अल्झायमर का होतो? आणि त्या परिस्थिती काय करावे?

“अगं सुनबाई, किती वेळ झाला! मला जेवायला वाढतेस ना?“ दहा मिनिटांपूर्वी जेवून उठलेले आजोबा जेव्हा असा प्रश्न विचारतात तेव्हा सुनबाईला काळजी वाटल्यावाचून रहात नाही.

दुसरे एखादे आजोबा पार्कमधल्या बाकावर विमनस्क अवस्थेत बसलेले दिसतात. त्यांना त्यांचं घर आठवत नसतं. स्वतःचं नाव, पत्ता काही सांगता येत नाही. आणखी एखाद्या आजी आपल्याच घरातील आपल्या मुलाला, सुनेला, नातवंडांना ओळखेनाशा होतात.

आपल्या जवळच्या व्यक्तींशी अनोळखी असल्याप्रमाणे वागतात. काही वृद्ध लोकांना त्यांच्या लहानपणीचं सगळं स्पष्ट आठवतं पण आत्ता थोड्या वेळापूर्वी घडलेली घटना आठवत नाही.

वयस्कर माणसांमध्ये दिसून येणारी ही लक्षणे काळजी करण्यासारखीच आहेत. कारण ह्या सगळ्या लोकांना अल्झायमर्स म्हणजेच विस्मरणाचा आजार झालेला आढळून येतो. या आजारामध्ये काहीही लक्षात न राहणे हे प्रमुख लक्षण दिसून येते.

आज जागतिक अल्झायमर्स दिवस आहे. त्या निमित्ताने आपण या आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

अल्झायमर्स हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. सर्वसाधारणपणे वयस्कर लोकांना म्हणजेच वयाची ६५ वर्षे उलटून गेलेल्या लोकांना हा आजार झालेला दिसून येतो. क्वचित काही लोकांमध्ये त्याआधीही म्हणजे तरुण वयात हा आजार झालेला आढळून येतो परंतु त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.

अल्झायमर्स म्हणजेच विस्मरण. या आजारामध्ये रुग्णाची स्मरणशक्ती कमी होऊन दैनंदिन कार्य करण्यामध्ये रुग्णाला अडथळा येऊ लागतो.

ह्या आजाराचे निरनिराळे टप्पे असतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे केवळ काही घटना, नावे यांबाबत रुग्णाला विस्मरण होते. परंतु जसे जसे हा आजार पुढील टप्पे गाठतो तसे रुग्णाला दिवसभरातील गोष्टी, आजूबाजूचे लोक, दैनंदिन कामे यांबाबत काहीही लक्षात न राहून गोंधळाची स्थिती निर्माण होते. असे रुग्ण एकटे राहू शकत नाहीत. त्यांना संपूर्ण वेळ अटेंडंटची गरज भासू शकते.

वर उल्लेख केलेल्या प्रसंगा प्रमाणे दिवसभरात केलेली कामे जसे की अंघोळ, जेवण इत्यादी लक्षात न राहणे, घराचा पत्ता, स्वतःचे नाव विसरणे ही सुरुवातीची लक्षणे आहेत. तर त्यापुढे आजार बळावल्यावर घरातील लोकांना न ओळखणे, स्वतःवरचा ताबा सुटणे, विचार करण्याची क्षमता संपूर्णपणे नष्ट होणे अशी लक्षणे दिसून येतात.

अल्झायमर्स हा आजार मेंदूतील विशिष्ट पेशींना हानी पोहोचल्यामुळे अथवा त्या पेशी नष्ट झाल्यामुळे होतो. सर्वसाधारणपणे हा आजार वयस्कर व्यक्तींमध्ये आढळून येतो. या आजाराची नेमकी कारणे वैद्यकशास्त्राला सापडलेली नाहीत.

परंतु मुख्यत्वे हा आजार अनुवंशिक असल्याचे दिसून येते. अनुवंशिकता, डोक्याला मार लागणे, उच्च रक्तदाब, स्थूलता आणि डिप्रेशन असणाऱ्या लोकांमध्ये उतारवयात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आढळून येते.

हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्यामुळे हा आजार झाला आहे हे लवकर लक्षात येत नाही परंतु खालील काही लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला अल्झायमर झाला असण्याची शक्यता असते.

वैद्यकशास्त्रातील तज्ञ असे सांगतात की अल्झायमर झालेल्या व्यक्तीच्या वागणूकीमध्ये बदल होताना दिसतात. पटकन राग येणे, चिडचिड होणे, वारंवार तेच तेच बोलणे, बेचैनी, मन एकाग्र न करू शकणे, रस्ता चुकणे, रस्त्याने चालताना भरकटणे, वारंवार मूड बदलणे आणि काही प्रमाणात नैराश्य अशी लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला अल्झायमर या आजाराची सुरुवात झाली असण्याची शक्यता असते.

बरेच वेळा वरील लक्षणे म्हणजे म्हातारपणात होणारे बदल आहेत असे वाटून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. परंतु वारंवार अशी लक्षणे आढळल्यास मानसोपचार तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन अल्झायमर आहे अथवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक असते. मानसोपचार तज्ञ आणि मेंदू विकार तज्ञ डॉक्टर निरनिराळ्या तपासण्या करून रुग्णाच्या अल्झायमर ह्या आजाराची अवस्था शोधून काढू शकतात.

जितक्या लवकर या आजाराचे निदान होईल तितकी तो आजार बळावण्याची शक्यता कमी होते. लवकर उपचार सुरू केल्यास हा आजार आटोक्यात राहू शकतो. हा आजार संपूर्णपणे बरा करणारे औषध अजून तरी उपलब्ध नाही. परंतु जर लवकर या आजाराचे निदान झाले तर रुग्णाच्या जीवनशैलीमध्ये विशिष्ट बदल करून तसेच काही औषधे आणि मेंदूला व्यायाम होईल असे एक्सरसाइज करण्यामुळे हा आजार जास्त बळावणार नाही अशी काळजी घेता येते.

भविष्यात अल्झायमर होणे टाळता यावे यासाठी काय काळजी घ्यावी, मेंदूला व्यायाम होईल अशा ऍक्टिव्हिटी कोणत्या हे सांगणारा लेख मनाचेTalks वर लवकरच प्रकाशित करू, तो आवर्जून वाचा.

त्यासाठी मानसोपचार तज्ञ आणि मेंदूविकार तज्ञ डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे. मानसोपचार तज्ञ आणि मेंदू विकार तज्ञ डॉक्टर निरनिराळ्या तपासण्या करून तसेच मेंदूचे स्कॅन करून रुग्णाच्या अल्झायमर ह्या आजाराची नेमकी अवस्था शोधून काढू शकतात.

अल्झायमर हा आजार डिमेनशिया ह्या आजाराचे एक स्वरूप आहे. ह्या आजारामध्ये हळूहळू रुग्णाची आकलनशक्ती आणि एकाग्रता कमी होत जाते आणि रुग्णाचा स्वतःवरचा ताबा सुटू लागतो. तसेच सांगितलेल्या गोष्टींचे, दिलेल्या सुचनांचे पालन करणे रुग्णाला कठीण जाऊ लागते. कोणतीही गोष्ट समजणे हळूहळू कमी होते. परंतु सुरुवातीच्या काळातच योग्य उपचार सुरु केले की हा आजार निश्चितपणे आटोक्यात ठेवता येतो.

अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी?

मित्र-मैत्रिणींनो, जर तुमच्या कुटुंबात अथवा आजूबाजूला असे आजी-आजोबा असतील तर त्यांना या आजारावर उपचार करण्यासाठी मदत करा. हा आजार होणे अथवा न होणे हे कोणाच्याही हातात नाही. अल्झायमर झालेल्या रुग्णांचा स्वतःवर ताबा उरत नाही. त्यांना योग्य उपचारांची आणि आपल्या मदतीची खूप गरज असते. त्यामुळे अशा रुग्णांचा राग राग न करता त्यांना आवश्यक ती ट्रीटमेंट मिळवून देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.

लेखात दिलेली लक्षणे एखाद्या व्यक्ती मध्ये आढळल्यास त्या व्यक्तीला त्वरित तज्ञ डॉक्टरांची मदत मिळवून द्या. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका. अल्झायमर या आजाराची जास्तीत जास्त लोकांना माहिती होणे हाच हा आजार कमी करण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. आजच्या जागतिक अल्झायमर दिनानिमित्त या आजाराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आपण करूया.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय