ब्रश करण्यापूर्वी / दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या ब्रश करण्यापूर्वी / दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे

सकाळी उठून तोंड धुण्याआधी पाणी पिणे ही कल्पना कशीतरीच वाटतेय का?

पण त्यात वाईट किंवा किळसवाणे काही नाही, उलट असे करण्याचे आरोग्याला फायदेच आहेत. आज तेच फायदे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

पाणी हे जीवन आहे असे नेहेमी म्हटले जाते. आपल्या शरीरासाठी पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

शरीराच्या एकूण वजनापैकी ७०% वाटा पाण्याचा असतो. पाण्यामुळे शरीरातील अनेक अवयवांचे कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते.

निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्त्वाचे समजले जाते. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास पाणी मदत करते. प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात आपल्या वजनानुसार दर २५ किलोला ४ ग्लास या प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते.

उदाहरणार्थ एखाद्या ५० कि. वजनाच्या व्यक्तीने दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

सकाळी उठून दात घासण्यापूर्वी १ ग्लास पाणी प्यायले तर शरीराच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

तोंडात असलेली लाळ सकाळी पाण्यासोबत पोटात गेली की ती शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्याचं काम करते, याचे आणखीही फायदे आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.

१. शरीर डिटॉक्स करण्यासाठी

शरीरातील टॉक्सीन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर टाकले जाणे म्हणजे शरीर डिटॉक्स होणे.

अनेकांना हे फार कठीण काम वाटते. मात्र सकाळी ब्रश करण्यापूर्वी १ ग्लास पाणी प्यायले तर शरीरातील अनेक विषारी पदार्थ सहज बाहेर टाकले जाऊ शकतात.

दररोज सकाळी १ ग्लास कोमट पाणी प्यायले तर त्या पाण्याबरोबर पोटात जाणारी तोंडातील लाळ एक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. अशा अँटिऑक्सिडंटमुळे शरीरा डिटॉक्स होण्यास मदत होते.

२. किडनी निरोगी राहण्यासाठी

किडनी म्हणजेच मूत्रपिंडे हे आपल्या शरीराचे फिल्टर असतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी किडनी निरोगी असणे खूप महत्वाचे असते.

सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने किडनीशी संबंधित असलेल्या किडनी स्टोनसारख्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. किडनीच्या आरोग्याविषयीचा लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

३. त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त

सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे मुरुमांची (Pimples) समस्या दूर होते.

यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. परिणामी त्वचा (Skin) हेल्दी आणि नितळ राहण्यास मदत होते.

४. चयापचयाचा दर वाढतो

दररोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर लगेच १ ग्लास पाणी पिण्यामुळे चयापचय म्हणजेच मेटॅबॉलिजम (metabolism) चा दर वाढतो.

त्यामुळे अन्नपचनास मदत होते आणि ऍसिडिटीचा त्रास होत नाही.

५. केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने केसांच्या मुळांशी होणारे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि केस मजबूत होण्यास मदत होते. केसांच्या मुळांशी रक्तपुरवठा वाढल्यामुळे केसांची वाढ देखील चांगली होते.

६. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

सकाळी दात न घासता पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास पाणी प्यायल्यास अन्नपचन चांगल्या प्रकारे होते, शरीरातील फॅट्सचे प्रमाण कमी होते.

तसेच जास्त कॅलरीज् बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी/नियंत्रित करण्याची इच्छा असल्यास सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर ठरते.

तर हे आहेत सकाळी रिकाम्या पोटी दात न घासता पाणी पिण्याचे सहा फायदे. ह्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी ही अगदी सोपी सवय लावून घ्या.

ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख जरूर शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय