शून्य खर्चात सुधारा शरीराची ठेवण, घरच्या घरी करा हे व्यायाम | आसनांची चित्रासहित माहिती

yogasan

मिस वर्ल्ड किंवा सौंदर्य स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलींच्या बांध्याची ठेवण बघून आपण आश्चर्यचकित होतो ना?

चालताना, वावरताना आपला बांधा आकर्षक दिसावा यासाठी या सौंदर्यवतींनी अफाट मेहनत घेतलेली असते.

तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला प्रभाव वेगवेगळ्या ठिकाणी पडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची ठेवण, चालण्याची ढब उत्तम पाहिजे.

सध्याच्या जीवनशैलीमध्ये मोबाईलचा अतिवापर होतो त्यामुळे पाठीला किंचित पोक आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व फिकं पडतं.

पण याची आता अजिबात काळजी करू नका घरच्या घरी सोपे व्यायाम करा आणि तुमच्या शरीराची ठेवण आकर्षक बनवा.

1) बालासन

बालासन हे एक सोपं आसन आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची ठेवण सुधारू शकता.

या आसनासाठी गुडघ्यावर बसून शरीराचा भार टाचांवरती द्या.

हात पुढे पसरून जमिनीवरती टेकवा. कपाळ जमिनीवर टेकवा. काही सेकंदानंतर शरीर रिलॅक्स करा.

बालासनामुळे पाठीचा कणा ताठ होऊन शरीराची ठेवण ही सुधारते.

balasan बालासन

2) भुजंगासन

जमिनीवरती पालथं पडा. हात टेकवून मान उचला.

भुजंगाचा म्हणजे नागाचा फणा जसा असतो तशा पद्धतीची शारीरिक स्थिती या आसनामध्ये असते

हे आसन सुद्धा अतिशय प्रभावी आहे.

भुजंगासन

3) अधोमुख शवासन

इंग्लिश मध्ये या आसनाला Bird Dog Exercise म्हणून ओळखलं जातं.

यासाठी हात आणि गुडघे जमिनीला टेकवून ताठ पाठीचा टेबल करण्याचा प्रयत्न करा.

हळूहळू उजवा हात आणि डावा पाय सरळ करून वर उचला साधारण सहा सेकंद या स्थितीमध्ये राहा. हळूहळू आसन सोडा.

एका दिवशी पाच ते सहा वेळा हे अधोमुख शवासन केल्यामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात. शरीराचा समतोल साधला जातो आणि पाठीचा कणा ताठ होतो.

अधोमुख शवासन

4) Plank Pose – कुंभकासन 

कोणत्याही मदती शिवाय केला जाणारा व्यायाम प्रकार Plank.

हा प्रकार सध्या खूप लोकप्रिय आहे.

हा प्रकार उत्तम शरीर रचनेसाठी तुम्हाला भरपूर मदत करतो.

जमिनीवर पालथंं पडा आता आपल्या शरीराचा भार हातावर आणि पायाच्या अंगठ्यावर तोलून धरा. शरीर ताठ आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुठलीही हालचाल न करता जितकं जास्त वेळ ही पोझिशन तुम्हाला टिकवून ठेवता येईल तितका वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा.

सुरुवातीला काही सेकंदा पासून सुरुवात करत काही मिनिटापर्यंत Plank करण्याचा प्रयत्न करा.

कुंभकासन

5) सेतुबंधासन

हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा गुडघे उभे ठेवा पायाचे तळवे जमिनीला समांतर असावेत.

हळूहळू पाठ आणि कंबर उचला एखाद्या पुलाप्रमाणे म्हणजेच सेतू प्रमाणं ही स्थिती आपल्याला दिसते.

पाठीच्या कण्याला बळकटी देणारं हे आसन पाठदुखी थांबवून तुमचं शरीर कमनीय करण्यासाठी मदत करतं.

सेतुबंधासन

6) पायाचे अंगठे पकडा

पायाचे अंगठे पकडणे हा अतिशय साधा सोपा वाटणारा प्रभावी प्रकार आहे.

कृती साधी सोपी आहे. पायात थोडंसं अंतर घेऊन उभे राहा. वाकून पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा.

ही कृती पाठदुखी थांबवण्यासाठीचा त्वरित उपाय आहे. पाठीच्या कण्याला ताठपणा देणारा हा व्यायाम बांधा आकर्षक करण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

yogasan

7) Wall Slide

नावाप्रमाणे या व्यायामासाठी भिंतीचा आधार घ्यायला हवा. भिंतीला टेकून उभे रहा हात वर खाली करा.

त्या दरम्यान शरीर आणि पाठ स्थिर असल्याची खात्री करून घ्या.

दिवसाला चार ते पाच सेट केल्यामुळे शरीराची ठेवण चांगलीच सुधारेल आणि पाठ दुखी कमी होईल.

8) टॉवेल चेस्ट

एक जाडसर टॉवेल घ्या. त्याची गुंडाळी करा हात पाठीमागे घेऊन दोन्ही हातात टॉवेल पकडा. हलका ताण द्या. आणि हात हलवा.

छाती आणि पाठीवर तुम्हाला ताण जाणवेल.

10 ते 15 सेकंद ही अवस्था टिकवून ठेवा. हळूहळू हात ढिले सोडा. शरीराची रचना आकर्षक करण्यासाठी हा व्यायाम तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.

yogasan

9) खांदे हलवणं

हाताचे तळवे खांद्यावर टेकवून खांदे गोल-गोल पुढच्या बाजूने पाच वेळा आणि मागच्या बाजूने पाच वेळा असे हलवा.

हीच कृती सावकाश करा. खांदे हलवण्याच्या या व्यायामामुळे खांद्याचे स्नायू बळकट होऊन पाठीवरती आलेलं पोक कमी होतं.

10) Chin Tuck

तुमच्या डोक्याचा शरीराशी समतोल राखण्यासाठी Chin Tuckची प्रॅक्टिस करा.

करायचं काय तर पायापासून पाठीपर्यंत भिंतीला टेकून उभं रहायचं.

मग अनामिका म्हणजे पहिलं बोट हनुवटीवर ठेवायचं आता डोकं पुढं-मागं म्हणजे मान मागे घेतल्यासारखी कृती पाच ते सहा वेळा करायची.

Wall Slide आणि Chin Tuck चं कॉम्बिनेशन केलं तर ते फार प्रभावी ठरेल आणि उत्तम रिझल्ट लवकर दिसतील.

या सर्व आसनांमुळे, व्यायामांमुळे घरच्याघरी शून्य खर्चात तुम्ही तुमच्या शरीराची ठेवण आकर्षक घडवू शकता.

कोणत्याही साहित्याशिवाय होणारे हे व्यायाम आणि आसनं नियमित करा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी पडू द्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!