कुरीयर फ्रॅंचाईजी कशी घ्यायची जाणून घ्या आणि महिन्याला कमवा 1.5 लाख रुपये

courier franchise apply online,

मित्रांनो या काळामध्ये बर्‍याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत.

बरेच जण नवीन संधी किंवा नवीन एखाद्या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा विचार करत आहेत.

तर मित्रांनो तुम्ही कुरियर फ्रॅंचाईजी घेऊन महिन्याला जवळपास दीड लाखांची कमाई करू शकता.

कुरिअर फ्रॅंचाईजी कशी घ्यायची किती इन्व्हेस्टमेंट आहे हे आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया.

पत्र किंवा सामान घरपोच पाठवण्यासाठी आता कुरीयरचा पर्याय सगळ्यांनाच आवडतो. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठंही सामान पाठवता येणं हेच या कुरीयर क्षेत्राचं यश आहे.

याच क्षेत्रातील 31 वर्ष कार्यरत असलेली कंपनी म्हणजे DTDC

Desk to Desk Courier & Cargo म्हणजेच DTDC ची फ्रॅंचाईजी घेऊन तुम्ही आपल्या करीयरची नवी सुरवात करू शकता.

फ्रॅंचाईजीची स्कीम कुठं सुरू आहे.

पुर्ण भारतात मेट्रो सिटी , सिटी आणि रुरल विभागासाठी A, B, C कॅटेगरीमध्ये फ्रॅंचाईजी
उपलब्ध आहे.

फी आणि इतर चार्ज

फ्रॅंचाईजीसाठी तुमच्याकडून कोणती ही फी घेतली जाणार नाही. मात्र सेट अप उभा करण्यासाठी फी घेतली जाईल.

1) सेट अप उभा करण्यासाठी A कॅटेगरीच्या मेट्रो सिटीत 1.5 लाख रूपयांची इन्वेस्टमेंट करावी लागेल.

2) B कॅटेगरीच्या सिटीत 1 लाख गुंतवावे लागतील

3) C कॅटेगरीच्या भागात DTDC कुरीयर फ्रॅंचाईजी घेण्यासाठी 50 हजार रुपए गुंतवावे लागतील.

फ्रॅंचाईजी देताना काही मुद्दयांचा विचार केला जातो.

1) फ्रॅंचाईजी ओपन करण्यासाठी निवडलेली जागा गर्दीच्या ठिकाणी असावी.

2) निवडलेली जागा ही तळ मजल्यावरच असली पाहिजे.

3) A कॅटेगरीच्या फ्रॅंचाईजीसाठी कमीत कमी 4 कर्मचाऱ्यांची भरती हवी.

4) B कॅटेगरीच्या फ्रॅंचाईजीसाठी कमीत कमी 3 कर्मचारी हवेत.

5) C कॅटेगरीच्या फ्रॅंचाईजीसाठी कमीत कमी 2 तरी कर्मचारी असले पाहिजेत.

रॉयल्टी फीस

एकूण उलाढालीपैकी 10 % रक्कम फ्रँचायझीला रॉयल्टी शुल्क म्हणून द्यावं लागेल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) सिक्युरिटी डिपॉजिट आणि एस्टेबलिशमेंट फीचा डिमांड ड्राफ्ट

2) आइडेंटिटी प्रूफ जसं की मतदान ओळखपत्र किंवा ड्राइविंग लायसन्स

3) ॲड्रेस फ्रुफसाठी रेशनकार्ड, लँडलाईन टेलिफोन बिल

4) लीव्ह ॲन्ड लायसेन्स ॲग्रीमेंट किंवा फ्रॅंचाईजी संबंधी ॲग्रीमेंट

5) पासबुक किंवा बँक स्टेटमेंट

या कागदपत्रांबरोबर एक ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल.

फ्रँचायझी सुविधा

सेटअपसाठी जे पैसे तुम्ही भराल त्यातली 5% रक्कम ही मार्केटिंगसाठी वापरली जाईल.

तुमच्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून प्रशिक्षण मिळेल.

त्याचबरोबर सॉफ्टवेअर, कर्मचाऱ्यांचा ड्रेस, इंटीरिअर यासाठी सुद्धा कंपनीकडून मदत केली जाईल .

अर्ज केल्यावर तुम्ही पात्र ठरलात तर पंधरा दिवसांत टप्याटप्याने फ्रँचायझी दिली जाईल.

म्हणजे तुम्ही पात्र ठरल्यापासून पंधरा दिवसांत तुमचा बिझनेस सुरू झालेला असेल.

कागदपत्रांची सत्यता तपासणे, ॲग्रीमेंट या प्रक्रियेला साधारण 15 दिवस लागतात.

भारताच्या वेगवेगळ्या भागात फ्रँचायझी मिळवण्यासाठी तुम्ही कंपनीला ईमेल करू शकता.

कंपनी कडून तुमच्या मेलला उत्तर येईल त्याचबरोबर तुमच्याशी फोनवर संपर्क केला जाईल.

कंपनीच्या स्थानिक अधिका-याकडून फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हांला सर्व मदत पुरवली जाईल.

उत्तर भारतात फ्रँचायझी घेण्यासाठी यावर ईमेल करा
मेल – [email protected]

दक्षिण भारतात फ्रँचायझी घेण्यासाठी यावर ईमेल करा. मेल – [email protected]

पश्चिम भारतात फ्रँचायझी घेण्यासाठी यावर ईमेल करा
मेल – [email protected]

पूर्व भारतात फ्रँचायझी घेण्यासाठी यावर ईमेल करा
मेल – [email protected]

एका नव्या संधीची वाट पहात असाल तर ही संधी तुम्हीच निर्माण करा.

आत्मविश्वासानं यशस्वी कुरीयर फ्रॅंचाईजी चालवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. वैभव शिंदे says:

    लेखामध्ये महिन्याला 1.5 लाख कसे कमवू शकतो याबद्दल काहीही दिलं नाहीये.. फक्त फ्रँचाईजी कशी घ्यायची याबद्दल दिले आहे..
    आजकाल लेखाचे शीर्षक आकर्षक करण्यासाठी तुम्ही बहुतेक असं करत असावा…
    बाकी लेख तुमचे चांगले असतात..

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!