मधुमेहासाठी योग: या आसनांच्या सरावानं शुगरवर ठेवा नियंत्रण | आसनांची चित्रांसहित माहिती

मधुमेह म्हणजेच डायबेटिस कोणत्याही वयात होऊ शकतो.

भारतात मधुमेह हा एक सामान्य आजार होत चालला आहे.

साधारण 70 दशलक्ष भारतीय मधुमेहाने ग्रस्त आहेत असा इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनचा अंदाज आहे.

यामुळे भारत हा जगातील तिसरा सर्वात जास्त मधुमेहींचा देश बनला आहे.

मधुमेहामुळे अंधत्व, किडनीचे आजार आणि हृदयविकार यासारखे घातक आजार होऊ शकतात.

तुम्हालाही शुगर असेल, मधुमेह झाला असेल, तर घाबरू नका.

कारण आता यावर बरंच संशोधन झालं आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की हा आजार आहार आणि योगासनांच्या मदतीने नियंत्रणात ठेवता येतो.

त्यासाठी तुम्हांला जीवनशैलीतील छोटेसे बदल करावे लागतील, जसं की वजन कमी करणं योग्य आहार घेणं, व्यायाम करणं – आणि अर्थातच योगासनं ही तुमच्या आरोग्यासाठी तुम्हांला मदत करतात.

मधुमेहासाठी योगाचे फायदे

जर तुम्ही नियमित योगासनं करत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करायला आसनं तुम्हांला मदत करतात.

योगासनांमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन नियंत्रणात येतं, वाढत्या मधुमेहाला रोखलं जातं, त्याचबरोबर शुगरमुळं ज्या गंभीर समस्या होऊ शकतात त्यांची तीव्रता कमी व्हायला मदत होते.

कसं तेच जाणून घेऊया कोणकोणती आसनं करायची ते ही जाणून घेऊया आजच्या लेखात.

1) कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायामामुळे मज्जासंस्था सक्रिय होते आणि मेंदूच्या पेशींना नवजीवन मिळतं.

मधुमेही रुग्णांसाठी हा प्राणायाम खूप उपयुक्त आहे, कारण तो पोटाच्या अवयवांना उत्तेजित करतो.

कपालभाती प्राणायामामुळं रक्ताभिसरण सुधारून मन शांत होतं.

सुरवातीला 1-2 मिनिटे कपालभाती प्राणायाम करुन जसजसा सराव वाढत जाईल तसतसा तुम्ही तो जास्त वेळ करू शकता.

Kapalbhati-pranayam-ksa-krava

2) सुप्त मत्स्येंद्रासन

सुप्त मत्स्येंद्रासनामुळं शरीराच्या आतल्या अवयवांचं मालिश केलं जातं, आणि त्यामुळं पचन सुधारतं .

सुप्त मत्स्येंद्रासन हे पोटाच्या अवयवांवर दबाव आणते आणि म्हणूनच ज्यांना शुगरचा त्रास आहे अशा मधुमेही लोकांसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.

दररोज १-२ मिनिटे सुप्त मत्स्येंद्रासन करणं पुरेसं ठरतं.

3) पश्चिमोत्तनासन

पश्चिमोत्तनासन या आसनामुळं पोट आणि ओटीपोट या अवयवांना मसाज घडतो आणि त्यांचं टोनिंग होतं

पश्चिमोत्तनासन या आसनामुळं शरीरातील प्राण संतुलित करण्यात आणि मन शांत होण्यास मदत होते.

हे आसन दिवसातून एखादं मिनिट अवश्य करा.

4) अर्ध मत्स्येंद्रासन

अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन पोटाच्या अवयवांची मालिश करतं, फुफ्फुसांना ऑक्सिजन पुरवठा वाढवून मणक्याला लवचिकता आणतं.

मन शांत करण्यासाठी सुद्धा अर्ध मत्स्येंद्रासनाची मदत होते.

या आसनामुळं पाठीच्या कण्यामध्ये रक्त प्रवाह सुधारतो. या आसनाचा कालावधी ही 1 मिनीटाचा असावा.

5) धनुरासन

स्वादुपिंड मजबूत आणि नियंत्रित करणारं धनुरासन मधुमेही रुग्णांनी आवर्जून करावं.

पोटाच्या स्नायूंना बळकट करणारं त्याचबरोबर तणाव आणि थकवा यांना दूर करण्यासाठी धनुरासन प्रभावी आहे.

6) शवासन

शवासनामध्ये तुम्ही विश्रांतीच्या अवस्थेत असता.

त्यामुळे तुमचा ताण कमी होऊन साखरेची पातळी कमी व्हायला मदत होते.

आराम देणारं हे आसन 5-10 मिनिटं निश्चित करा.

योगासनं करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

सातत्याने केलेल्या योगाभ्यासातूनच फायदे मिळतात ते ही आसनं हळूहळू केल्यावरच.

योगासनांमुळे कधीही सांधेदुखी वाढत नाही,

योगासनांचा सराव करताना शरीराला आधार देणाऱ्या वस्तू, किंवा उपकरणांची मदत घ्या.

लक्षात ठेवा तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ताण शरीराला अजिबात देऊ नका.

योगासनांच्या सरावानं वेदना वाढत गेल्या तर, योगाभ्यास ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “मधुमेहासाठी योग: या आसनांच्या सरावानं शुगरवर ठेवा नियंत्रण | आसनांची चित्रांसहित माहिती”

  1. I would like to join the WhatsApp group for more info and updates. Since i receive message group is full, request to start another group.
    Thank you for giving useful information.

    Reply
    • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

      सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

      त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/C9DOoiZaA9o0tC8xpi8uB7

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय