ऑप्शनसंबंधी व्यव्हारातील शब्दावली

Options Terminologiesऑप्शन्स (Options) हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो. हे व्यवहार कसे होतात ते आपण यापूर्वीच्या लेखात समजून घेतले. या व्यवहारासंबंधी काही परिचित, अपरिचित शब्दसमूहांची माहिती करुन घेवूयात.

  • ऑप्शन रायटर : ऑप्शन्सची विक्री करणाऱ्या विक्रेत्यास ऑप्शन्स रायटर असे म्हणतात.
  • कॉल ऑप्शन्स : या कराराच्या खरेदीदारास त्यात नमूद केलेल्या मालमत्तेच्या खरेदीचा अधिकार मिळतो.
  • पुट ऑप्शन्स : या कराराच्या खरेदीदारास त्यात नमूद केलेल्या मालमत्तेच्या विक्रीचा अधिकार मिळतो.
  • ऑप्शन्सची किंमत / प्रिमियम : ऑप्शन्स खरेदी करणाऱ्याकडून विक्रेत्यास जी रक्कम दिली जाते त्यास ऑप्शन प्राईज किंवा प्रिमियम असे म्हणतात.
  • एक्सपायरेशन डेट : करारात नमूद केलेली ऑप्शन्स बंद होण्याच्या तारखेस ऑप्शन्स एक्सपायरेशन डेट असे म्हणतात.
  • स्ट्राईक प्राईज : जी किंमत आधार धरून ऑप्शन्सचा करार केला जातो त्यास स्ट्राईक प्राईज किंवा एक्सरसाइज प्राईज असे म्हणतात.
  • इज इन द मनी / ऍट द मनी / आऊट ऑफ द मनी : स्ट्राईक प्राईजहून मालमत्तेची बाजारातील किंमत जास्त असल्यास त्या कॉल ऑप्शन्सला इन द मनी कॉल ऑप्शन्स असे म्हणतात. जर या दोन्ही किंमती समपातळीत असतील तर त्या कॉल ऑप्शन्सला ऍट द मनी कॉल ऑप्शन्स आणि बाजारातील किंमत स्ट्राईक प्राईजपेक्षा कमी असेल तर त्या कॉल ऑप्शन्सला आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन्स असे म्हणतात याउलट स्ट्राईक प्राईजहून मालमत्तेची बाजारतील किंमत अधीक असेल तर पुट ऑन आउट ऑफ़ द मनी पुटऑप्शन्स असे म्हटले जाते.
  • ऑप्शन्सचे आंतरिक मूल्य (Intrinsic value): जेव्हा कॉल ऑप्शन्स इन द मनी असतो तेव्हा त्याच्या बाजारभाव व स्ट्राईक प्राईज यातील फरकाला त्याची इन्ट्रिस्टिक व्हॅल्यू असे म्हणतात.
  • ऑप्शन्स टाईम व्हेल्यू : ऑप्शन्स प्रिमियम आणि त्याची इन्ट्रिस्टिक व्हेल्यु मधील फरकाला ऑप्शन्सची टाईम व्हॅल्यू असे म्हणतात.
  • कव्हर्ड आणि अनकव्हर्ड ऑप्शन्स : जेव्हा ऑप्शन्सचा विक्रेता हा मालमत्तेचा मालक असतो तेंव्हा तो कव्हर्ड आहे जर ही मालमत्ता उधार घेवून विकत असेल तर तो अनकव्हर्ड ऑप्शन्स आहे असे म्हटले जाते.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे थोडे गुंतागुंतीचे, एक्सचेंजच्या माध्यमातून केले जाणारे, वायद्यांचे करार असून यातील संकल्पना आपल्या फार परिचयाच्या नसल्याने त्या किंचित अवघड वाटतात. हे करार करण्यास म्यूचुयल फंड, विदेशी वित्त संस्था (FII) आणि स्वदेशी वित्त संस्था (DII) यांना बंदी आहे. फक्त नुकसान कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेचे प्रमाणात हेजिंग करण्यासाठी (तोटा कमी करण्यासाठी) यांचा वापर करता येतो. सट्ट्यासाठी (Speculation) यांचा वापर त्यांना करता येत नाही. या संस्था, इतर मोठें गुंतवणूकदार, गुंतवणूक संधी शोधणारे (Arbitrager) आणि सट्टेबाज यांचा कसा वापर करतात ते पुढील भागांत पाहूया.

वाचण्यासारखे आणखी काही…..

वायद्यांचे व्यवहार (Forward Transactions)
भविष्यातील व्यवहार ( Futures Transactions)
फ्यूचर्स मार्केटशी संबंधित शब्दावली
पर्याय व्यवहार (Options Trading)…….

1 Response

  1. रंजना मंत्री.मु.ग्रा.पं. says:

    उदयजी, धन्यवाद. .
    तुमच्या लेखनातून ग्राहकांना उपयुक्त माहिती मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!