लग्न ठरवताना वधू वरांच्या या चार चाचण्या आवर्जुन करा

lagna aadhi karnyachya tapasnya

लग्न करताय? थांबा, हा लेख संपूर्ण वाचा

ही माहिती तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडेल.

तुम्ही जर स्वतः लग्न करणार असाल किंवा तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठरवत असाल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो शेवट पर्यंत नक्की वाचा आणि त्यावरचे तुमचे विचार आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

आपल्याकडे भारतात जेव्हा अरेंज मॅरेज म्हणजेच ठरवून लग्न केले जाते तेव्हा पत्रिका जुळवणे, मुला मुलीचा कौटुंबिक स्तर एकसारखा असणे यासारख्या गोष्टींना अवास्तव महत्व दिले जाते आणि त्या नादात इतर काही महत्त्वाच्या गोष्टी मागे पडतात. त्याचा त्रास नंतर नवपरिणीत जोडप्याला सहन करावा लागतो.

असे होऊ नये म्हणून, लग्न ठरवताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत. आधुनिक भारतात पत्रिका, संपत्ती, कुटुंबियांची आर्थिक स्थिती या सारख्या गोष्टींना अवास्तव महत्व न देता मुला मुलींचे आरोग्य, त्यांचे स्वभाव, त्यांचे शिक्षण या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे.

मुला मुलींचे लग्न ठरवण्याची वेळ आली तरी काही विविक्षित गोष्टींबाबत आई-वडील त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करत नाहीत, मुलामुलींच्या अपेक्षा समजून घेत नाहीत. त्यामुळे मग लग्न झाल्यावर काही समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते.

पुढे येऊ शकणारे असे सर्व प्रसंग आणि समस्या टाळण्यासाठी लग्न ठरवण्याआधी नेमकी काय काय खबरदारी घ्यावी ह्यावर विचार करणे फार आवश्यक झाले आहे.

लग्न ठरवण्याआधी मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही काही वैद्यकीय तपासण्या करणे खरेतर आवश्यक झाले आहे.

अशा वैद्यकीय तपासण्या करणे कदाचित काही वेळा घरातील मोठ्या माणसांना , आई-वडिलांना रुचणार नाही किंवा हे विचार फार आधुनिक आहेत असे वाटू शकेल.

परंतु अशा प्रकारच्या तपासण्या करून मुलगा आणि मुलगी वैद्यकीयदृष्ट्या सर्व तऱ्हेने सशक्त आणि फिट आहेत हे पाहणे खरे तर सर्वांच्याच फायद्याचे आहे.

अन्यथा, या बाबतीतील काही गोष्टी विवाहानंतर उघडकीस आल्या की नवपरिणीत जोडप्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, कौटुंबिक वादविवाद होतात, काही वेळा लग्न मोडण्यापर्यंत मजल जाते.

असे होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा अपमान ही भावना न ठेवता सर्वांनी या वैद्यकीय तपासण्या वेळीच करून घ्याव्या आणि आवश्यकता असेल तर त्यावर त्यानुसार उपचार करून घ्यावेत.

जाणून घ्या कोणत्या आहेत ह्या तपासण्या

१. प्रजोत्पादन क्षमतेची तपासणी (फर्टिलिटी टेस्ट) 

लग्न हे केवळ मुलगा व मुलगी यांचे एकमेकांशी नसून दोन कुटुंबीयांना जोडणारा तो एक दुवा असतो आणि दोन्ही कुटुंबीयांची लग्नाकडून वंशवृद्धीची अपेक्षा असते.

याचा अर्थ योग्य वेळ येताच नवपरिणीत जोडप्याकडून मुल होण्यासंबंधी अपेक्षा केल्या जातात.

मूल न होण्या संदर्भातील ज्या शारीरिक अडचणी असतात त्या सहसा आधी लक्षात येत नाहीत म्हणून अशा चाचण्या आधीच करून घेणे महत्त्वाचे ठरते.

पुरुषांसाठी वीर्यातील शुक्राणूंची संख्या आणि स्त्रियांसाठी अंडाशयाचे आरोग्य ह्या तपासण्या करणे महत्वाचे असते. या तपासण्यांमुळे मुलगा आणि मुलगी यांना लग्न करण्यासंबंधीचा निर्णय घेणे तर सोपे जाईलच शिवाय आवश्यकता असल्यास योग्य ते उपचार वेळीच करून घेता येतील.

२. रक्त तपासणी (ब्लड टेस्ट) 

आरोग्य विषयक इतर रक्त तपासण्या लग्न ठरवताना फारशा महत्त्वाच्या नसल्या तरी मुलगा आणि मुलगी यांचे रक्तगट निगेटिव्ह अथवा पॉझिटिव आहेत हे माहीत असणे पुढे होणार्‍या संततीच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते.

पती-पत्नी दोघांपैकी एकाचा रक्तगट पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याचा निगेटिव्ह असेल तर त्यांना गर्भधारणा आणि गरोदरपणा यांमध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागते तसेच पुढे होणाऱ्या संततीसाठी असे न जुळणारे रक्तगट घातक ठरू शकतात.

यासाठीच हल्ली डॉक्टर सांगतात की एक वेळ पत्रिका जुळतात का ते पाहू नका परंतु रक्तगट जुळतात ना हे जरूर पहा.

३. अनुवांशिक आजारांची तपासणी (जेनेटिक प्रॉब्लेम्स) 

काही वेळा आधीच्या पिढीत असणारे काही आजार संक्रमित होऊन पुढच्या पिढीत येऊ शकतात. अशा आजारांना अनुवंशिक आजार असे म्हटले जाते.

या आजारांबाबत माहिती असणे हे स्वतः मुलगा अथवा मुलगी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तर आवश्यक आहेच परंतु विवाह करताना समोरच्या व्यक्तीला देखील ते माहीत असणे आवश्यक ठरते.

म्हणूनच मुलगा आणि मुलगी दोघांनीही अशा पद्धतीच्या आपल्या कुटुंबातील अनुवंशिक आजारांची माहिती घेऊन तसेच त्यासंबंधी आवश्यक तपासण्या करून घेणे योग्य ठरते.

असे करण्यामुळे असा एखादा अनुवंशिक आजार असेल तर त्यासंबंधी योग्य खबरदारी वेळीच घेऊन तो आजार रोखणे शक्य होऊ शकेल.

४. Sexually Transmitted Diseases (यौनसंबंधांमुळे पसरणारे आजार) 

हल्ली मुलामुलींचे लग्नाआधी शारीरिक संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना त्या दोघांपैकी कोणालाही अशा संबंधांमुळे होणारे आजार असण्याची शक्यता असते.

अशी काही समस्या उद्भवू नये म्हणून मुलगा व मुलगी या दोघांनीही अशा तपासण्या लग्नाआधी जरूर करून घ्याव्या. त्यामुळे पुढे येऊ शकणाऱ्या समस्यांना योग्य रीतीने सामोरे जाता येईल.

काही लोकांना हा विषय अप्रस्तुत वाटण्याची शक्यता आहे. परंतु सध्याच्या समाजातील वास्तव पाहता आता ही गरजेची गोष्ट बनली आहे हे नक्की.

मित्र-मैत्रिणींनो, या अशा वैद्यकीय तपासण्या लग्न ठरवण्याआधीच करवून घेतलेल्या असणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे लग्न झालेल्या नवपरिणीत जोडप्याला कोणतेही गैरसमज अथवा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

अशा तपासण्या करून घेणे ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे याबद्दल कोणताही गैरसमज मनात न ठेवता अशा तपासण्या जरूर करून घ्याव्यात आणि त्याबद्दल आग्रही देखील राहावे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Saiprasad Prabhakar Panhalkar says:

    Dhanyawad 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!