सवयी बदला आणि आरोग्यासाठी “या” चुका टाळा

चुकीच्या सवयी बदला… आरोग्यदायी जीवन निवडा… परीपूर्ण आरोग्यासाठी “या” चुका टाळा

सुदृढ शरीर एक देणगी आहे. जोपर्यंत सुदृढता, आरोग्य आपल्याजवळ असतं, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. जसे पैसे खर्च झाले, आपली आर्थिक बचत शून्यावर आली की पैसे सांभाळून ठेवावेत, जपून वापरावेत, हे लक्षात येतं, तसंच आरोग्याच्या बाबतीत होतं.

जोपर्यंत सुरळीत चालू असतं तोपर्यंत शरीराला काय चांगलं काय वाईट याचा आपण विचार ही करत नाही.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळचं इतकं गतिमान झालं आहे की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. खरं तर शरीर जेवढं निरोगी असेल तेव्हढं मन सशक्त असतं. त्यामुळे तनामनाचा ताळमेळ जुळवून आयुष्य एंजॉय करण्यासाठी सुदृढ असणं खूप गरजेचं असतं.

उत्तम आरोग्याची आणि चांगल्या प्रतिकारशक्तीची गरज आपल्या आता लक्षात आली आहे. चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली आरोग्याला हानिकारक ठरू शकते.

लवकरात लवकर चुकीच्या सवयी बदलल्या तर आरोग्याची काळजी आपण घेऊ शकतो.

1) पुरेशी झोप मिळाली नाही तर शरीराचं बिघडतं तंत्र

प्रौढ व्यक्तींना 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे आणि लहान मुलांना साधारण 9 ते 11 तासांची झोप आवश्यक असते. सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे रात्री झोपायला उशीर होतो. झोपेचा कोटा पुर्ण होत नाही. सातत्याने असं घडायला लागलं की हृदय रोग, स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह और स्थूलता अशा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

अती झोप आणि अपुरी झोप यांना टाळून पुरेशी झोप घेतली तर दिवस उत्साहात जातोच, पण गंभीर आजार चार हात लांब राहतात.

2) फास्ट फूड देते रोगराईला आमंत्रण

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे आयुष्य गडबडीचं झालं आहे. सात्विक, पौष्टिक अन्न तयार करायला वेळ कमी आहे. कोपऱ्याकोपऱ्यावर मिळणारे चटपटीत पदार्थही हाक मारत असतात. पण त्यामध्ये साखर, मीठ, हानीकारक पदार्थ, कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. ज्यांच्यामुळे आरोग्याची एकेक वीट ढासळायला लागते.

फास्टफूडमुळे पौष्टिकता आणि सत्व शरीराला मिळत नाहीच, पण फास्ट फूडवरच जीवन बेतलं तर शरीरातील असलेली जीवनसत्वं कमी होत जातात. स्थूलता, टाइप 2 मधुमेह, हृदयविकार, स्ट्रोक, उच्च कोलेस्ट्रॉल, हे विकार मात्र कायमचे वस्ती करतात.

वेळ कमी असला तरी मोजके, ताजे पदार्थ घरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेंद्रीय भाज्या आणि सेंद्रीय फळांचाच आहारात समावेश करावा. ज्यांच्यात फायबर भरपूर प्रमाणात मिळतं अशा पदार्थांचा वापर केला पाहिजे.

कोंडायुक्त पीठाची चपाती, भाजलेले सोयाबीन दळून घातलेल्या पीठाची चपाती, ताजा वरण भात, मुगाचं वरण, कोशिंबीर, सूप, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी असे मोजके पदार्थ ताजे करुन, ते आपल्यासह पॅक करून बाहेर घेऊन जावं. आजकाल चांगल्या क्वॉलिटीचे कंटेनर मिळतात. त्यामुळे आपलं पौष्टिक अन्न आपण आपल्याबरोबर व्यवस्थित नेऊ शकतो, आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. मीठ आणि साखर यांचा वापर मर्यादित करावा.

3) सोडा असणारी पेय आरोग्याला मारक ठरतात.

सतत वाढणारं तापमान, ए.सी.तून बाहेर पडल्यावर जाणवणारी उष्णता यावर एखादं चिल्ड कोल्ड्रिंक भारी वाटतं. पण तुम्हांला माहिती आहे का यात असणारा सोडा आरोग्यासाठी घातक असतो. प्रचंड प्रमाणात वाढणारं वजन, हृदयविकार, टाईप 2 डायबेटिस असे रोग या कोल्ड्रिंक्समधल्या सोड्यामुळे होऊ शकतात. तुम्ही डायट कोल्ड्रिंक घेता का ? ते ही हानिकारकच आहे. भूक वाढणं आणि शरीरात साखरेची गरज निर्माण करणं हे या डायट ड्रिंकचं काम असतं

काही काही सोड्यामध्ये कॅफीन असतं. ज्यामुळे शरीर ड्रिहायड्रेट होतं. तहान भागवण्यासाठी उत्तम पेय म्हणजे साधं पाणी. रोजच्या रोज योग्य प्रमाणात प्यायलेलं साधं पाणी तुम्हांला तंदुरुस्त ठेवू शकतं.

4) मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी घातकच

आपलं जीवन पुर्णपणे मोबाईलवर अवलंबून आहे. कामासाठी, मनोरंजनासाठी चोवीस तास आपल्याजवळ मोबाईल असतो. मोबाईल स्क्रीनसह हेडफोनचा वापर ही मोठ्या प्रमाणावर होतो.

मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात ताणतणाव, चिडचिड आणि झोपेच्या समस्या निर्माण होणं सहज शक्य होतं. त्याच बरोबर मोबाईल मधून निघणाऱ्या लहरींचा शरीरावर घातक परिणाम होतो.

5) पेनकिलर घेताय? आधी थोडा विचार करा.

आयुष्य वेगवान झालं आहे. डोकेदुखी, हलक्या वेदना यासाठी एक पेनकिलर घेऊन आपण पुन्हा त्या वेगात मिसळून जाण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलरचं सतत सेवन करणं किडनीला त्रासदायक ठरू शकतं. पेनकिलरमुळे थोड्या वेळासाठी वेदना कमी होऊ शकतात, मात्र कायमस्वरूपी शरीराची हानी होऊ शकते.

सतत पेनकिलर घेतल्या तर त्याचं व्यसन लागू शकतं. या ऐवजी नैसर्गिक उपाय करून पहावेत. योग, ध्यान,अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्चर यांचा वापर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करता येऊ शकतो.

6) नैसर्गिक विधींना खूप वेळ थांबवून ठेवणं पडतं महागात

‘राईट टू पी’ सारख्या चळवळी आपल्याला राबवाव्या लागतात हे आपलं दुर्दैव. कामाच्या ठिकाणी, प्रवासात स्वच्छ टॉयलेट उपलब्ध न होणे यामुळे नैसर्गिक विधी रोखून ठेवल्या जातात. याचा मोठा प्रभाव मूत्रपिंड आणि किडनीवर पडतो. किडनी स्टोन, किडनी फेल होणे, किंवा नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण सुटणे असे गंभीर आजार होऊ शकतात.याशिवाय मूत्रमार्गात वारंवार इन्फेक्शन होऊ शकतं.

नैसर्गिक विधी वेळच्या वेळी करणं हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे.

7) एका जागी बसून काम करणं ठरतं धोकादायक

सध्याच्या जीवनशैलीनुसार कॉम्प्युटर समोर तासनतास कामं करावं लागतं. यामुळे चयापचय क्रिया बिघडू शकते. रक्तदाब अनियंत्रित होतो. शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. मणके आणि सांध्यांसाठीसुद्धा ही बैठी जीवनशैली धोकादायक आहे.

बैठी जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींना दर तासानंतर 10 मिनिटांचा ब्रेक, स्ट्रेचिंग फार गरजेचं आहे.

8) लिफ्टचा वापर आरोग्यासाठी वाईट

सिंगापूर मध्ये पळायला जागा कमी आहे म्हणून जिने चढण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.
व्हर्टिकल मॅरॅथॉन अशी ही स्पर्धा आहे. यावरून आपण काय शिकायचं, एखादी समस्या आहे तर उपाय शोधावा. आता बघा रोज व्यायाम करायला पुरेसा वेळ मिळत नाही? लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. तुम्ही निवडलेला पर्याय तुम्हांला आरोग्याच्या दालनात घेऊन जाईल. कारण लिफ्टचा अतिवापर आरोग्यासाठी वाईट असतो.

जिने चढल्यामुळे ह्रदय मजबूत होतं. वाईट कोलेस्टेरॉल कमी होऊन, चांगलं कोलेस्टेरॉल वाढतं. मानसिक ताण कमी होऊन वजनात ही चांगलीच घट होते.अर्थात अचानक जिने चढायला सुरवात करायची नाही. हळूहळू सवय करायची. लिफ्टचा वापर टाळायचा. खूपच वरच्या मजल्यावर जायचं असेल तर मात्र निम्मा प्रवास लिफ्टचा निम्म्या जिने चढून करता येऊ शकेल.

9) सूर्य प्रकाश आरोग्यासाठी आवश्यक.

उन्हाच्या वेळेत बाहेर पडायचं म्हटलं की अंगावर काटा येतो. न टाळता येण्यासारखं काम असेल तर मात्र सूर्यप्रकाशाचा अंगाला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत आपण बाहेर पडतो. आपली हीच सवय आपल्याला घातक ठरु शकते.

कडकडीत उन झेलणं शक्य नाही, पण सकाळचं कोवळं उन, व्हिटॅमिन डी शरीराला मिळण्यासाठी गरजेचं असतं.आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

10) नकारात्मक विचार आरोग्याचे शत्रू

वेगवेगळ्या पातळीवरच्या हजार चिंता घेऊन आपण वावरत असतो. चिंता करता करता कधी
नकारात्मक विचार करायला लागतो कळतच नाही. हे नकारात्मक विचार शारीरिक आणि मानसिक प्रचंड नुकसान करतात.

सतत सकारात्मक राहणं अवघड असतं. पण हळूहळू आपण मनाला सकारात्मक विचारांची सवय लावली तर ते आरोग्याच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल ठरू शकतं.

बिरबलाची गोष्ट माहिती आहे ना?

एकदा अकबर राजाने बिरबलाला प्रश्न विचारला, ‘असं कोणतं वाक्यं आहे, जे सुख आणि दु:खं अशा दोन्ही प्रसंगात कामी येईल?
तेंव्हा बिरबलाने सांगितलं “हे ही दिवस जातील”

जेंव्हा वाईट वेळ सुरू असते तेंव्हा लक्षात ठेवायचं ही दुःखं संपणार आहेत, हे ही दिवस जातील आणि आनंदाच्या प्रसंगी लक्षात ठेवायचं हे ही दिवस जातील, आपण वाईट दिवसांसाठी तयारी करून ठेवायला हवी…. सांगायचं तात्पर्य हे कि, पुढे जाऊन आपल्या आरोग्याला उतरती कळा लागू नये म्हणून, चांगल्या आणि आरोग्यपूर्ण सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत.

तर अशा काही चांगल्या सवयी वेळेत आपण लावून घेतल्या तर उत्तम आरोग्य लाभण्यासाठी उशीर होणार नाही.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय