जगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके….(Motivational Books- Marathi)

पुस्तकं हि आपली सगळ्यात चांगली मित्र असतात असे म्हणतात. काही पुस्तकं करमणुकीची साधनं म्हणून वाचली जातात, काही ज्ञानाचे भांडार म्हणून तर काही पुस्तकं आयुष्यातल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.

आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. (Motivational Books In Marathi)

Chicken Soup for the Soul (चिकन सूप फॉर द सोल)

नाव-चिकन सूप फॉर द सोल
लेखक – जैक कैनफील्ड और मार्क विक्टर हैन्सन

या पुस्तकात छोट्या छोट्या १०१ गोष्टी आहेत. यांमध्ये नातेसम्बन्ध, मनाची भावनिक स्थिती, छित्या गोष्टींचा आयुष्यावर होणार मोठा प्रभाव या गोष्टी प्रकर्षाने दाखवल्या आहेत.

The Alchemist (अल्केमिस्ट)

नाव-अल्केमिस्ट
लेखक- पाओलो कोएलो

जेव्हा तुम्ही काहीतरी काहीतरी मनापासून मागता, तेव्हा ब्रम्हांडाची सगळी शक्ती तुम्हाला ते मिळवून देण्यासाठी योजना करते हा या पुस्तकाचा मूळ गाभा आहे.

तुम्हाला यात एक विलक्षण स्वप्नांची यात्रा वाचायला मिळेल. यात संघर्ष, प्रेम, रोमांच, हार, जीत यांचा रोलर कोस्टर तुम्हाला पुस्तक वाचून संपेपर्यंत आपल्याला एका जागी बांधून ठेवतो.

हे पुस्तक वाचून आयुष्य जगण्याचा आनन्द कसा घ्यावा हे माणूस नक्कीच शिकतो.

The Monk Who Sold His Ferrari (संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली )

नाव – संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली
लेखक – रॉबिन शर्मा

या पुस्तकात एका व्यक्तीचे जीवन साकार केले आहे जो ज्याला पैसे कमावणे हे एकच आयुष्याचे उद्दिष्ठ वाटते आणि तो आपले कुटूंब, आरोग्य, सुख, शांती सारे काही सोडायला तयार आहे.

पण एकदा त्याला हृदय विकाराचा झटका येतो तेव्हा या ऐहिक सुखाच्या पलीकडे जाऊन सुख शोधण्याचा प्रयत्नात तो भारतात येतो. आणि त्याला येथे मिळालेले ज्ञान त्याचे आयुष्य बदलून टाकते. हाच प्रवास या पुस्तकात वाचायला मिळतो.

Who Moved My Cheese? (माझं चीझ कोणी हलंविलं?)

नाव :माझं चीझ कोणी हलवलं ?
लेखक: डॉ. स्पेंसर जॉनसन
या छोट्याशा पुस्तकात परिवर्तन हा आयुष्याचा अविभाज्य भाग कसा आहे हे वाचायला मिळते.

‘माझं चीज कोणी हलवलं ?’ ही एक बोधकथा आहे. ‘परिवर्तन’ या विषयीच्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी. भूलभुलैय्या जगामध्ये सुख आणि समाधान मिळवण्यासाठी चीज शोधणार्‍या चार प्राण्यांची ही कथा आहे.

चीज हे एक प्रतिक आहे आपल्याला जीवनात हव्याशा वाटणार्‍या गोष्टीचं प्रतिक भूलभलैय्या ही अशी जागा आहे जिथे आपण आपल्याला हव्याशा वाटणार्‍या गोष्टींचा शोध, घेत असतो.

कथेतील पात्रं विलक्षण बदलांना तोंड देतात. अखेर शेवटी त्यातला एक यशस्वी होतो आणि अनुभवातून मिळालेली शिकवणूक भूलभुलैय्याच्या भिंतीवर लिहून ठेवतो.

पुस्तकातील काही महत्वाचे भाग-

  • भीतीला जिंकणं
  • रोमांचकरी गोष्टींचा स्वीकार करणं
  • बदलाचा आनन्द घेणं

The Secret (रहस्य)

नाव : रहस्य
लेखक: रोंडा बर्न
या पुस्तकात आकर्षणाचा सिद्धांत आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे वाचायला मिळेल.

आकर्षणाच्या नियमाचा वापर करून तुम्हाला आयुष्यात हवे असलेले सगळे काही मिळवता येते. जसे तुमचे विचार तसे तुमचे आयुष्य आकार घेत जाते.

तुमच्या मनात एक चुंबकासारखी शक्ती आहे सकारात्मक विचार करून जीवनात सकारात्मक बदल कसे घडवता येतील हे शिकण्यासाठी The Secret (रहस्य) हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

The Power of Positive Thinking (सकारात्मक विचारांचे सामर्थ्य )

नाव : सकारात्मक विचारांचे सामर्थ्य
लेखक: नॉर्मन विन्सेन्ट पील

आयुष्यात कधीही हार मनू नका, हतबल होऊ नका… मग तुम्ही नक्कीच मननशांती, चांगलं आरोग्य आणि जगण्यासाठी लागणारी अक्षय ऊर्जा मिळवू शकाल.… या गोष्टी अंगिकारल्या तर तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध नक्कीच होईल. – नॉर्मन विन्सेन्ट पील

पुस्तकाच्या नावावर क्लिक करून पुस्तकाची ऑनलाईन खरेदी अमेझॉन वरून करता येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “जगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके….(Motivational Books- Marathi)”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय