शरीरात यूरिक ॲसिड वाढलं आहे का? सुरु करा ‘या’ आसनाचा सराव । पहा आसन व्हिडीओसह

उत्थितपाद अंगुष्ठान आसन

शरीरात यूरिक ॲसिड वाढले आहे का? ट्राय करा उत्थित पाद अंगुष्ठान आसन.

युरीक ॲसिड शरीरात वाढलं की सांधे आखडतात. टाचा दुखतात.

त्याचबरोबर पाय दुखणे किंवा व्हेरिकोज व्हेन्स हा त्रास तुम्हांला सुरू झालेला असेल, पायात क्रॅम्पस् येत असतील आणि युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं असेल तर तुमच्या व्यायामामध्ये उत्थित पाद अंगुष्ठान आसनाचा समावेश करा.

हे आसन करायला थोडसं अवघड आहे. पण येथे दिलेली माहिती आणि मनाचेTalks फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवरील व्हिडीओ पाहून तुम्ही याचा सराव करू शकता. जर तुम्हाला नियमित आसनं करायची सवय असेल तरच या आसनाकड वळा. नाहीतर क्रमा-क्रमाने योग्य सरवा नंतर हे आसन करणे सुरू करा.

उत्थित पाद अंगुष्ठान आसन कसं करावं?

1) सुरुवातीला ताडासनामध्ये उभे राहा.

2) उजवा पाय उचलून, गुडघा पोटाजवळ घ्या.

3) डावा हात कमरेवर ठेवा.

4) तुमच्या शरीराच्या बॅलन्सचा अंदाज घ्या आणि उचललेल्या पायाचा अंगठा पकडून पाय समोर ताठ करा.

साधारण पाच वेळा श्वास घेऊन सोडा. 30 ते 60 सेकंद ही आसन स्थिती कायम राहिली पाहिजे.

रिलॅक्स व्हा आता डावा पाय उचलून हे आसन करा.

दोन्ही बाजूला किमान पाच पाच वेळा 30 ते 60 सेकंद उत्थित पाद अंगुष्ठासन करायला हवं.

सरावानेच नीट हे आसन साधेल.

Video Credit : Boldsky

हे आसन सातत्याने केलंत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शरीरातील बदल जाणवेल.

सुरुवातीला अगदी काही सेकंद करून मग हळूहळू वेग वाढवला तरी चालू शकेल

पाठीच्या मागच्या भागात ज्यांना वेदना होत आहेत त्यांनी हे आसन करू नये.

लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा युरिक ऍसिड वाढून, गाऊट होऊ नये म्हणून घरगुती उपाय 

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!