आनंदी जीवनासाठी आणि आरोग्यकारक जीवनशैलीवर भर देणार पुस्तक -The Healing Self

The Healing Self

पुस्तकाच्या शेवटास ७ दिवसांचा कोर्स देण्यात आलेला आहे, जो आपण दैनंदिन जीवनात वापरात आणला तर जीवन आनंदी होईल आणि आपण मनातून बरे झाल्याची पोचपावती मिळेल.

तुमचं जीवन वेगवेगळ्या चिंता आणि तणावाने व्यापल आहे का? छोटया छोट्या गोष्टींवरून चिडचिडणं, रात्री लवकर झोप न लागणं या सारखे त्रास तुम्हाला सतावतायेत का?

कधी एकदम आनंदी तर कधी एकदम निराश असं चक्र तुमचा पाठलाग करत आहे का? सर्व आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी, काय खायला हवं? किती व्यायाम करायला? मेडिटेशन म्हणजे काय? ते किती वेळ करायला हवं?

किती झोप घेणं माणसासाठी गरजेचं आहे? आपल्या विचारात परिवर्तन करायचं आहे का? सकारात्मक विचारसरणी कशी शिकायला हवी?

यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं ज्या एकाच पुस्तकात मिळतात ते हे पुस्तक.

मानवी प्रतिकारशक्ती मजबूत असल्याने कोणताही आजार आपल्यापासून दूर राहतो, सकारात्मक विचारसरणी स्वीकारल्याने जीवन आनंदात जगता येतं.

मनाचं आणि शरीराचं असणारं नातं ज्यावेळी आपणास समजतं त्यावेळी नकळत आपण स्वतःलाच बरं करतो.

सध्याचं जीवन हे धावपळीचं बनून गेलेलं आहे, यात माणूस आपला टिकाव लावण्यासाठी प्रयत्न करतोय पण हे सर्व करत असताना त्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागतोय.

हळूहळू शांतता हरवत चाललीय, नात्यांमध्ये मोठी दरी निर्माण व्हायला लागली आहे, माणूस माणुसकी विसरून चालला आहे.

हिंसा, युद्ध या गोष्टींमुळे माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. ज्यावेळी आपण स्वतःला समजू त्यावेळी आपल्याला जग समजू शकतं, त्यामुळे जर आपणास स्वतःला ओळखायचं असेल आणि स्वतःला मनातून बरं करायच असेल तर हे पुस्तक अशाच लोकांसाठी आहे. मन, शरीर, आजार, आहार, जीवनशैली या सगळ्यांवर प्रकाश टाकणारं पुस्तक.

पुस्तकाच्या शेवटास ७ दिवसांचा कोर्स देण्यात आलेला आहे, जो आपण दैनंदिन जीवनात वापरात आणला तर जीवन आनंदी होईल आणि आपण मनातून बरे झाल्याची पोचपावती मिळेल.

दिपक चोप्रा हे आंतरराष्ट्रीय लेखक आहेत ज्यांची प्रत्येक पुस्तकं बेस्टसेलर आहेत. त्यांनी रुडॉल्फ टांझी या सह लेखकाच्या मदतीने हे पुस्तक लिहिले आहे. २०१८ चं हे नवंकोरं पुस्तक नक्की वाचा.

Image Credit: experiencelife

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!