स्टेट बँक ऑफ इंडिया की पोस्ट ऑफिस? कुठे पैसे गुंतवल्यास जास्त व्याज मिळेल?

स्टेट बँक ऑफ इंडिया की पोस्ट ऑफिस? कुठे पैसे गुंतवल्यास जास्त व्याज मिळेल?

स्टेट बँक ऑफ इंडिया की पोस्ट ऑफिस? कुठे पैसे गुंतवल्यास जास्त व्याज मिळेल? माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा

बहुतेक सर्व लोकांचा आपले मुद्दल सुरक्षित ठेवून व्याज मिळवण्याकडे कल असतो. त्यामुळे सहसा सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर्स किंवा इतर जोखमीच्या पर्यायांचा विचार न करता गुंतवणुकीसाठी बँक किंवा पोस्टाची निवड करतात.

बँकेत किंवा पोस्टात मुदत ठेव पावती केली की बचत खात्यापेक्षा जास्त दराने व्याज तर मिळतेच, शिवाय आपले मुद्दल सुरक्षित राहण्याची हमी असते.

आणखी एक फायदा म्हणजे ईमर्जन्सीच्या वेळी मुदत ठेव पावती मोडून ताबडतोब गुंतवलेली रक्कम काढता येऊ शकते. अशा वेळी कोणताही अतिरिक्त दंड भरावा लागत नाही. मिळणारे व्याज मात्र कमी होते. त्यामुळे आपल्याला सोयीची ठरेल इतक्याच मुदतीची मुदत ठेव पावती करावी.

मुदतीअखेर पैशाची गरज नसेल तर तीच ठेव पावती रिन्यू करता येते किंवा नवी मुदत ठेव पावती सुद्धा करता येते. असे करण्यामुळे कोणतेही नुकसान न होता जास्तीत जास्त व्याज मिळवता येऊ शकते. त्याचप्रमाणे बँकेत किंवा पोस्टात मुदत ठेव पावती करून ठेवणे सोपे देखील असते, त्यात फार काही किचकट कागदपत्रे नसतात त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा कल हा बँक किंवा पोस्टात पैसे गुंतवण्याकडेच असतो.

बँक म्हंटल की भारतातील लोकांना सर्वात आधी आठवते ती भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा सगळीकडे आहेत. त्याच प्रमाणे भारतीय नागरिकांसाठी दुसरी विश्वासाची गुंतवणूक करण्याची जागा म्हणजे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस देखील भारताच्या अगदी कानाकोपऱ्यात असल्यामुळे गावोगावच्या लोकांना तेथे गुंतवणूक करणे शक्य होते.

एसबीआय किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुदत ठेव पावती किंवा रिकरिंग डिपॉझिट करणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे.

आज आपण एसबीआय आणि पोस्ट ऑफिस यांच्या व्याजदराची तुलना करून कुठली गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे ते पाहूया

पोस्ट ऑफिस व्याजदर

पोस्ट ऑफिस मध्ये १ ते ५ वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करता येते. अशी गुंतवणूक केल्यास खालील प्रमाणे व्याज मिळते.

१ वर्षासाठी गुंतवणूक केल्यास ५.५ %

२ वर्षासाठी गुंतवणूक केल्यास ५.५ %

३ वर्षासाठी गुंतवणूक केल्यास ५.५ %

५ वर्षासाठी गुंतवणूक केल्यास ६.७ %

(हे वेळोवेळी बदलत्या नियमांनुसार बदलू शकते)

स्टेट बँक ऑफ इंडिया व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवणूकदारांना ७ दिवस ते १० वर्षे या मुदतीसाठी मुदत ठेव पावती करता येते. प्रत्येक मुदतीसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत.

७ ते ४५ दिवस – २.९ %

४६ ते १७९ दिवस – ३.९ %

१८० ते २१० दिवस – ४.४ %

२११ दिवसांपेक्षा जास्त पण एक वर्षापेक्षा कमी – ४.४ %

१ वर्षापेक्षा जास्त पण २ वर्षापेक्षा कमी – ५ %

२ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त पण ३ वर्षापेक्षा कमी – ५.१ %

३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त पण ५ वर्षांपेक्षा कमी – ५.३ %

५ वर्षे ते १० वर्षे – ५.४ %

(हे वेळोवेळी बदलत्या नियमांनुसार बदलू शकते)

तर हे आहेत पोस्ट ऑफिस आणि एसबीआय तर्फे मुदत ठेवींवर दिले जाणारे व्याजदर. या दोन्ही पैकी कोणत्याही ठिकाणी मुदत ठेव पावती करून पैसे गुंतवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुद्दलाच्या सुरक्षिततेची हमी असणे. त्यामुळे दोन्ही व्याजदर कम्पेअर करून तुम्हाला सोयीचे असणारे आणि अधिक फायद्याचे ठरणारे ठिकाण निवडून तेथे गुंतवणूक करा आणि निर्धास्त व्हा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Image Credit :https://www.youtube.com/watch?v=lA-fY6dDrzo

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!