यावर काम करतात.

दोन माणसाचा स्वयंपाक असो की पन्नास माणसांचा कार्यक्रम. मेन्यू ठरवण्यापासून साफ सफाई, खरेदी, सजावट, गिफ्ट देणे यामागे नेमकं नियोजन स्त्रिया करत असतात. एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना, आपल्या बरोबर असणाऱ्या प्रत्येक सहका-याला सामावून घेण्याचं कौशल्य स्त्री कडे असतं.

2) मेंदूच्या कामातील दुसरा महत्वाचा भाग ‘लिंबिक प्रणाली’

लिंबिक प्रणालीमध्ये भावभावनांची निर्मिती होते, वागणूक ठरते, आठवणी तयार होऊन त्यांचा साठा होतो. शिकणे, शिकवणे अशा गोष्टी या लिंबिक प्रणालीच्या छताखाली तयार होतात.

एखादी स्त्री विषय सर्वांसमोर मांडताना तो काही मुद्दयांमध्ये गुंडाळण्यापेक्षा सविस्तर रंगवून सांगण्याचा मार्ग निवडते. बहुतेक शिक्षीका विषय नीट मांडून रसाळपणे त्याविषयी भरपूर माहिती आपल्याला देतात. आजोबांपेक्षा आपली आजी जुन्या काळातल्या गोष्टी मजेदार पध्दतीने आपल्याला सांगत असते. अगदी लग्नानंतर तिच्या सासुने तिला कसं छळलं हे पण तिला लख्ख आठवत असतं!

स्त्रियांकडे वात्सल्य भावना मोठ्या प्रमाणात असते. स्वतःच्या मुलांविषयी त्यांना माया असतेच, पण प्राण्यांवर, आपल्या जवळच्या इतर मुलांवर ही त्या निस्वार्थी माया करू शकतात.

संशोधकांच्या हे ही लक्षात आलं की भावभावनांच्या चढ उतारात स्त्रियांमध्ये चिंता, झोप कमी होणं, डिप्रेशन किंवा खाण्याविषयी समस्या निर्माण होतात.

याउलट पुरुषांमध्ये मात्र ए.डी.एच.डी. ची समस्या असते. ज्यामध्ये स्वत:चं काम करायला विसरणं. आपल्याच विश्वात मग्न असणं, एखादं काम वेळेत करायला अपयशी ठरणं अशा गोष्टी घडतात.

मेंदूच्या 128 कार्यांचा अभ्यास केल्यानंतर संशोधनात असं लक्षात आलं की, काही गोष्टीत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त हुशार असतात.

‘लिंबिक प्रणालीमध्ये’ आणि ‘प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये’ आघाडीवर असल्यामुळे स्त्रिया जास्त अ‍ॅक्टिव्ह ही राहू शकतात.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.