तुमचा आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला आवडत नाही? मग तो बदलण्यासाठी ‘हे’ करा

आधार कार्ड वरील फोटो बदलणे

तुमचा आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला आवडत नाही का? जाणून घ्या ही प्रोसेस ज्यामुळे तुम्ही तुमचा आधार कार्ड वरील फोटो अपडेट करु शकता.

आधार कार्ड हे सध्याच्या काळातील एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. ओळखपत्र म्हणून आधार कार्डाचा प्रामुख्याने वापर केला जातो. परंतु बहुतेकांना आपला आधार कार्ड वरील फोटो आवडत नाही. आधार कार्ड वरील फोटो बाबत बरेच जोक देखील वायरल झाले आहेत.

परंतु आता आपल्या आधार कार्ड वरील फोटोची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमचा आधार कार्ड वरील फोटो बदलून अपडेट करू शकता. कसे ते जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

आधार कार्ड अपडेट करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे आधार संबंधी अधिकृत वेबसाईट पोर्टल वापरणे आणि दुसरा आधार कार्ड सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करणे.

आधार कार्ड वरील इतर माहिती जसे की पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी जरी आधारच्या अधिकृत वेब पोर्टलवर अपडेट करता येत असले तरी एखाद्या व्यक्तीचा फोटो आणि त्याचे बायोमेट्रिक डिटेल्स मात्र अधिकृत वेब पोर्टल वरून बदलता येत नाहीत. त्यासाठी स्वतः अधिकृत आधार सेवा केंद्राला भेट देणे आवश्यक आहे.

आधार कार्ड वरील आपला फोटो बदलण्याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे 

१. तुमच्या घराजवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.

२. तेथे गेल्यावर आधार अपडेटचा फॉर्म मागा.

३. तो फॉर्म काळजीपूर्वक भरा.

४. तेथील एक्झिक्युटिव्हकडे तो फॉर्म सबमिट करा.

५. त्यानंतर तेथील एक्झिक्यूटिव्ह तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेऊन तुमचा आधार क्रमांक योग्य आहे याची पडताळणी करेल.

६. त्यानंतर तेथील वेब कॅमेर्‍याने तुमचा नवीन फोटो घेतला जाईल.

७. आधारचे डिटेल अपडेट करण्यासाठीची फी म्हणून तुम्हाला रु. २५ + GST इतके पैसे भरावे लागतील.

८. पैसे भरल्यानंतर तुम्हाला यू आर एन असलेली एक पावती मिळेल.

९. तेथील एक्झिक्यूटिव्ह द्वारा तुमचे काम पूर्ण केले जाईल.

१२. अपडेट आधार कार्ड तुमच्या मोबाईल मधील mAdhaar ॲप वर देखील रिफ्रेश करून घ्या. mAdhaar ॲप बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

तर अशा सोप्या पद्धतीने आपण आपले आधार कार्ड वरील फोटो आणि बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करू शकतो.

या प्रोसेस साठी काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. ते खालील प्रमाणे –

१. आधार फोटो अपडेट करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.

२. तुमच्या जवळील आधी काढलेला कोणताही फोटो देण्याची आवश्यकता नाही. आधार कार्डवर येणारा फोटो तेथील एक्झिक्यूटिव्हद्वारा कॅमेरा वरून काढला जातो.

३. आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्याची सुविधा घरच्याघरी उपलब्ध नाही. त्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागते.

४. आधारचे डिटेल अपडेट करण्याचे एप्लीकेशन सबमिट केल्यानंतर जास्तीत जास्त ९० दिवसांमध्ये तुम्हाला अपडेटेड आधार कार्ड मिळू शकेल.

तर हे आहेत आपले आधार डिटेल्स अपडेट करण्याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे आणि आपल्याला न आवडणारा आपला आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठीची सोपी प्रोसेस. याचा फायदा जरूर घ्या.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!