लहान मुलांसाठी कपडे खरेदी करताना लक्षात ठेवा या काही गोष्टी

कपडे खरेदी करताना

लहान मुलांसाठी वेगवेगळ्या फॅशनच्या कपड्यांनी आज मार्केट गजबजून गेलं आहे.

या चिमुकल्यांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी पालकांचाही उत्साह ओसंडून वहात असतो.

मात्र कपडे खरेदी करण्यापुर्वीच काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं.

लहान मुलांसाठी कपडे खरेदी करताना लक्षात ठेवा या काही गोष्टी

ट्रेंडीलूकचे कपडे विशेषतः लहान मुलांसाठी निवडताना, त्या कपड्यामुळे होणा-या नुकसानीकडे ब-याच वेळेला आपण दुर्लक्ष करतो.

आजच्या काळात लहान मुलांच्या कपड्यासाठी इतकी प्रंचड व्हरायटी उपलब्ध आहे की जरा गोंधळून जायला होतं.

मुलांसाठी फॅशनेबल पण कम्फर्टेबल कपडे कसे निवडावेत? हा प्रश्न पडतो.

नवीन कपडे खरेदी केलेत

एक काळ असा होता की मुलांसाठी मळखाऊ, थोडेसे वाढत्या अंगाचे ढगळ कपडे घेतले जात.

आज मात्र परिस्थिती बदलली आहे. वाढत्या अंगाचे कपडे घेण्याचा जमाना आता बराच मागे पडला.

लहान मुलांसाठी ही वयाच्या वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार कपडे छान पद्धतीने डिझाइन केले जातात.

ब-याच वेळा टी.व्ही किंवा सोशल मिडिया वरची फँशन बघून मुलांसाठी कपडे निवडले जातात.

मुलं मात्र ते कपडे वापरताना अनकम्फर्टेबल होतात.

म्हणूनच कपडे काळजीपूर्वक निवडले पाहिजेत.

कपडे खरेदी करण्यापुर्वी मुलांचं वय लक्षात घ्यावं.

पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे निवडताना खुप मोती, मणी, डेकोरेशनची बटनं किंवा इतर वस्तु असणारे ड्रेस घेणं टाळलं पाहिजे.

एक तर मोती किंवा बटन मुलांना टोचू शकतात दुसरं हे मोती किंवा बटन मुलं नकळत गिळण्याचा धोका असतो.

अनेक लेअर असणारे कपडे खरेदी करणे टाळा. कारण एकतर या कपड्यांना चांगल्या दर्जाचं ड्रायक्लिनिंग सतत करावं लागतं. शिवाय मुलांना ते कॅरी करायला अवघड होतं.

नवीन कपडे खरेदी केलेत

त्यापेक्षा उत्तम रंगसंगती साधणारे कपडे मुलांच्या जाणीवा ही वाढवू शकतात.

खूप साधे, सिंपल कपडे नकोत तर मुलांच्या वयाला शोभणारी फॅशन किंवा ट्रेंड फॉलो करा.

ब-याच वेळा स्कार्फ किंवा गळ्याशी थोडे टाईट असणारे कपडे असतात. अशी फॅशन आवर्जून टाळायला हवी.

कारण अशा प्रकारच्या कपड्यांना कॅरी करणं मुलांना त्रासदायक ठरू शकतं. काहीवेळा गळ्याशी हे कपडे टाईट होऊन मुलांचा श्वास गुदमरू शकतो.

खरेदी करताना बजेटचा ही विचार करायला हवा. खुप महाग कपडे वारंवार वापरले जात नाहीत. तर वाढत्या वयाच्या मुलांची उंची पटकन वाढून हे कपडे अडगळीत ही पडतात.

त्यामुळे ज्याचा मेंटेनन्स सोपा तेच कपडे निवडायला हवेत ना?

मुलांना जे कपडे घालणं आनंददायी वाटतं त्याच कपड्यांची आवर्जून निवड करा.

वाढत्या वयातील मुलांची आवड लक्षात घेऊनच त्यांच्यासाठी ड्रेस निवडा. आपली आवड त्यांच्यावर लादू नका.

खूप ग्लॅमरस कपडे जे कॅरी करणं मुलांना अवघड वाटतं त्या कपड्यांचा हट्ट धरू नका.

फारच टाईट फिटिंगचे किंवा अगदीच ढगळ हे दोन्ही टाळून योग्य मापाचे कपडे मुलांसाठी निवडा.

जे कपडे घालून मुलं सहज वावरू शकतात किंवा खेळू ही शकतात, अशा प्रकारचे कपडे निवडायला हवेत.

उत्तम पालकत्व निभावताना कपडे खरेदी महत्वाची ठरते.

मुलांवर आपल्या मताची जबरदस्ती न करता त्यांनी निवडलेल्या कपड्यांचे फायदे तोटे समजावून मुलांची कपडे खरेदी झाली तर ती आनंददायी ठरते.

कपड्यांची निवड ही मुलांच्या घडणाऱ्या व्यक्तीमत्वाचा एक भाग असतो.

त्यामुळे पालकांनी जाणीवपूर्वक ही ‘कपडे खरेदी’ केली पाहिजे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!