फक्त एक लाख रुपये गुंतवून सुरू करता येण्याजोग्या १० बिझनेस आयडियाज

बिझनेस आयडिया marathi

नऊ ते पाचची नोकरी करण्याचा आपल्याला सगळ्यांनाच कंटाळा येतो. नोकरी म्हंटली की ठराविक वेळ आली, डोक्यावर बॉस नावाची टांगती तलवार आली आणि कितीही कष्ट केले तरी महिन्याला ठराविकच पगार मिळणार हेही आलेच.

त्यामुळे सर्वांच्याच मनात नोकरी सोडून आपण एखादा व्यवसाय करावा असे असते. परंतू व्यवसाय सुरु करायचा म्हणजे मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा.

आपल्याला असे वाटते की भरपूर भांडवल घातल्याशिवाय व्यवसाय सुरू होणार नाही. एवढे पैसे कसे जमा करायचे या विचारात राहून, आपला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा मनातच राहून जाते.

परंतु आज आम्ही अशा १० बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्यासाठी केवळ एक लाख रुपये इतके भांडवल देखील पुरेसे आहे.

इतक्या कमी भांडवलात अगदी यशस्वीपणे हे व्यवसाय सुरू करता येऊ शकतील. आपल्या मेहनतीने आपण ते व्यवसाय वाढवून भरपूर नफा कमवू शकतो.

असे अनेक तरुण तरुणी असतात ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची खूप इच्छा असते परंतु भांडवलाअभावी आणि पुरेशा माहितीअभावी ते पाऊल पुढे टाकत नाहीत.

अशा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी आजचा हा लेख आहे. चला तर मग पाहूया अशा कोणत्या आयडिया आहेत

१. फेस मास्क बनवणे

कोविडमुळे फेस मास्क ही सध्या अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे. एकूणच बाहेरील प्रदूषण पाहता लोक फेस मास्क घालून बाहेर पडणे पसंत करतात. फेस मास्क तीन प्रकारचे असतात. कापडी मास्क, सर्जिकल मास्क आणि N-95 मास्क.

यापैकी कापडी मास्क आणि सर्जिकल मास्क बनवण्याचे युनिट १ लाख रुपयांपेक्षा कमी भांडवलामध्ये सुरू करता येऊ शकते.

घरगुती स्तरावर फेस मास्क बनवणे किंवा मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती करण्यासाठी मशिनरी खरेदी करणे हे दोन्ही ऑप्शन्स उपलब्ध असतील.

मास्क बनवणारे मशीन आणि त्याचे इलास्टिक लॉक करणारे मशीन या दोनच मशीनची आवश्यकता भासेल. हा अतिशय चांगली मागणी असणारा व्यवसाय कमी भांडवलात सुरु करून भरपूर नफा कमावणे शक्य होणार आहे.

२. सॅनीटायझर बनवणे अथवा सॅनीटायझर डिस्पेंसर बनवणे 

फेस मास्क प्रमाणेच सध्या सॅनिटायझरला सुद्धा खूप मागणी आहे. तुम्ही सॅनिटायझर बनवण्याचे छोटे युनिट सुरू करू शकता. अर्थातच त्यासाठी योग्य ते परवाने घेणे आणि सॅनिटायझर बनवण्यासंबंधीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे .

तसेच या व्यवसायासाठी छोट्या जागेची देखील आवश्यकता भासते. या व्यवसायाशी संबंधित आणखीन एक व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. तो म्हणजे सॅनिटायझर डिस्पेंसर बनवणे.

हा व्यवसाय देखील कमी भांडवलात सुरू करता येऊ शकेल. डिस्पेंसर बनवणारे मशीन, लागणारे साहित्य आणि छोटीशी जागा इतकी गुंतवणूक करावी लागेल. हे दोन्ही प्रकार देखील कमी भांडवलात भरपूर नफा मिळवून देणारे व्यवसाय आहेत.

३. मेणबत्त्या तयार करणे

मेणबत्त्यांचा वापर निरनिराळ्या प्रकारे होतो. घरगुती स्तरावर तर त्यांचा वापर होतोच त्याशिवाय डेकोरेशन साठी आणि धार्मिक कारणांसाठी देखील मेणबत्त्यांचा वापर होतो.

मेणबत्त्या तयार करण्याचा व्यवसाय घरबसल्या करणे अगदी सहज शक्य आहे. साध्या मेणबत्या तयार करण्यासाठी फक्त मेण, काही साचे, सुगंधी द्रव्ये आणि दोरा इतक्याच साहित्याची आवश्यकता भासते. अगदी कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. वेगवेगळ्या डिझाईनच्या मेणबत्त्या बनवणे देखील शक्य आहे.

दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अशा डिजाइनर मेणबत्त्यांना भरपूर मागणी असते. आपल्या कलात्मकतेचा वापर करून अशा प्रकारच्या मेणबत्त्या तयार करून विकणे हा एक उत्तम व्यवसाय आहे.

४. उदबत्या तयार करणे

उदबत्त्यांचा वापर भारतात आणि परदेशातही भरपूर प्रमाणात केला जातो. धार्मिक कारणांसाठी तर उदबत्त्यांचा वापर होतोच शिवाय सुगंधासाठीही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

अशा उदबत्या बनवण्याचे ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक मशीन बाजारात उपलब्ध आहे. साधारण ७५०००/- रुपयांच्या भांडवलावर हा व्यवसाय सुरु करणे शक्य आहे.

५. चॉकलेट्स तयार करणे

बाजारात मिळणाऱ्या चॉकलेटपेक्षा घरी तयार केलेल्या चॉकलेट्सना सध्या खूप मागणी आहे. अगदी ३०००० ते ४०००० रुपये इतक्या कमी भांडवलावर हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

घरगुती पद्धतीने तयार केलेल्या विविध चवींच्या चॉकलेटना बाजारात भरपूर मागणी असल्यामुळे या व्यवसायात भरपूर नफा मिळवण्याची संधी आहे.

त्यासाठी चॉकलेट्स बनवण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक स्तरावर चॉकलेट विकण्यासाठी खाद्यपदार्थ परवाना घेणे देखील आवश्यक आहे.

६. डिस्पोजेबल प्लेट्स आणि कप तयार करणे

डिस्पोजेबल प्लेट्स आणि कप हल्ली जवळजवळ प्रत्येक गेट-टुगेदर, सहली किंवा कार्यक्रमात वापरल्या जातात.

त्याच बरोबर अशा प्लेट्स आणि कप स्वस्त असल्यामुळे रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्यांवरही त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

त्यामुळे अशा प्लेट्स आणि कप तयार करण्याच्या व्यवसायाला नेहमीच खूप मागणी असते. साधारणपणे ६००००/- रुपयांच्या भांडवलावर हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यासाठी मशीनरी आणि छोट्या जागेची गरज आहे.

७. लोणची बनवणे

घरगुती चवीच्या लोणच्यांना नेहमीच मोठी मागणी असते. अगदी घरच्या घरी हा व्यवसाय सुरु करणे शक्य आहे. त्याच बरोबर व्यावसायिक स्तरावर जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तरीदेखील अगदी २५००० रुपये इतक्या कमी भांडवलावर देखील हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे.

अशाप्रकारे तयार केलेल्या लोणच्यांना भारतात तसेच परदेशातही भरपूर मागणी असते. यातून भरपूर नफा कमावता येणे शक्य आहे.

८. मिठाई किंवा वडापाव, सामोसा यासारखे खाद्यपदार्थ तयार करणे

ही एक अगदी नेहमीच मागणी असणारी बिजनेस आयडिया आहे. मिठाया किंवा वडापाव, समोसा, भजी, पाणीपुरी यांसारख्या पदार्थांना नेहमीच खूप मागणी असते.

व्यावसायिक स्तरावर असे पदार्थ तयार करण्यासाठी ते उत्तम रीतीने बनवण्याची हातोटी मात्र असली पाहिजे.

त्याच बरोबर हाताखाली काही माणसे नेमण्याची आवश्यकता भासू शकते. तसेच असे पदार्थ विकण्यासाठी एखादे छोटेसे दुकान असले तर व्यवसाय जास्त प्रमाणात चालेल. ५०००० ते ७५००० रुपये इतक्या भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

९. घरगुती न्याहारीचे पदार्थ करून विकणे

नोकरी किंवा शिक्षणानिमित्त घराबाहेर राहणारे लोक घरगुती न्याहारीचे पदार्थ घेणे पसंत करतात. त्यामुळे अशा पदार्थांना नेहमीच भरपूर मागणी असते.

घरच्या घरी असे उत्तम चवीचे आणि चांगल्या क्वालिटीचे पदार्थ तयार करून ते विकणे अगदी कमी भांडवलात शक्य आहे.

तसेच जर होम डिलीवरीची सोय करून दिली तर अशा पदार्थांना जास्त मागणी येऊ शकते. अगदी २० ते २५ हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय सहज सुरु करता येऊ शकतो.

१०. टिफिन सर्विस

ऑफिसेस आणि सोसायट्यांसाठी टिफिन पुरवणे हा देखील एक नेहमी मागणी असणारा व्यवसाय आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असणारे लोक किंवा घरातील सर्वजण नोकरीत बिझी असल्यामुळे दुपारचा अथवा दोन्ही वेळचा टिफिन ही अनेक कुटुंबांची गरज बनली आहे.

अशा वेळी जर आपण उत्तम क्वालिटीचा टिफिन वाजवी दरात उपलब्ध करून दिला तर या व्यवसायात चांगला जम बसवता येऊ शकतो. निरनिराळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ जर उपलब्ध करून दिले तर त्यांना मोठी मागणी असते.

तर मित्र-मैत्रिणींनो या आहेत १० अशा बिजनेस आयडियाज ज्या अगदी कमी भांडवलावर सुरू करता येऊ शकतात. आपल्या मेहनतीने आणि चांगली सर्विस देण्याने आपण यात चांगला जम बसवून भरपूर कमाई करू शकतो.

तर या आयडियाज वापरून आपला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करा. तसेच तुमच्याजवळ जर काही आयडिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!