वयात येणाऱ्या मुलांचं भावविश्व उलगडणारी “ही” दोन अनुवादित पुस्तकं.

लहान मुलांचा निरागसतेकडून समंजसतेपर्यंतचा प्रवास होताना पालकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.

मुलांचं भावविश्व अनुभवण्यासाठी “पाडस” आणि मुलींचं भावविश्व समजून घ्यायला “चौघीजणी” ही पुस्तकं वाचायला तुम्हाला नक्की आवडतील

खरंतर ‘पाडस’ आणि ‘चौघीजणी’ ही दोन्ही अनुवादित पुस्तकं आहेत. मग त्यातली जीवनशैली आणि आपलं राहणीमान यांचं आपल्याशी नातं कसं जुळणार? असा प्रश्न साहजिकच आहे तुम्हाला पडू शकतो.

पण तस नसून सहज जुळतं! कारण, जगाच्या पाठीवर कुठे ही जा, मानवी स्वभाव एकसारखा आहे, हे आपल्या सहज लक्षात येईल.

तर आधी पाडस या पुस्तकात नेमकं काय आहे हे तर पाहूया….

मार्जोरी किनन रोलिंग्ज यांचं पुस्तक ‘द इयर्लिंग’, मराठीत अतिशय दर्जेदार अनुवाद राम पटवर्धन यांनी केलाय.

ज्योडी आपल्या आईवडिलांबरोबर शेतातल्या घरात रहात असतो. त्याच्या अगोदरची सहा भावंडं कुपोषणामुळे दगावली आहेत.

निसर्गाशी जुळवून घेत या कुटुंबाच आयुष्य सुरू आहे. त्यांच्या आयुष्यात नातेवाईक आहेत तसे अधूनमधून हल्ला करणारं जंगली अस्वल ही आहे.

तर या छोट्या ज्योडीला एखादा प्राणी पाळायचा आहे. ही इच्छा मनात ठेवून तो मोठा होत असतो. त्याच्या अवतीभवतीची माणसं निसर्गाशी झगडत, जुळवून घेत जगणारी.

निसर्गाचं वर्णन यात अप्रतिम आहे. त्याचं ऋतूनुसार बदलणारं, चकित करणारं, भव्य, रुद्र, सुंदर रूप आपल्याला भारून टाकतं.

निसर्ग टप्प्याटप्याटप्याने बदलत असतो तसंच ज्योडीचं आयुष्य बदलत जातं.

त्याच्या आयुष्यात एक हरिणाचं पाडस येतं. या पाडसाला जीवापाड जपल्यानंतर ज्योडीवर एक कठीण प्रसंग येतो.

आईवर चिडून दूर निघून जाऊ पहाणा-या ज्योडीला परत पाठवलं जातं. इथेच तो एकाकीपण, भीती या भावनांचा सामना करतो.

आयुष्य अनुभवताना ज्योडीची समज वाढत जाते. ज्योडी प्रगल्भ होतो.

शाळेत जाणाऱ्या वयाची मुलं आणि त्यांचे पालक यांच्यासाठी पाडस हे खूप महत्वाचं पुस्तक आहे.

चौघीजणी

नावाप्रमाणेच यात चौघीजणी आहेत. चार बहिणींची ही गोष्ट.

लुइसा मे अल्कॉट या लेखिकेचे लिटील वुईमेन आणि गुड वाइव्हज हे दोन भाग गाजले. आणि शांताबाईं शेळके यांनी केलेला “चौघीजणी” हा त्या पुस्तकाचा अनुवाद.

यातल्या चौघीजणी बहिणी आहेत. पहिली बहिण मेग म्हणजे मार्गारेट दुसरी ज्यो तिसरी एलिझाबेथ तिला सगळी बेथ म्हणतात चौथी ॲमी.

अमेरिकेतलं मार्च कुटुंब एके काळी श्रीमंत होतं.

पण त्यांची परिस्थिती आता जरा खालावली आहे. त्यामुळे हौसमौज बाजूला ठेवावी लागते.

पण या चार बहिणी आई वडिलांच्या शिस्तीत मोठ्या होतं असतानाचं वर्णन वाचताना आपण त्या कुटुंबाचा हिस्सा होऊन जातो.

या चौघींमध्ये सगळच गुडी गुडी नाही. त्यांच्यात प्रेम आहे, भांडणं आहेत, चुका कबूल करण्याचा प्रांजळपणा आहे.

एका गरीब बाईला नाताळसाठी तयार केलेली पक्वान्न देऊन आई नकळत या मुलींवर संस्कार करत असते.

त्यांच्या शेजारच्या लॉरेन्स आजोबांकडून रुचकर पदार्थ मिळतात आणि दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार खोल रूजत जातात.

प्रत्येकीचा स्वभाव वेगळा त्यामुळे प्रत्येकीला वेगळे अनुभव येतात.

आईवडिलाचे संस्कार अशा प्रसंगात खोलवर झिरपतात. यातूनच या चौघींचं एकमेकांशी नातं घट्ट होतं जातं.

अमेरिकन पार्श्वभूमीवर जरी ही कथावस्तु घडत असली तरी कितीतरी गोष्टींशी आपलं नातं जोडता येऊ शकतं.

आपल्या साध्या वागणूकीने मुलांना घडवणारे कणखर आईवडील जगात सर्वत्र असतात.

त्यामुळे चूक झाली तर आकांडतांडव न करता किंवा दुर्लक्ष ही न करता, त्या चुकांचं गांभीर्य मुलींना पटवून देणारे मार्च दांपत्य अनोळखी मुळीच वाटत नाहीत.

मोबाईलच्या या फास्ट युगात ही थोडीशी संथ जीवनशैली असणारी, पाडस आणि चौघीजणी ही दोन पुस्तकं अगदी सहज जीवनाचा पाया घडवतात.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय